AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL 1st Test: श्रीलंकेसमोर विजयासाठी 371 धावांचं आव्हान, टीम इंडियाच्या फिरकीची जबाबदारी वाढली

भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. दुसऱ्या डावात भारतीय संघ धावांवर बाद झाला. त्यामुळे श्रीलंकेसमोर आता विजयासाठी धावांचं आव्हान आहे. आता भारतीय गोलंदाजांचा कस लागणार आहे. खासकरून फिरकी गोलंदाजांवरील जबाबदारी वाढली आहे.

IND vs SL 1st Test: श्रीलंकेसमोर विजयासाठी 371 धावांचं आव्हान, टीम इंडियाच्या फिरकीची जबाबदारी वाढली
IND vs SL 1st Test: श्रीलंकेसमोर विजयासाठी 371 धावांचं आव्हान, टीम इंडियाच्या फिरकीची जबाबदारी वाढलीImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 18, 2026 | 2:40 PM
Share

भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना गॉल आंतरराष्ट्रीय मैदानात सुरू आहे. हा सामना आता निर्णायक वळणावर आला आहे. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 371 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पहिल्या डावात भारताने प्रथम फलंदाजी करून 462 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 284 धावांवर आटोपला होता. त्यामुळे पहिल्या डावात 178 धावांची मोठी आघाडी टीम इंडियाला मिळाली होती. दुसऱ्या डावात भारताने 200 पार धावा करण्याची अपेक्षा होती. पण खेळपट्टी पूर्णपणे फिरकीला मदत करणारी असल्याने हे गणित कठीण असल्याचं दिसून आलं. भारताचा दुसऱ्या इनिंगमधील डाव अवघ्या 193 धावांवर आटोपला. या सामन्यातील दुसऱ्या डावात केएल राहुल, देवदत्त पडिक्कल आणि ऋषभ पंत वगळता सर्वांनी निराशा केली. भारताने 371 धावांचं ठेवलेलं आव्हान तसं पाहिलं तर सोपं नाही. पण भारतीय गोलंदाजांना आता भूमिका बजवावी लागणार आहे.

दुसऱ्या डावात 178 धावांच्या आघाडीच्या पुढे खेळताना भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने पहिल्याच षटकात विकेट दिली. त्याला खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांनी डाव सावरला. या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली. केएल राहुल 35 धावा करून बाद झाला आणि गणित बिघडलं. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला शुबमन गिल 8 धावाच करू शकला. देवदत्त पडिक्कलचा डावही 44 धावांवर आटोपला. पण पहिल्या डावात फेल गेलेल्या ऋषभ पंतने दुसऱ्या डावात झुंजार खेळी केली. त्याने 69 चेंडूत 66 धावा केल्या आणि बाद झाला.

ऋषभ पंत बाद झाल्यानंतर खालच्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. ध्रुव जुरेल 7, रवींद्र जडेजा 9, मानव सुथार 9, कुलदीप यादव 5 धावा करून बाद झाले. त्यामुळे भारताची नाजूक स्थिती झाली. प्रसिद्ध कृष्णा 2 धावा करून बाद झाला आणि भारताचा डाव 193 धावांवर आटोपला. आता भारतीय फिरकीची जबाबदारी वाढली आहे. दीड दिवसांचा खेळ शिल्लक असून श्रीलंकेला विजयी धावांच्या आता गुंडाळण्याचं आव्हान असणार आहे. जर तसं झालं तर भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीच्या आशा जिवंत राहतील.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर