AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला मनोज जरांगे यांचं आव्हान; थेट मुलींनाच म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर समाजाने पुन्हा एकदा विश्वास ठेवला आहे आणि 13 तारखेपर्यंत सगे सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्येप्रमाणे ते करतील अशी आशा असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

सरकारच्या 'त्या' निर्णयाला मनोज जरांगे यांचं आव्हान; थेट मुलींनाच म्हणाले...
मनोज जरांगे पाटील, देवेंद्र फडणवीसImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jul 04, 2024 | 6:16 PM
Share

जालना – राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलनानंतर मराठा समाजाला दिलेले आश्वासन पाळले पाहीजे. सरकारकडे यंत्रणा आहे. आम्ही आंदोलक आहोत. त्यामुळे आम्हाला विश्वास ठेवावा लागेल. सगे सोयरेची व्याख्या, हैदराबाद, बॉम्बे आणि सातारा गॅझेटबाबत येत्या 13 तारखेपर्यंत सरकार निर्णय घेईल असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. एक आंदोलक म्हणून समाजाची जवाबदारी आपण पेलतो, तर सरकारवर विश्वास ठेवावा लागतो. आडमुठी भूमिका घेतल्याने समाजाचे कल्याण होणार नाही. शंभूराजे देसाई ज्यावेळी आले होते, त्यावेळी समाजाला विचारून आपण सरकारला एक महिना वेळ दिला होता असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर समाजाने पुन्हा एकदा विश्वास ठेवला आहे आणि 13 तारखेपर्यंत सगे सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्ये प्रमाणे ते करतील आणि हैदराबाद गॅझेटसाठीही तीन पत्रं दिल्याचे विधानसभेत शंभूराजे देसाई यांनी सांगितले आहे. त्यामुळे 13 तारखेपर्यंत आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. सरकारने मराठा समाजाला जे दहा टक्के आरक्षण दिले होते त्यानूसार मुलांनी जी प्रमाणपत्र काढले होते ते प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास अडचण येत आहे आणि त्यामुळे मराठा समाज पुरता अडचणीत सापडला आहे.

विद्यार्थ्यांना आडकाठी आणू नका

सरकारचा डाव आहे की यावर्षी मराठा समाजाची पोरांची नुकसान करायचं आणि याबाबत मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की अशी विद्यार्थ्यांना आडकाठी आणू नका असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. सरकारने मुलींना मोफत शिक्षणाचा जो अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी होत नाही मग आदेश काढलाच कशाला असा सवाल जरांगे पाटील यांनी केला आहे. सरकार निर्णय घेते पण त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे मराठा समाज नाराज होत आहे. मुलींच्या बाबतीत मोफत शिक्षणाचा जो निर्णय घेतला आहे, त्याचा आज मुलींना फायदा होत नाही आणि जर कोणाला लाभ झाला असेल तर त्या मुलींनी मला येऊन सांगावे असे आव्हानच जरांगे पाटील यांनी मराठा मुलींना केले आहे.

Follow Us
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?