AMC Election 2022, Ward 24 : सत्तेच्या सारीपाटात भाजपला विरोधक शह देणार का? जाणून घ्या मतदारसंघातील स्थिती

अकोला महापालिकेतील सत्तेच्या चाव्या आपल्या हाती राखण्यासाठी भाजप आटोकाट प्रयत्न करतेय, तर विरोधक सत्ताधारी भाजपाला शह देण्याच्या तयारीत आहेत. सत्तेच्या या सारीपाटामध्ये कोण सरस ठरतेय, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

AMC Election 2022, Ward 24 : सत्तेच्या सारीपाटात भाजपला विरोधक शह देणार का? जाणून घ्या मतदारसंघातील स्थिती
अकोला महापालिका निवडणूकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 12:33 PM

अकोला : साल 2014 मध्ये केंद्रामध्ये मोदी सरकारची सत्ता आली. त्यानंतरच्या पुढील काही निवडणुकांमध्ये मोदी लाटेचा प्रभाव दिसला. 2017 मध्ये झालेल्या अकोला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतही मोदी लाटेचीच झलक दिसली. भाजपने या महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करीत काँग्रेस, शिवसेनेला पराभवाची धूळ चारली होती. आता तर राज्यातही भाजपचाच करिष्मा असल्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही अकोल्यामध्ये भाजपचेच कमळ फुलण्याची दाट शक्यता आहे. भाजप (BJP)ने त्याच आत्मविश्वासातून सत्तेची आखणी सुरु केली आहे. याचवेळी राज्यातील सत्ताबदलामुळे दुखावलेले काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे पक्षही भाजपाला तगडे आव्हान देण्याच्या तयारीत आहे. राज्यात तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) स्थापना झाली होती. त्याच प्रयोगाच्या जोरावर महापालिका निवडणुकीत भाजपाला शह देण्याची तयारी सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सुरु असल्याचे अकोला महापालिके (Akola Municipal Corporation)च्या वर्तुळात दिसत आहे. प्रभाग क्रमांक 24 मध्ये देखील त्याच अनुषंगाने व्यूहरचना आखली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर या प्रभागातील सध्याच्या राजकीय आणि इतर परिस्थितीवर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप.

अकोला महापालिका वॉर्ड 24 अ

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग क्रमांक 24 ची लोकसंख्या

एकूण लोकसंख्या – 17174 अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्या – 1485 अनुसूचित जमाती प्रवर्गातील लोकसंख्या – 795

अकोला महापालिका वॉर्ड 24 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग क्रमांक 24 मधील प्रमुख विभाग

महापालिकेचे नवीन प्रभाग वाढवताना जवळपास सर्वच प्रभागांची रचना बदलली आहे. या नव्या प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक 24 मध्ये खोलेश्वर, रजपुतपुरा, राधाकिसन प्लॉट, राधेनगर, मंगळवारा, अनिकट पोलिस लाईन, नवरंग सोसायटी, जुना आळशी प्लॉट, नवीन आळशी प्लॉट व इतर अशा विविध प्रमुख विभागांचा समावेश होत आहे. महापालिकेचे पूर्वी 20 प्रभाग होते. ते आता 30 झाले आहेत. यापैकी 29 प्रभाग तीन सदस्यीय आणि 30 वा प्रभाग चार सदस्यीय असणार आहे. 30 प्रभागांतून 91 नगरसेवक महापालिकेवर जाणार आहेत.

हे सुद्धा वाचा

पालिका निवडणुकीतील आरक्षण रचना

एकूण 30 प्रभागांतील 91 पैकी 46 जागा महिलांसाठी राखीव आहेत, अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या 15 पैकी 8 जागा महिलांसाठी राखीव आहेत. तसेच अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या 2 पैकी 1 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.

अकोला महापालिका वॉर्ड 24 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीतील पक्षीय बलाबल

भारतीय जनता पक्ष – 48 राष्ट्रीय काँग्रेस (INC) – 13 शिवसेना (SS) – 08 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) – 05 भारिप बहुजन महासंघ (BBM) – 03 ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) – 01 अपक्ष/इतर – 02

अकोला महापालिकेतील सत्तेच्या चाव्या आपल्या हाती राखण्यासाठी भाजप आटोकाट प्रयत्न करतेय, तर विरोधक सत्ताधारी भाजपाला शह देण्याच्या तयारीत आहेत. सत्तेच्या या सारीपाटामध्ये कोण सरस ठरतेय, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.