AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supreme Court : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर ३ ऑगस्टला सुनावणी, सुप्रीम कोर्टाकडून तारीख पे तारीख

सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत निवडूक आयोग कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. विशेष म्हणजे सध्या जे काही सरकार आहे त्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इतकाच विस्तार झाला आहे.

Supreme Court : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर ३ ऑगस्टला सुनावणी, सुप्रीम कोर्टाकडून तारीख पे तारीख
ईडब्ल्यूएस आरक्षणाचे काय होणार?Image Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jul 31, 2022 | 1:32 PM
Share

मुंबई – शिवसेनेतील (Shivsena) आमदार आपली भूमिका वेगळी असल्याचे सांगून एक गट तयार केला आहे. तेव्हापासून महाराष्ट्रात (Maharashtra) मोठा सत्तासंघर्ष सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही गट पक्ष आमचा असल्याचे सांगत कोर्टात (Court) गेले आहेत. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष कोर्टाच्या निकालाकडे लागले आहे. कारण पूर्वी 1 ऑगस्टला त्यावर सुनावणी होणार होती. आत्ता 3 ऑगस्टला होणार असल्याचे कोर्टाकडून जाहीर केले आहे. 16 आमदारांच्या निलंबन प्रकरणी अद्याप सुनावणी बाकी असून त्याकडे महाराष्ट्रासह संपुर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. दोन्ही गटात मागच्या काही दिवसांपासून मोठा वाद सुरु आहे. त्याचबरोबर दोन्ही बाजूकडील मोठ्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

शिंदे गटाने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली

जेव्हापासून दोन गट विभक्त झाले आहेत. तेव्हापासून महाराष्ट्रात एक वेगळं राजकारण पाहायला मिळत आहे. कारण आत्तापर्यंत दोन्ही गटाने पक्षाचं आणि पक्षाच्या झेंड्यावर निवडणूक आयोगाकडे दावा केला आहे. दोन्ही गटानी आपली बाजू मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळ आणि कागदपत्रे जमा करण्याचे आदेश दिले होते. आता नेमकं पक्षाचं आणि पक्षाचा झेंडा कुणाच्या पारड्यात जाणार याकडे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे. निवडणुक आयोगाच्या नोटीशीनंतर शिंदे गटाने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवरती अपात्रतेची कारवाई केली होती.

सरकार स्थापनेतही अडथळे येण्याची शक्यता

सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत निवडूक आयोग कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. विशेष म्हणजे सध्या जे काही सरकार आहे त्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इतकाच विस्तार झाला आहे. तसेच सरकार स्थापनेतही अडथळे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे. सुप्रीम कोर्टात सध्या तारिख वाढल्याने आता महाराष्ट्र तीन तारखेची वाट पाहत आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा