AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagar Panchayat Election: नगरपंचायतीची रणधुमाळी, खासदार आमदार ते मंत्री साऱ्यांचीच प्रतिष्ठा पणाला, मतदारांचा कौल कुणाला?

महाराष्ट्रात आज नगर पंचायत (Maharashtra Nagar Panchayat Election 2021) आणि भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मतदान होत आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं मोठ्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

Nagar Panchayat Election: नगरपंचायतीची रणधुमाळी, खासदार आमदार ते मंत्री साऱ्यांचीच प्रतिष्ठा पणाला, मतदारांचा कौल कुणाला?
Nagar Panchayat Election
| Edited By: | Updated on: Dec 21, 2021 | 1:25 PM
Share

मुंबई: महाराष्ट्रात आज नगरपंचायत (Maharashtra Nagar Panchayat Election 2021) आणि भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मतदान होत आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं मोठ्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांनी प्रतिष्ठा भंडाऱ्यात पणाला लागलीय. जळगावात एकनाथ खडसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते गिरीश महाजन, साताऱ्यात शंभूराज देसाई आणि विक्रमसिंह पाटणकर, अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर आणि रवी राणा, अहमदनगरमध्ये कर्जत जामखेडला रोहित पवार आणि राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

भंडाऱ्यात काँग्रेस राष्ट्रवादी आमनेसामने

भंडारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सह जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी हेच प्रमुख राजकीय पक्ष आहेत. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर महत्त्वाची निवडणूक आहे.

जळगावात खडसे, महाजन, गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला

जळगाव जिल्ह्यातील बोदवड या एकाच बोदवड नगरपंचायतीच्या मतदानाला सुरुवात झालीय.मतदारांचा मतदान करण्यासाठी सकाळपासून प्रतिसाद पाहायला मिळत आहे. एकूण 13 जागांसाठी 54 उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, पालक मंत्री गुलाबराव पाटील गिरीश महाजन, आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर आणि रवी राणांची प्रतिष्ठा पणाला

अमरावती जिल्ह्यातील तिवसा व भातकुली नगरपंचायतीच्या 30 जागांसाठी आज मतदान होत आहे. यामध्ये 16489 मतदार मतदानाचा हक्क बजावतील.यामध्ये तिवसा नगरपंचायतच्या 14 जागेसाठी 62 उमेदवार रिंगणात असून भातकुलीच्या 16 जागेसाठी 60 उमेदवार रिंगणात आहेत. तिवसा नगरपंचायतीवर महिला व बालकल्याण मंत्री व अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या काँग्रेस पक्षाची सत्ता होती तर भातकुली नगरपंचायतवर आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेची सत्ता होती. त्यामुळे या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्या राज्यात कडाक्याची थंडी पडत असल्याने सकाळी मतदान केंद्रावर शुकशुकाट बघायला मिळाला,मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

पाटणमध्ये शिवसेनेचे शंभुराज देसाई जिल्हा बँकेच्या पराभवाची परतफेड करणार

महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते शंभुराज देसाई यांना जिल्हा बँकेला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. शंभुराज देसाई यांच्याकडून पाटण नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तांनं त्या पराभवाची परतफेड करण्याच्या इराद्यानं निवडणूक लढवण्यात आली. पाटणमध्ये शंभुराज देसाई विरुद्ध विक्रमसिंह पाटणकर असा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे.

कर्जतमध्ये रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक

नगरपंचायतीच्या निवडणुकीत राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणारी नगरपंचायत म्हणून कर्जतची चर्चा राज्यात झालेली पाहायला मिळाली. कर्जत नगरपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात झाली असून आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्या सामना आहे. 17 पैकी 13 जागेंसाठी मतदान होणार आहे. राष्ट्रवादीची एक जागा बिनविरोध निवडून आली आहे. कर्जतची निवडणूक ही रोहित पवारांच्या प्रतिष्ठेची लढाई तर राम शिंदे यांच्या अस्तिवाची लढाई आहे.

रत्नागिरीत अनिल परब यांची प्रतिष्ठा पणाला

दापोली नगरपंचायत निवडणुकीसाठी 17 जागांपैकी 13 जागांसाठी आज मतदान होत आहे. 13 जागांसाठी 43 उमेदवार उभे आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून 13 उमेदवार उभे असून शिवसेनेचे बंडखोर अपक्ष 8 उमेदवार उभे आहेत. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे. शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे दापोली आणि मंडणगड नगरपंचायत निवडणूक हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे.

इतर बातम्या:

देवस्थानाच्या जमिनी हडपल्या, भाजपच्या सुरेश धस यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार; नवाब मलिकांचे आरोप काय?

महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याच्या कर्नाटक सरकारच्या हालचाली, राऊतांचं थेट आव्हान

Maharashtra Nagar Panchayat Election important for Nana Patole Praful Patel Eknath Khadse Girish Mahajan Gulabrao Patil Rohit Pawar Ram Shinde and other leaders

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...