AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KMC Election 2022, Ward 28 : कोल्हापूरच्या रणसंग्रामात बाजी कोण मारणार; प्रभाग क्रमांक 28 ठरणार ‘किंगमेकर’

प्रभागातील एकूण लोकसंख्येचा विचार करता येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील लोकसंख्या फार कमी आहे. त्या तुलनेत अनुसूचित जातीची मते निर्णायक ठरू शकणार आहेत. राजकीय पक्षांना या मतांची गोळाबेरीज करून उमेदवार द्यावे लागणार आहेत.

KMC Election 2022, Ward 28 : कोल्हापूरच्या रणसंग्रामात बाजी कोण मारणार; प्रभाग क्रमांक 28 ठरणार 'किंगमेकर'
कोल्हापूर महापालिका निवडणूकImage Credit source: TV9
| Updated on: Aug 21, 2022 | 12:35 PM
Share

कोल्हापूर : महाराष्ट्रातील पाच बड्या महापालिकांनी निवडणूक अत्यंत लक्षवेधी ठरणार आहे. त्यात कोल्हापूर महापालिकेचा (Kolhapur Municipal Election)ही समावेश आहे. 2024 मधील लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) तसेच राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे या पार्श्वभूमीवर महापालिकांच्या निवडणुका अधिक रंगतदार होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळेच राजकीय पक्षांनी सध्या दिग्गज उमेदवारांची शोध मोहीम सुरु ठेवली असून, एकिकडे पक्षाचा दबदबा आणि दुसरीकडे उमेदवाराची लोकप्रियता यावर विजयाचे स्वप्न साकार करण्याची रणनीती आखली आहे. राज्यात कोल्हापूरसह मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे या प्रमुख महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. कोल्हापूर शहराचे व्यापारदृष्ट्या अधिक महत्व आहे. पालिकेची आर्थिक प्रगतीही चांगली आहे. त्या जोरावर सत्तेत येताच विकासकामांचा धडाका लावून मतदारांच्या मनावर स्वार होण्याचे स्वप्नही काही राजकीय पक्षांनी पाहिले आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख पक्षांबरोबरच ताराराणी आघाडी पक्षा (Tara Rani Aghadi Party)ची रणनीतीदेखील पालिकेतील सत्तेचे समीकरण बदलू शकणार आहे. भाजपकडून ताराराणी आघाडीशी छुपी युती करून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला बाजूला करण्याचे राजकारण खेळले जाऊ शकते, असा अंदाज राजकीय जाणकारांनी वर्तवला आहे. त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक 28 मधील सद्यस्थितीवर टाकलेला हा एक दृष्टीक्षेप.

कोल्हापूर महापालिका वॉर्ड 28 अ

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग क्रमांक 28 ची लोकसंख्या

एकूण लोकसंख्या – 18578 अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्या – 2993 अनुसूचित जमाती प्रवर्गातील लोकसंख्या – 79

प्रभागातील एकूण लोकसंख्येचा विचार करता येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील लोकसंख्या फार कमी आहे. त्या तुलनेत अनुसूचित जातीची मते निर्णायक ठरू शकणार आहेत. राजकीय पक्षांना या मतांची गोळाबेरीज करून उमेदवार द्यावे लागणार आहेत. राज्यात सध्या जी राजकीय उलथापालथ झाली आहे, त्या परिस्थितीत उमेदवार किती लोकप्रिय आहे, त्यावर पक्षांच्या जागांचे भवितव्य अवलंबून असेल, असे जाणकारांकडून बोलले जात आहे.

कोल्हापूर महापालिका वॉर्ड 28 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग क्रमांक 28 मधील आरक्षण

वॉर्ड क्रमांक 28 अ – अनुसूचित जाती महिला वॉर्ड क्रमांक 28 ब – सर्वसाधारण महिला वॉर्ड क्रमांक 28 क – सर्वसाधारण

प्रभागात समाविष्ट प्रमुख विभाग

प्रभाग क्रमांक 28 मध्ये देवकर पाणंद, निकम पार्क, तपोवन मैदान, गणेश कॉलनी, आयटीआय परिसर, हनुमान नगर, कळंब फिल्टर हाऊस, कामगार चाळ, सुधाकर जोशीनगर झोपडपट्टी, नंदनवन कॉलनी, आदर्श वसाहत कामगार चाळ, आयटीआय, सासणे कॉलनी, वसंत विश्वास पार्क आदी प्रमुख विभागांचा समावेश होतो.

कोल्हापूर महापालिका वॉर्ड 28 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

2015 च्या सार्वत्रिक निवडणुकीत नेमके काय चित्र होते?

2015 मध्ये झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि ताराराणी आघाडी हे पक्ष स्वतंत्र लढले होते. मात्र मध्यंतरी राज्यात शिवसेनेच्या पुढाकाराने महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारही आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सत्ताबदल घडवून आणला आहे. या बदललेल्या राजकीय समीकरणाचा कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाव दिसणार आहे. यादरम्यान ताराराणी आघाडीची रणनीतीही महत्वाची भूमिका बजावणार आहे.

पालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल

काँग्रेस – 30 राष्ट्रवादी – 15 शिवसेना – 04 ताराराणी आघाडी – 19 भाजप – 13

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.