पालघर ZP निकाल : पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता, भाजपला धक्का

राज्यात आज (8 जानेवारी) सहा जिल्हा परिषदेचा निकाल (Palghar zilla parishad election result) समोर आला आहे.

पालघर ZP निकाल : पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता, भाजपला धक्का
| Edited By: | Updated on: Jan 08, 2020 | 7:31 PM

पालघर : राज्यात आज (8 जानेवारी) सहा जिल्हा परिषदेचा निकाल (Palghar zilla parishad election result) समोर आला आहे. यामध्ये पालघर जिल्हा परिषदेवरही महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. याशिवाय नंदुरबार, नागपूर, वाशिम येथेही महाविकासआघाडीने विजय मिळवला आहे. तर धुळ्यात भाजपने जिल्हा परिषदेवर विजय मिळवला असून अकोल्यात वंचित बहुजन आघाडीची सत्ता येण्याची शक्यता दिसत आहे. सहापैंकी पाच ठिकाणी पराभव झाल्यामुळे भाजपला (Palghar zilla parishad election result) मोठा धक्का बसला आहे.

पालघरमध्ये आज जिल्हा परिषद आणि त्यां अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी पार पडली. या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. तसेच ही निवडणूक जिल्हा परिषदेच्या 57 तर आठ पंचायत समित्यांच्या 114 जागांसाठी झाली होती. मात्र जिल्हा परिषदेच्या 57 जागांपैकी शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळवण्यात यश आलं आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 57 पैकी शिवसेना 18, राष्ट्रवादी काँग्रेस 15, भाजप 10, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 6, बहुजन विकास आघाडी 4, अपक्ष 3 तर काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानवं लागलं आहे.

57 जागांपैकी बहुमतासाठी 29 जागांची गरज असली तरी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडी सत्तेत येणार असल्याचे चित्र आहे. गेल्यावेळेस शिवसेना-भाजप युती आणि बहुजन विकास आघाडी अशा तिघांकडे पालघर जिल्हा परिषदेची सत्ता होती. पण यावेळी राज्यातील सत्ता बदलामुळे पालघर जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचे दिसत आहे.

जिल्हा परिषदेच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपला मागे टाकण्यात शिवसेना राष्ट्रवादीला यश आल्याचं पहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेसह झालेल्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीत मोखाडा आणि पालघर या पंचायत समित्या शिवसेनेकडे, तालासरी पंचायत समिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे, जव्हार पंचायत समिती भाजपाकडे, विक्रमगड पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उर्वरित डहाणू, वाडा आणि वसई या तीन पंचायत समित्यांवर महाविकास आघाडीला संमिश्र यश आल आहे.

पालघर जिल्हा परिषद निकाल

जिल्हा परिषद एकूण जागा -57

जाहीर झालेला निकाल-57

  • राष्ट्रवादी 15
  • भाजपा -10
  • काँग्रेस -00
  • शिवसेना -18
  • अपक्ष- 13