माझ्याविरोधात सामना करण्यास तयार रहा, पराभूत झाल्यास राजकारणातून निवृत्ती घेतो, सोलापुरात ‘राजकीय दंगल’, कोठेंचं देशमुखांना आव्हान

| Updated on: Oct 26, 2021 | 1:03 PM

राज्यात आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीची चर्चा सुरु असताना इकडे सोलापुरात मात्र येत्या विधानसभेची रंगीत तालीम सुरु असल्याचं चित्र दिसू लागलं आहे.

माझ्याविरोधात सामना करण्यास तयार रहा, पराभूत झाल्यास राजकारणातून निवृत्ती घेतो, सोलापुरात राजकीय दंगल, कोठेंचं देशमुखांना आव्हान
महेश कोठे आणि विजयकुमार देशमुख
Follow us on

सोलापूर : राज्यात आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीची चर्चा सुरु असताना इकडे सोलापुरात मात्र येत्या विधानसभेची रंगीत तालीम सुरु असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. काँग्रेस, शिवसेना असा प्रवास करत राष्ट्रवादीच्या वाटेवर जाऊन आमदारकीचे स्वप्न पाहणारे महेश कोठे आता थेट सोलापूर उत्तर भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांना महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या किंवा आपल्या मुलाच्या विरोधात निवडणुकीत उतरण्याचे आव्हान दिलंय आणि या निवडणुकीत देशमुख जिंकले तर राजकारणातून संन्यास घेईन अशी घोषणाही केलीय.

कोठेंचा राजकीय प्रवास

महेश कोठे सोलापूर महानगर पालिकेच्या राजकारणातील चर्चेतील नाव. कोठे हे काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांचे निष्ठावंत असलेले स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांचे चिरंजीव आहेत. 2014 साली कोठेंनी काँग्रेसला रामराम करत शहर मध्य मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती, तर 2019 मध्ये शिवसेनेने तिकीट नाकारल्यामुळे शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करत शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती.

शरद पवारांकडून कोठेंवर महापालिकेची जबाबदारी?

त्यामुळे महेश कोठे हे काँग्रेस, शिवसेना करत आता राष्ट्रवादीच्या वाटेवर आमदारकीचे स्वप्न आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. शिवाय राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी यांनी महापालिकेची जबाबदारी दिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आता भलताच वाढल्याचं चित्र आहे.

माझ्याविरोधात सामना करण्यास तयार रहा, हरल्यास राजकारणातून निवृत्ती घेतो

आघाडीच्या जागा वाटपाच्या सूत्रानुसार सोलापूर उत्तर विधानसभा हे राष्ट्रवादीच्या वाट्याला येते. त्यामुळे या मतदार संघात कोठे निवडणूक लढणार असल्याची शक्यता आहे. म्हणूनच ते शहर उत्तर विधानसभेतुन चौथ्यांदा प्रतिनिधित्व करणारे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनाच आवाहन देतायत.

नगरसेवक महेश कोठे आणि त्यांचे पुत्र प्रथमेश कोठे हे ज्या घरकुल विभागाचे नगरसेवक आहेत तिथून निवडणूक लढवून निवडणूक रिंगणात उतरण्याचं त्यांनी आव्हान दिलंय. तुम्ही जर मला पराभूत केलं तर राजकारणातून संन्यास घेणार घेईन, असं आव्हानही त्यांनी दिलंय.

तर इकडे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी सुद्धा महेश कोठे यांना चांगलंच प्रत्युतर दिलं. माझ्या पेक्षा महेश कोठे राजकारणात आधी आहेत. कोठे यांना तीन वेळा आमदारकीसाठी पक्ष बदलावे लागले. पक्ष बदल्यानंतर लोकांचा विश्वास मिळत नसतो, त्यासाठी लोकांची कामे करावी लागतात, असा टोला विजयकुमार देशमुख यांनी लगावलाय.

हे ही वाचा :

काँग्रेस आणि शिवसेनेची स्वतंत्र बैठक, तर पवारही दिवाळीनंतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार; पुणे महापालिकेसाठी आघाडी होणार का?

समीर वानखेडेंनी माझ्या मुलीचा सीडीआर मागितला, माझी मुलगी गुन्हेगार आहे काय?; नवाब मलिक भडकले