AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा आता सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; पंकजा मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर जरांगेंचे खळबळजनक विधान

राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या निवृत्तीच्या विधानानंतर मोठी खळबळ माजली आहे. यावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देत धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

हा आता सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; पंकजा मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर जरांगेंचे खळबळजनक विधान
Pankaja mundheImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 03, 2026 | 3:39 PM
Share

भाजप नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकताच केलेल्या वक्तव्याने खळबळ माजली आहे. पंकजा मुंडेंनी रिटायर व्हावसं वाटतं असं म्हणताच राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. आता यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांनी थेट धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, रिटायर झाल्या तर (धनंजय मुंडे) हा सगळ्या दुनियेत धिंगाणा घालीन. वारसाच मोडला मग… पंकजा मुंडे कंटाळा आला म्हणून जर बाजूला गेल्या तर सगळा समाज मोडून टाकेल. गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा चालवण्याची हिंमत (पंकजा मुंडे) त्यांच्याकडे आहे. खूप गरीबीतली जात त्यांनी वर काढलेली आहे आणि या जर बाजूला गेल्या तर ती जात पूर्ण जेलमध्ये घालेल हा, गोरगरिबांना अन्नापासून वंचित करेल हा (धनंजय मुंडे)

पुढे मनोज जरांगे पाटील म्हणाले की, यापुढे मराठ्यांच्या नादी लागायचं नाही. मराठ्यांसोबत मारामारी बंद नाहीतर मी पठ्ठ्या आहे. दोन-तीन वेळा तुला आता वाचवले आहे नाहीतर तुला मध्ये घालीन. मस्त जोकच्या प्रकरणात आणि माझ्या खुनाच्या गटात शंभर टक्के तू आहेस. मात्र तू वाचवलेला आहे. माझ्या घातपाताच्या प्रकरणात तू आहेस. फडणवीस, अजित दादा आणि शुक्ला यांना घेऊन बसलास तिथे तुला वाचवले, तो सगळा डाटा फडणवीसांकडे आहे तो कधी पण बाहेर येऊ शकतो, हे मी जबाबदारीने बोलत आहे. तु पाप करायचं बंद केलं आणि मराठ्यांना त्रास देणं बंद केलं तर काहीतरी होईल नाहीतर तुझे वाईट दिवस येणार चांगले दिवस येणार नाहीत.

धनंजय मुंडे यांच्याविषयी काय म्हणाले?

पुढे धनंजय मुंडे यांच्याविषयी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जेव्हा काळ होता तेव्हा नीट खाता नाही आलं, मराठ्यांसह सगळ्या जातींनी मोठं केलं आणि टोळीने ओरबाडून खाल्लं. ना ओबीसी मोठा होऊ दिला ना मराठा मोठा होऊ दिला, मारामारीत वेळ जास्त घातला. तु शहाणा हो मराठ्यांच्या नादी लागू नको. कोणताही पक्ष, कोणीही तुला जवळ करणार नाहीत. काळ यायचा काळ गेला आता मध्ये जायचा वेळ आला आहे.

काय म्हणाल्या होत्या पंकजा?

परळी महामार्गाच्या दुरवस्थेवर भाष्य करताना राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी भावनिक वक्तव्य केले होते. या रस्त्यावर खडकत-खडकत आले आणि पीएला म्हटलं, आता कंटाळा आलाय. राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतं, असे त्या म्हणाल्या होत्या. मात्र, सभास्थळी उपस्थित नागरिकांचा उत्साह पाहिल्यानंतर आपल्याला नव्याने प्रेरणा मिळाल्याचेही त्यांनी म्हटले. ही लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी नाही, तर तुमचा विकास करण्यासाठी आहे, असे म्हणत त्यांनी विकासाची ग्वाही दिली. पंकजा मुंडे यांनी अचानक केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी