मनसेसाठी 'हीच ती वेळ', शिवसेनेची जागा आता मनसे घेणार?

सत्तानाट्य संपल्यानंतर राज ठाकरेंची मनसे (Raj Thackeray MNS) राज्याच्या राजकारणात पुन्हा मैदानात उतरणार आहे. मनसेने राज्यातील महाविकास आघाडीला टार्गेट करण्याचे ठरवलं आहे.

मनसेसाठी 'हीच ती वेळ', शिवसेनेची जागा आता मनसे घेणार?

मुंबई : सत्तानाट्य संपल्यानंतर राज ठाकरेंची मनसे (Raj Thackeray MNS) राज्याच्या राजकारणात पुन्हा मैदानात उतरणार आहे. मनसेने राज्यातील महाविकास आघाडीला टार्गेट करण्याचे ठरवलं आहे. लवकरच मनसे कार्यकर्त्यांचं महाआधिवेशनदेखील घेणार आहे. मनसेच्या प्रमुख नेत्यांची (Raj Thackeray MNS) बैठक पार पडली. पण, या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरेच नव्हते. राज्यातील सत्तानाट्यानंतर पहिल्यांदाच मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यात मनसेची राजकीय वाटचाल, राज्यातील शेतीचे प्रश्न आणि राजकीय परिस्थिती दिल्लीत सुरु असलेल्या घडामोडींवर या बैठकीत आढावा घेण्यात आला.

शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात पकडला. पण, नव्यानं उदयास आलेल्या या महाविकास आघाडीविरोधात मनसेनंही चांगलीच मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे.

2019च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकमेव आमदार कल्याण ग्रामीण मधून निवडून आला. पुढील काळात नवी मुंबई, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये मनसे महाविकासआघाडी आणि भाजप विरोधात प्रचार करुन आपल्या झोळीत मतं टाकून घेण्याच्या प्रयत्नात आहे.

आता आक्रमक शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यानं मनसेलाही चांगलीच संधी आहे. आक्रमक विरोधक म्हणून आता मनसे रिकामी स्पेस भरुन काढू शकते.
शिवसेना सत्तेत गेल्यानं राज्याच्या राजकारणात आक्रमक विरोधकाची पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून काढण्याचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवलं असलं तरी त्यांना आवश्यक ते बळ देण्यासाठी राज ठाकरेंनीही त्यांना वेळ देणं आवश्यक आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *