नागपूरचा आढावा : 12 पैकी 11 जागा भाजपकडे, यंदा काय होणार?

नागपूर जिल्ह्यात विधानसभेच्या 12 जागा आहेत. त्यापैकी फक्त एक जागा काँग्रेसकडे तर बाकी 11 जागा भाजपकडे आहेत.

नागपूरचा आढावा : 12 पैकी 11 जागा भाजपकडे, यंदा काय होणार?

नागपूर : नागपूर जिल्ह्यात विधानसभेच्या 12 जागा आहेत. त्यापैकी फक्त एक जागा काँग्रेसकडे तर बाकी 11 जागा भाजपकडे आहेत. नागपूर ग्रामीणमध्ये 6 विधानसभा आहेत त्यापैकी एक काँग्रेसच्या खात्यात आहे तर बाकी सगळ्या भाजपच्या. नागपूर शहरमध्ये सर्व सहा जागा भाजपने जिंकल्या आहेत.

काटोल विधानसभा (Katol Vidhansabha)

काटोलमध्ये आशिष देशमुख यांनी भाजपच्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे ही जागा आता भाजप लढते की शिवसेनेला सुटते, याकडे लक्ष लागले आहे. कारण इथे जेवढे भाजपमध्ये इच्छुक आहेत तेवढेच शिवसेनेत सुद्धा. त्यामुळे दोन्ही पक्ष आपलं वर्चस्व दाखविण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे येथे पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून माजी मंत्री अनिल देशमुख कामाला लागले आहेत. कारण त्यांचा हा पारंपरिक मतदार संघ आहे. त्यांनी चार वेळा या मदतदारसंघातून विजय मिळविला आहे. 2014 च्या विधानसभेत भाजपचे  आशिष देशमुख यांनी अनिल देशमुख यांना 5 हजार 557 मतांनी पराभूत केलं होतं.

2014 चा निकाल

 • आशिष देशमुख — ७० हजार ३४४
 • अनिल देशमुख – ६४ हजार ७८७
 • पुरुष — १ लाख ३२ हजार १९२
 • महिला – १ लाख १८ हजार ३४४
 • एकूण – २ लाख ५० हजर ५३६

हिंगणा  विधानसभा (Hingna Vidhansabha)

भाजपचे समीर मेघे या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. हिंगणा मतदारसंघ तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. मात्र त्या ठिकाणी भाजपने आपला झेंडा रोवला. या मतदारसंघात औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि बाहेरून येऊन स्थायिक झालेल्या लोकांचा मोठा भरणा आहे. सोबतच शेतकरी वर्ग सुद्धा. इथे राष्ट्रवादीमध्ये अनेक इच्छुक आहे तर भाजपकडे सुद्धा इच्छुकांची कमी नाही. मात्र समीर मेघे यांची मतदारसंघात निर्माण झालेली पकड बघता भाजप दुसरा पर्याय शोधेल असं वाटत नाही. हिंगणा मतदारसंघात 2014 मध्ये  समीर मेघे यांनी भाजपच्या तिकिटावर विजय मिळविला त्यांनी गड असूनही राष्ट्रवादीच्या रमेश बंग यांना पराभूत केलं होतं. समीर मेघे यांनी २३ हजार १५८ मतांनी विजय मिळविला

2014 चा निकाल

 • समीर मेघे — ८४ हजार १३९
 • रमेश बंग — ६० हजार ९ ८१
 • पुरुष — १ लाख ६३ हजार ११८
 • महिला – १ लाख ३९ हजार ६८५
 • एकूण — ३ लाख ०२८११

सावनेर विधानसभा (Savner Vidhansabha)

 काँग्रेसचे सुनील केदार सावनेरचे आमदार आहेत. सावनेर मतदार संघ हा आधीपासूनच काँग्रेसचा गड होता. 2014 च्या लाटेत भाजपने सगळे गड डगमगवले, पण सावनेर अबाधित राहिला. सावनेर ही एकमात्र जागा आहे जी नागपूर जिल्ह्यात काँग्रेसचं अस्तित्व टिकवून आहे. काँग्रेसचे सुनील केदार यांनी या मतदारसंघात आपली बाजू चांगलीच मजबूत केली आणि त्यांनी विजय मिळवला.

