Bengal By-Poll : ममता बॅनर्जीं उमेदवारी अर्ज भरणार, भाजपकडून पुन्हा तगडा उमेदवार मैदानात

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी (Mamata Banerjee) आज भवानीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Bhawani pore Assembly Seat) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Bengal By-Poll : ममता बॅनर्जीं उमेदवारी अर्ज भरणार, भाजपकडून पुन्हा तगडा उमेदवार मैदानात
mamata Banerjee Priyanka Tibrewal

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी (Mamata Banerjee) आज भवानीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Bhawani pore Assembly Seat) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्याविरोधात भाजपनेही (BJP) फिल्डिंग लावली आहे. या हायव्होल्टेज लढतीसाठी भाजपने वकील प्रियांका टिबरेवाल (Priyanka Tibrewal) यांना उमेदवारी दिली आहे. तर माकपाने श्रीजीत विश्वास (Srijeet Biswas) यांना मैदानात उतरवलं आहे. दुसरीकडे काँग्रेसने भवानीपूरमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे.

निवडणूक आयोगाने गेल्याच आठवड्यात पश्चिम बंगालमधील तीन विधानसभा निवडणुकांच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली. पश्चिम बंगालमध्ये काही महिन्यापूर्वी विधानसभा निवडणूक झाली होती. त्यावेळी 294 जागांपैकी 213 जागांवर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने विजय मिळवत, भाजपला चारीमुंड्या चीत केलं. भाजपचा पराभव झाला मात्र 77 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला.

दुसरीकडे त्या निवडणुकी ममता बॅनर्जी यांनी आपला पारंपारिक मतदारसंघ भवानीपूर सोडून नंदीग्राममधून निवडणूक लढल्या होत्या. मात्र तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेल्या शुभेंदू सरकार यांनी त्यांचा पराभव केला होता.

ममता बॅनर्जींचा नंदीग्राममध्ये पराभव

ममता बॅनर्जी यांनी एकहाती झुंज देत पश्चिम बंगालमध्ये 213 जागांसह बहुमत प्राप्त केलं. पण नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव त्यांचेच जुने सहकारी आणि या निवडणुकीत भाजपवासी झालेल्या शुभेंदू अधिकारी यांनी केला. या निवडणुकीत ममता यांना अवघ्या 1 हजार 956 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. या निकालानंतर नंदीग्राममधील मतदान आणि निवडणूक प्रक्रियेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसंच आरोप-प्रत्यारोपही झाले.

2011 मध्ये ममता बॅनर्जी भवानीपूरमधून विधानसभेवर

2011 मध्ये जेव्हा तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आली तेव्हाही ममता बॅनर्जी या विधानसभेच्या सदस्य नव्हत्या. तेव्हा त्यांनी भवानीपूरमधून पोटनिवडूक लढवली आणि विधानसभेवर गेल्या. 2011 च्या निवडणुकीत सुब्रत बख्शी यांचा विजय झाला होता. तेव्हा त्यांनी ममता यांच्यासाठी आपली जागा देऊ केली. तेव्हा ममता यांनी सीपीएमच्या उमेदवार नंदिनी मुखर्जी यांचा 95 हजाराच्या फरकारने पराभव केला होता. तेव्हा भाजप पश्चिम बंगालमध्ये 3 नंबरचा पक्ष ठरला होता.

कोण आहेत प्रियांका टिबरेवाल

भाजपने ममता बॅनर्जींविरोधात प्रियांका टिबरेवाल यांना मैदानात उतरवलं आहे. प्रियांका टिबरेवाल यांनी निवडणुकीतील हिंसाचारावरुन ममता सरकारला वारंवार कोर्टात घेरलं होतं. भाजप नेते बाबूल सुप्रियो यांच्या कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. सुप्रियो यांच्या सल्ल्यानेच त्यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2015 मध्ये त्यांनी कोलकाता नगर परिषदेची निवडणूक लढवली. मात्र तृणमूलच्या स्वपन समदार यांनी त्यांचा पराभव केला.

संबंधित बातम्या  

ममता बॅनर्जी भवानीपूरमधून विधानसभेवर जाणार, कृषीमंत्री शोभनदेव चट्टोपाध्याय यांचा राजीनामा 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI