पालघरचा आढावा : भूकंपाने हादरणाऱ्या पालघरमध्ये विधानसभेला राजकीय भूकंप?

पालघर जिल्हा नेहमीच कुपोषणसारख्या विविध समस्यांनी ग्रासलेला असल्याने, नेहमीच चर्चेत राहिला आहे. सध्या तर पालघर जिल्हा गेल्या 10 महिन्यांपासून सतत भूकंपाने हादरत आहे. भूकंपाच्या धक्क्यासोबत जिल्ह्यात कोणते राजकीय भूकंप होत आहेत याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

पालघरचा आढावा : भूकंपाने हादरणाऱ्या पालघरमध्ये विधानसभेला राजकीय भूकंप?
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 8:04 PM

पालघर : पालघर जिल्हा नेहमीच कुपोषणसारख्या विविध समस्यांनी ग्रासलेला असल्याने, नेहमीच चर्चेत राहिला आहे. सध्या तर पालघर जिल्हा गेल्या 10 महिन्यांपासून सतत भूकंपाने हादरत आहे. भूकंपाच्या धक्क्यासोबत जिल्ह्यात कोणते राजकीय भूकंप होत आहेत याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये डहाणू, बोईसर, विक्रमगड, पालघर, वसई, नालासोपारा इत्यादी विधानसभेचा समावेश येतो. डहाणू, बोईसर, विक्रमगड आणि पालघर हे चार विधानसभा क्षेत्र अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. सागरी, नागरी, डोंगरी भौगोलिक परिसर लाभलेल्या पालघरची राज्याचा 36 वा जिल्हा म्हणून 1 ऑगस्ट 2014 रोजी निर्मिती झाली.

विधानसभानुसार पक्षीय प्राबल्य 

पालघर लोकसभा मतदार संघातील वसई, नालासोपारा, बोईसर विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे आमदार 2014 मध्ये निवडून आले होते. हे तिन्ही मतदारसंघ बहुजन विकास आघाडीचे गड राहिले आहेत. विक्रमगड आणि डहाणू विधानसभेत भाजपचे आमदार असून पालघर विधानसभेवर शिवसेनेचे आमदार निवडून आले होते.

1) पालघर विधानसभा मतदारसंघ (Palghar Vidhan sabha)

पालघर जिल्ह्याचे ठिकाण झाल्याने या विधानसभा मतदारसंघावर प्राबल्य निर्माण करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष वेधले आहे. पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र 2009 च्या विधानसभा निवडणुकीत आता शिवसेनावासी झालेले खासदार राजेंद्र गावित हे काँग्रेस कडून 20971 मताधिक्य मिळवून निवडून आले होते. मात्र 2014 मध्ये राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश गेलेले कृष्णा घोडा यांनी गावित यांचा अवघ्या 515 मतांनी पराभव केला.

त्यानंतर शिवसेना आमदार कृष्णा घोडा यांच्या अकाली निधनामुळे पालघर विधानसभेची जागा रिक्त झाली. त्यामुळे लागलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने कृष्णा घोडा यांचे चिरंजीव अमित घोडा यांना उमेदवारी दिली. सहानुभूतीच्या लाटेवर अमित घोडा यांचा विजय झाला.

पालघर विधानसभेचा गड शाबूत ठेवण्यात शिवसेनेला पोटनिवडणुकीत यश मिळाले. मात्र अमित घोडा यांना मिळालेल्या कार्यकाळात म्हणावी तशी छाप पाडता आलेली नाही.

मतदारसंघात विकास कामे करताना आणि आमदार निधीचा फायदा करून देताना आप्तेष्ट आणि जवळच्या कार्यकर्त्यांना करून दिल्याची चर्चा मतदारांमध्ये आहे. त्यामुळे त्यांना यंदा  उमेदवारी दिली जाईल का? यात शंका आहे.

दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी यांची युती होणार की विधानसभेत स्वतंत्र लढणार हे अजूनही निश्चित नाही. त्यातच बहुजन विकास आघाडीचे एक एक शिलेदार सत्ताधारी पक्षाची वाट धरू लागले असल्याने, बविआचा गड ढासळू लागला आहे.

पालघर विधानसभेत काँग्रेस, राष्ट्रवादी स्थिती बिकट झाली असून कोण उमेदवार असतील याबाबत संभ्रम कायम आहे. माजी खासदार दामोदर शिंगडा यांचे चिरंजीव सचिन शिंगडा काँग्रेस राष्ट्रवादीकडून रिंगणात असण्याची शक्यता आहे. तर बहुजन विकास आघाडीकडून माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांचं नाव समोर येत आहे.

पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीवेळी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसनेनेत प्रवेश केलेल्या वनगा कुटुंबियांना लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांना वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासन दिलं होतं. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमधून भाजप आणि भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या राजेंद्र गावित यांना शिवसेनेने उमेदवारी देत वनगा पुत्र श्रीनिवास वनगा यांना डावलले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत श्रीनिवास वनगा यांना पालघर किंवा बोईसर विधानसभेत उमेदवारी देऊन उद्धव ठाकरे आपला शब्द पाळतील का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

परंतु श्रीनिवास वनगा पालघर विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे म्हटले जात आहे. मात्र पक्षातील कट्टर शिवसैनिक कार्यकर्त्यांमधील महिला जिल्हा संघटक वैदेही वाढान या सुद्धा पालघर विधानसभेसाठी इच्छुक आहेत.

पालघर विधानसभा पोटनिवडणूक

  • राजेंद्र गावित : काँग्रेस ४८,१८१ मते
  • अमित घोडा : शिवसेना ६८,१८१ मते विजयी
  • मनीषा निमकर: बविआ ३६,७८१ मत
  • राजेंद्र गावित यांचा १८, ९४८ मतांनी पराभव

2) बोईसर विधानसभा मतदारसंघ (Boisar Vidhan sabha) 

बोईसर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघावर बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व आहे. बोईसर विधानसभा मतदारसंघ हा पालघर आणि वसई तालुक्यातील काही भाग मिळून 2009 च्या पुनरर्चनेनंतर नव्यानं निर्माण झाला.

बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये लहान-मोठे असे 1600 च्या वर कारखाने आणि रासायनिक कारखाने असून देशातील मोठ्या औद्योगिक क्षेत्रापैकी एक असलेल्या बोईसर एमआयडीसीसाठी ओळखला जातो. मात्र हाच विधानसभा मतदारसंघ सध्या सर्वाधिक प्रदूषित म्हणूनही ओळखला जात आहे.

2014 च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीकडून पुन्हा विलास तरे निवडून आले त्यांनी शिवसेनेच्या कमलाकर दळवी यांचा पराभव केला. तर भाजपमधून निवडणूक लढवत जगदीश धोडी तिसऱ्या क्रमांकावर राहिले. मात्र 25 ऑगस्ट रोजी बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे यांनी शिवसेनेत घरवापसी केली.

त्यामुळे बोईसर विधानसभेतील राजकीय समीकरणे बदलून गेली. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात आदिवासीसह कुणबी, वंजारी आणि परप्रांतीय मतदार मोठ्या प्रमाणात आहेत.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाड़ीकडून दुसऱ्यांदा विलास तरे निवडून आले होते. त्यांनी शिवसेनेच्या कमलाकर दळवी यांचा पराभव केला. तर भाजपमधून निवडणूक लढवत जगदीश धोडी तीन क्रमांकाची मते मिळवली होती. त्यानंतर जगदीश धोंडी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने त्यांची कोकण विकास पाटबंधारे महामंडळावर उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. या महामंडळाच्या माध्यमातून जगदीश धोडी यांनी कामाचा सपाटा लावला.

जगदीश धोडी पुन्हा रिंगणात उतरून विलास तरेंना टक्कर देण्याच्या तयारीत होते. मात्र आता विलास तरेच शिवसेनेत आल्याने गणितच बिघडलं आहे.

आयात उमेदवार लादला जाण्याची शक्यता असल्याने स्थानिक शिवसैनिक आणि पदाधिकारी नाराज आहेत. बाहेरील उमेदवार शिवसेनेकडून लादला गेल्यास येथे मोठा विरोध होण्याची चिन्हं आहेत. एकूणच काही उमेदवार बंडखोरीही करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. परंतु विलास तरे यांच्या घरवापसीने इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फिरले असले तरी कट्टर शिवसैनिक तरे यांना उमेदवारी दिल्यास साथ देतील का हा मोठा प्रश्न आहे.

तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदारच पक्ष सोडून गेल्याने बोईसर विधानसभा क्षेत्रासाठी नवीन उमेदवार देतील की बोईसर विधानसभेसाठी चर्चेत राहिलेले राजेश पाटील यांना उमेदवारी मिळते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

विधानसभा निहाय 2014 मधील मतदान आकडेवारी

बोईसर विधानसभा मतदार संघ 2014  

  • विलास तरे : बहुजन विकास आघाडी 64550 विजयी
  • कमलाकर दळवी : शिवसेना 51677
  • जगदीश धोडी : भाजप :30228

3) डहाणू विधानसभा मतदारसंघ (Dahanu Vidhan sabha)

पालघर लोकसभा मतदारसंघातील 128 डहाणू विधानसभा मतदारसंघ, हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. त्यामध्ये डहाणू आणि तलासरी तालुक्याचा समावेश होतो. या मतदारसंघात पूर्वीपासून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि कम्युनिस्ट पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. सर्वाधिक काळ कम्युनिस्ट पार्टीच्या आमदारांना संधी मिळाली. त्यामुळे डहाणू विधानसभा मतदारसंघ “लाल बावट्याचा’ बालेकिल्ला मानला जात होता. रामजी वरठा, राजाराम ओझरे यांनी येथे विजय मिळवला होता. मात्र, 2014च्या विधानसभा निवडणुकीवेळी कम्युनिस्टांच्या अंतर्गत वादाने उमेदवारी नाकारलेल्या आमदारपुत्राने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग पेरले.

एकीकडे विकास आणि मोदी लाट तर दुसऱ्या बाजूने कम्युनिस्ट पक्षांतर्गत उफाळलेला वाद याचा फायदा भाजपच्या पास्कल धनारे यांना झाला. 2014 मध्ये प्रथमच धनारे यांच्या रूपाने डहाणू मतदारसंघात कमळ उमलले. या निवडणुकीत 16 हजार 700 मतांनी दणदणीत विजय मिळवून कम्युनिस्ट पक्षाच्या अभेद गडाला भाजपने सुरुंग लावून फोडला.

डहाणू विधानसभा निवडणुकीत सीपीएमचे उमेदवार बारक्या मांगात यांना धोबीपछाड देत भाजपचे पास्कल धनारे विजयी झाले होते. तर राष्ट्रवादीचे काशीनाथ चौधरी यांना तीन नंबरची मते मिळाली होती.

2014 पूर्वी युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीएमच्या समोर सेनेला येथे विजय मिळवता आला नव्हता. मात्र 2014 मध्ये राज्यात युती तुटली आणि भाजपने मोदी लाटेचा फायदा घेत प्रथमच आमदारकी पदरात पाडून घेतली.

मात्र नव्या आमदारांनी या भागात विकासकामे केलेली नाहीत असा ठपका नागरिकांनी ठेवल्याने धनारे यांच्याबद्दल नाराजीचा सूर उमटला आहे. आमदार मतदारसंघात परत फिरकलेच नाही अशी टीकाही होत आहे. इतकेच नव्हे तर प्रथमच आमदार झालेल्या आमदारांनी निवडणुकीत कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्ककडून 100 बॉक्स दारूची मागणी केल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. नंतर सदर प्रकरण बासनात गुंडाळून थंड करण्यात आला.

डहाणू मतदारसंघात आदिवासी मतांचे प्रमाण अधिक आहे. वंचित बहुजन आघाडी, भारतीय ट्रायबल पार्टी, आदिवासी संस्कृती पक्ष, आदिवासी अस्मिता पार्टी, बहुजन क्रांती मोर्चा हे पक्ष देखील या मतदारसंघात तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात आहेत. कम्युनिष्ट पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची यादी मोठी आहे. नव्याने वाटचाल करणाऱ्या पालघर विकास आघाडीच्या वतीने उमेदवार उभे करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

विद्यमान आमदार धनारे यांच्याबद्दल स्वपक्षातच मोठी नाराजी व्यक्त होत आहे. आमदार धनारे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतरही माकपाच्या सत्ता असलेल्या ग्रामपंचायती आणि नगरपंचायतीवर सत्ता स्थापन करण्यास अपयशी ठरले. आगामी विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांची महाआघाडी आणि महायुतीवरही या मतदारसंघातील राजकीय गणिते अवलंबून आहेत.

परंतु निवडणुकीपूर्वीच आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे यांनी माकपाच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत पक्षप्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. तर मागील निवडणुकीतील सीपीएमचे माजी आमदार राजाराम ओझरे यांचे सुपुत्र सुधीर ओझरे यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची घड्याळ हाती बांधून घेत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यावेळी त्यांच्या भूमीकेकडे देखील सर्वांचे लक्ष राहणार असून माकपकडून काबीज केलेला गड भाजपला पुन्हा शाबूत ठेवण्यासाठी चुरशीच्या लढाईला सामोरे जावे लागणार आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत युतीचे राजेंद्र गावित हे डहाणू मतदारसंघात 9 हजारांपेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर पडल्याने विद्यमान आमदार यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केली होती. त्यातच लोकसभेच्या मतांची गोळाबेरीज पाहता भाजपला ही जागा राखणे अवघड ठरू शकते. माकपने पुन्हा जुने उमेदवार अथवा तरुण उमेदवार न दिल्यास त्याचा थेट फायदा भाजपाला होण्याची दाट शक्यता असून माकपासाठी भविष्यात सत्ता काबीज करण्यात वाट बिकट होणार आहे.

विधानसभा निहाय 2014 मधील मतदान आकडेवारी

● डहाणू विधानसभा

  • पास्कल धणारे : भाजप : 44,849 विजयी
  • बारक्या मांगात : सिपीएम 28,149
  • काशिनाथ चौधरी : राष्ट्रवादी काँग्रेस 27,963

4) विक्रमगड विधानसभा (Vikramgad Vidhan sabha)

विक्रमगड विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे विष्णू सावरा प्रतिनिधीत्व करतात. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सावरा हे मंत्री होते. मात्र विस्तारामध्ये त्यांना बाजूला करण्यात आलं. 2014 मधील निवडणुकीत विष्णू सावरा यांनी शिवसेनेच्या प्रकाश निकम यांना जवळपास 4 हजार मतांनी पराभव केला होता.

विधानसभा निहाय 2014 मधील मतदान आकडेवारी

● विक्रमगड विधानसभा

  • विष्णू सावरा : भाजप 40201विजयी
  • प्रकाश निकम : शिवसेना 36356
  • सुनील भुसारा: राष्ट्रवादी काँग्रेस 32,053

5) वसई विधानसभा (Vasai Vidhansabha)

वसई विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर विद्यमान आमदार आहेत. त्यांनी 2014 मध्ये विवेक पंडीत यांचा पराभव केला होता.

● वसई मतदार संघ

  • एकूण मतदार : 2,90,944
  • हितेंद्र ठाकूर 97291 बहुजन विकास आघाडी (विजयी )
  • विवेक पंडित : 65395 दोन नंबरची मते

6) नालासोपारा विधानसभा मतदारसंघ (Nalasopara vidhan sabha)

नालासोपारा विधानसभा मतदारसंघात सध्या बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर आमदार आहेत. त्यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या राजन नाईक यांचा पराभव केला.

  • नालासोपारा विधानसभा मतदारसंघ 
  • एकूण मतदार 3,96,240
  • क्षितीज ठाकूर : बहुजन विकास आघाडी : 1,13,566 विजयी
  • नाईक राजन : भाजप 59,067
Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.