या मतदारसंघाचा विचार केला तर संपूर्ण शेतीप्रधान क्षेत्र आहे. या ठिकाणी भाजपच्या आमदाराचं ऐनवेळी नामांकन रद्द झालं. त्याचा काहीसा फायदा केदार यांना झाला असला तरी त्यांची लढाई मात्र काट्याची झाली. पण केदार यांनी 9 हजार 209 मतांनी विजय मिळविला.

यावेळी या मतदारसंघात मात्र भाज कडून अनेक इच्छुक तयार आहे. शिवसेन सुद्धा आपली ताकद या ठिकाणी दाखवत असली तरी युती झाल्यास हा मतदारसंघ भाजपकडे राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये इच्छुक असले तरी या मतदारसंघात पहिले दावेदार मात्र सुनील केदारच आहेत.

2014 चा निकाल

 • सुनील केदार — ८४ हजार ६ ३०
 • विनोद जीवतोड — ७५ हजार ४२१
 • पुरुष — १लाख ४२ हजर ३९९
 • महिला — १ लाख २७ हजार ५४९
 • एकूण — २ लाख ६९ हजार ९५२

रामटेक विधानसभा ( Ramtek Vidhansabha)

 रामटेक विधानसभा मतदारसंघात भाजपचे मालिकार्जुन रेड्डी हे विद्यमान आमदार आहेत. रामटेक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून आशिष जयस्वाल निवडून यायचे. त्यांचा चांगला दबदबा सुद्धा या मतदारसंघात आहे. मात्र 2014 मधील मोदी लाटेत आशिष जयस्वाल यांना पराभवाला समोर जावं लागलं.

रामटेकमध्ये मालिकार्जुन रेड्डी यांना भाजपने तिकीट दिलं होतं. त्यांनी रामटेकच्या गडावर भाजपचा झेंडा फडकविला. रामटेकमधून शिवसेनेचा खासदार निवडून आला. मात्र विधानसभेत वेगवेगळे वाढल्याने शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला. या मतदारसंघात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.  सोबतच जातीचा पगडा सुद्धा याठिकाणी पाहायला मिळतो. या मतदारसंघावर शिवसेनाच दावा आहे. युती झाली तर ही जागा शिवसेनेच्या कोट्यात जाण्याची शक्यता आहे. मात्र भाजपचे इच्छुक या ठिकाणी सुद्धा आहेत.

काँग्रेसने सुद्धा या मतदारसंघात तयारी केली आहे. इच्छुकांची संख्या मोठी आहे. मात्र आधी शिवसेनेचा आणि आता भाजपचा मतदारसंघ भेदण्याचं मोठं आव्हान काँग्रेसपुढे आहे . 2014 मध्ये मालिकार्जुन  रेड्डी यांनी शिवसेनेचे आशिष जयस्वाल यांना १२ हजर ८१ मतांनी पराभूत केलं.

2014 मधील मतदार

 • मालिकार्जुन रेड्डी — ५९ हजर ३४३
 • आशिष जैस्वाल — ४७ हजर २६२
 • पुरुष — १ लक्ष ३० हजार ८१४
 • महिला — १लक्ष १६ हजर ३ ६८
 • एकूण –२ लाख ४७ हजर १८२

उमरेड विधानसभा (Umred Vidhansabha)

उमरेड मतदार संघ हा एसस साठी राखीव आहे. या मतदारसंघात अनेक दिग्गज आपलं नशीब अजमावून चुकले आहे. हा संपूर्ण परिसर ग्रामीण आहे. शेतकरी वर्ग या ठिकाणी मोठा आहे. सोबतच या क्षेत्रात जातीय राजकारणाला सुद्धा मोठं महत्व आहे. कधीकाळी हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र या ठिकाणी सुधीर पारवे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली आणि विजयी झाले. या मतदार संघात बीएसपी आणि भाजपमध्ये सरळ लढत झाली आणि बीएसपीने चांगली टक्कर दिली. काँग्रेस तिसऱ्या नंबरवर गेली. भाजपचे सुधीर पारवे यांनी बीएसपीच्या वृक्षदास बनसोड यांना ५८ हजार ३२२ मतांनी पराभूत केलं. या मतदारसंघात आता काँग्रेसने कंबर कसली आहे .त्यांच्याकडे अनेक इच्छुक उमेदवार आहेत. तर बीएसपी सुद्धा तयारीत आहे. भाजपकडे अनेक इच्छुक आहेत. मात्र सुधीर पारवे यांना तिकीट मिळते की पर्याय शोधला जातो हे सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. तर शिवसेना सुद्धा या ठिकाणी तयारीत दिसत आहे.

2014 चा निकाल

 • सुधीर पारवे — ९२ हजार ३९९
 • रुक्षदास बनसोड — ३४ हजार ०७७
 • पुरुष — १लाख ४८ हजार ३२५
 • महिला — १लाख ३५ हजार ५९७
 • एकूण – २लाख ८३ हजार ९२२

कामठी विधानसभा (Kamthi Vidhansabha)

भाजप नेते आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा मतदारसंघ. कामठी  विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा गड आहे. या मतदारसंघात काँग्रेसचा सुद्धा चांगला जोर आहे.  कारण या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या सुद्धा अतिशय महत्वाची आहे. सोबतच दलित मतदार निर्णायक भूमिका निभावणारे आहेत. कामठी नगर परिषदमध्ये काँग्रेसचा नगराध्यक्ष आहे. हा मतदार संघ शहरी आणि ग्रामीण असा भाग आहे त्यामुळे इथल्या समस्यासुद्धा वेगळ्या आहेत. या मतदारसंघात काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांनी भाजपला चांगली टक्कर दिली होती. मात्र चंद्रशेखर बावनकुळे हे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांना 40 हजार मतांनी पराभूत केलं. या मतदारसंघात काँग्रेसकडून बावनकुळे यांच्याविरोधात लढण्यासाठी इच्छुक अनेक आहेक. मात्र भाजपचा तगडा उमेदवार असल्याने राजेंद्र मुळक या ठिकाणी पुन्हा लढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  या मतदारसंघात ग्रामीण आणि शहरी असा भाग आहे.

2014 मधील निकाल

 • चंद्रशेखर बावनकुळे — १ लाख २६ हजार ७५५
 • राजेंद्र मुळक — ८६ हजार ७५३
 • पुरुष — १लाख ९६ ६१९
 • महिला — १लक्ष ८० हजार २७८
 • एकूण — ३ लाख ७६ हजर ८९९

नागपूर जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ आहेत यापैकी शहरातील नागपूर मतदारसंघ भाजपकडे आहे तर ग्रामीण रामटेक मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे.

नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ (Nagpur South Waste Vidhan sabha)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा मतदारसंघ. देवेंद्र फडणवीस यांनी दोन निवडणुका या मतदारसंघातून
जिंकल्या आहेत. त्यामुळे यावेळी दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून हॅटट्रिक करण्यासाठी ते सज्ज आहेत. भाजपचा बालेकिल्ला म्हणूनच या मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघातून पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच निवडणूक लढवतील यात शंका नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं मताधिक्य वाढवण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न असेल.

नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून २०१४ ला काँग्रेसकडून प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी निवडणूक लढवली होती. यंदाही त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. पण त्यांच्यासोबतच काँग्रेसमध्ये इच्छुकांचीही मोठी लिस्ट आहे. त्यामुळेच भाजपच्या बालेकिल्ल्यात गटबाजी टाळण्याचं मोठं आव्हान काँग्रेससमोर आहे.

विधानसभा निवडणूक २०१४ चा निकाल

 • देवेंद्र फडणवीस     भाजप        १,१३,९१८ मतं
 • प्रफुल्ल गुडधे      काँग्रेस         ५४,९७३ मतं
 • राजेंद्र पडोळे        बसपा        १६५४० मतं
 • देवेंद्र फडणवीस विजयी- ५८,९४५

पूर्व नागपूर विधानसभा (Nagpur East)

गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सर्वाधिक मताधिक्य देणारा हा मतदारसंघ. 2009 पूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसचा गड होता. पण 2009 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार कृष्णा खोपडे यांनी काँग्रेसला धक्का दिला, आणि पूर्व नागपुरात कमळ फुललं. त्यानंतर 2014 मध्येही भाजपचे कृष्णा खोपडे या मतदारसंघातून विजयी झाले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पूर्व नागपुरातून नितिन गडकरी यांना 75000 मतांची आघाडी मिळाली, नागपूर शहरातून आ. कृष्णा खोपडे यांच्या मतदारसंघातील ही सर्वाधिक आघाडी आहे. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत कृष्णा खोपडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तर काँग्रेसकडून अभिजीत
वांजारी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे आणि उमाकांत अग्निहोत्री यांनी उमेदवारीसाठी दावेदारी केली आहे.

2014 विधानसभा निकाल

उमेदवार        पक्ष       मिळालेली मतं

कृष्णा खोपडे    भाजप       ९८९४३ मतं

अभिजित वंजारी   काँग्रेस       ५०४६९ मतं

भाजप- कृष्णा खोपडे विजयी –४८,४७४ मतांनी

 नागपूर मध्य मतदारसंघ (Nagpur Central Vidhansabha)

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचं मुख्यालय असलेला हा मतदारसंघ. मध्य नागपूर मतदारसंघात पूर्वी काँग्रेसचा बोलबाला होता. पण भाजपनं इथली जातीय समीकरणं अचूक टिपली, आणि 2009 साली हलबा समाजाला तिकीट देण्यात आलं. त्यात भाजपला यश आलं. 2014 च्या निवडणुकीतंही तेच समीकरणं होतं, आणि दुसऱ्यांदा भाजपचे विकास कुंभारे मध्य नागपुरातून आमदार झाले. आता आगामी निवडणुकीत मध्य नागपुरातील भाजपचा उमेदवार बदलाचीही जोरात चर्चा आहे. पण हलबा समाजाचं प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात जातीय समीकरण जुळवण्याचं मोठं आव्हान भाजपच्या नेत्यांसमोर आहे.

मुस्लीम समाजाची निर्णायक मतं आणि संघ मुख्यालयाचा मतदारसंघ अशी, मध्य नागपूरची ओळख आहे. या मतदारसंघातून आमागी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अनेक इच्छुक आहेत. त्यात नंदा पराते, अनिस अहमद हे प्रबळ दावेदार आहेत.

२०१४ विधानसभा निकाल

उमेदवार        पक्ष       मिळालेली मतं

विकास कुंभारे    भाजप       ८७,५२३ मतं

अनिस अहमद   काँग्रेस       ४९,४५२ मतं

भाजप- विकास कुंभारे विजयी – ३८,०७१ मतांनी

दक्षिण नागपूर मतदारसंघ (Nagpur South Vidhansabha)

दक्षिण नागपूर मतदारसंघ कधी काँग्रेस तर कधी भाजपच्या ताब्यात राहिला आहे. पण या मतदारसंघात उमेदवाराच्या चेहऱ्यावरंही बरंच काही अवलंबून आहे. लोकसभा निकालात या मतदारसंघात भाजपला चांगली आघाडी मिळाली आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार सुधाकर कोहळ यांनी दक्षिण मतदारसंघात आपली दावेदारी केली. पण मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय माजी आमदार मोहन मते यांनीही जोरात तयारी सुरु केली आहे. भाजपच्या उमेदवारीसाठी त्यांचीही प्रबळ दावेदारी आहे. तर काँग्रेसमध्येही इच्छुकांची मोठी यादी आहे. यात सर्वात आघाडीवर नाव आहे ते प्रमोद मानमोडे यांचं, याशिवाय विशाल मुत्तेमवार यांच्या नावाचीही काँग्रेसकडून चर्चा आहे.

युतीमध्ये दक्षिण नागपूर हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे, आगामी निवडणुकीत युती झाल्यास, दक्षिण नागपूरवर शिवसेनेनं दावा केलाय. सेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी, माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, किरण पांडव, किशोर कुमेरीया
यांनी उमेदवारीसाठी दावेदारी केली आहे.

२०१४ विधानसभा निकाल

उमेदवार        पक्ष       मिळालेली मतं

सुधाकर कोहळे    भाजप       ८०६९९ मतं

सतीश चतुर्वेदी   काँग्रेस       ३७८८९ मतं

किरण पांडव     शिवसेना     १३७५० मतं

भाजप- सुधाकर कोहळे विजयी – ४२,८१० मतांनी 

उत्तर नागपूर मतदारसंघ (Nagpur North Vidhansabha)

 शहरात काँग्रेसचा सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून उत्तर नागपूरची ओळख होती. उत्तर नागपुरात दलित मतदारांची मोठी संख्या आहे. त्यामुळेच या मतदारसंघानं कधी काँग्रेच्या पंजाला साथ दिली, तर कधी रिपब्लिकनं पक्षाला साथ दिली. पण काँग्रेच्या गटबाजीमुळे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर नागपूरात कमळ फुललं. आणि भाजपचे डॉ. मिलिंद माने उत्तर नागपूर मतदारसंघातून निवडून आले. या निवडणुकीतंही भाजपकडून डॉ. मिलिंद माने यांची प्रबळ दावेदारी आहे. तर काँग्रेसकडून माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांची प्रबळ दावेदारी आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर नागपूरात काँग्रेसला आघाडी मिळाली होती, त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तर भाजपनंही लोकसभा निवडणुकीनंतर उत्तर नागपुरकडे विशेष लक्ष दिलं आहे. शिवाय भाजपकडून उमेदवार बदलाचीही जोरात चर्चा आहे.

पश्चिम नागपूर विधानसभा मदारसंघ (Nagpur Waste Vidhansabha) 

पश्चिम नागपूर मतदारसंघातून सलग दोन वेळा भाजपचे सुधाकर देशमुख निवडून आले. पण गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेच्या मतांमध्ये फासरं फरक नव्हतं. त्यामुळेच या मतदारसंघात काँग्रेसलाही आशा आहे. या कुणबी बहुल मतदारसंघावर गेल्या काही दिवसांत भाजपनं पकड मजबूत केली आहे. तर
काँग्रेसंही इथे कंबर कसून आहे. पश्चिम नागपूर मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार सुधाकर देशमुख यांची प्रबळ दावेदारी आहे, पण मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनीही पश्चिम नागपूरवर आपली दावेदारी केलीय. त्यामुळे इथे भाजप उमेदवार बदलणार की, सुधाकर देशमुख यांना संधी देणार. याकडे इथल्या मतदारांचं लक्ष लागलंय. तर काँग्रेसकडून शहर अध्यक्ष विकास ठाकरे, माजी आमदार आशिष
देशमुख यांनी आपली दावेदारी केलीय.

विधानसभा २०१४ चा निकाल

उमेदवार         पक्ष       मतं

सुधाकर देशमुख   भाजप     ८६,५०० मतं

विकास ठाकरे     काँग्रेस     ६०,०९६ मतं

अहमद कादर     बसपा      १४,१९६ मतं

भाजपचे सुधाकर देशमुख -२६,४०४ मतांनी विजयी

नागपूर शहरातील सहा मतदारसंघात बसपाचे कॅडरबेस मतदार आहेत, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर नागपूरातून बसपाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. पण आता वंचित आघाडीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बसपाची मतं विभागली जाणार आहे. शिवाय आघाडीत वंचित आघाडी येणार का, किंवा शिवसेना आणि भाजपची युती होणार का? यावरंही इथल्या विधानसभा मतदारसंघातील मतांची गणितं अवलंबून आहेत.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI