मोठी बातमी! पंकजा मुंडे अन् धनंजय मुंडेंना मनोज जरांगे पाटलांचा मोठा इशारा, थेट म्हणाले, त्या दोघांनी..
Manoj Jarange Patil on Pankaja Munde Dhananjay Munde : नुकताच मनोज जरांगे पाटील यांनी काही गंभीर आरोप करत टीका केली. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावरही जरांगे यांनी टीका केली आहे.

नुकताच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठे विधान केले. विजय वडेट्टीवार यांनी जीआर रद्द करण्याची मागणी केली. त्यावर बोलताना जरांगे यांनी म्हटले की, जीआर रद्द करण्यासाठी ते आता मोर्चा काढत आहे, OBC च्या नावाखाली तो आता काँगेस मोठे करत आहे. दिल्लीचा लाल्या सांगतो मराठ्यांना टार्गेट करा. यावेळी मराठे यांना झपका दाखवणार आहेत. धनगर, माळी असे सर्व जाती मराठयांच्या बाजूने आहे. बोगस आरक्षण खाणारे आता मराठ्यांना विरोध करत आहेत. फडणवीस अडचणीत आणायचे काम आता हे करत आहे, परळीची टोळी आणि भुजबळ, वड्डेटीवार हे विरोध करत आहेत, असे त्यांनी म्हटले.
आपल्यापेक्षा हुशार फडणवीस आहेत, त्यांनी लक्ष ठेवावं. येवल्यावाला दुसऱ्यांना नेता होऊ देत नाही. असेही जरांगे यांनी म्हटले. पुढे मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत म्हटले की, त्या दोघांनी भुजबळच्या नादी लागू नये, मराठ्यांच्या नादी लागण खुप घातक आहे त्यांच्यासाठी. खूप कष्ट करुन तिथे अस्तित्व निर्माण केलं आहे, जर नादी लागला तर तुमचं नास होईल, राजकिय अस्तित्व उद्ध्वस्त होईल.
मराठ्यांना आरक्षणा विरोधात बोलणारा माणूस संपवावा लागणार आहे. मराठ्यांनो आपले थोडे काम केले म्हणून पाय चाटू नका विरोध करणाऱ्यांचे. यांना यांची जागा दाखवावी लागेल. शेतात काम करा पण पाया पडू नका. त्यांच्या व्यासपीठावर जाऊन जो विरोध करेल तो लक्षात ठेवायचा. OBC नेता मराठ्यांच्या विरोधात बोलला की, त्यांचा काटा काढायचा. मराठा नेते खाली मान घालून बसलेत त्यांना आव्हान आहे, त्यांनी बोलाव असे त्यांनी म्हटले.
वेळेवर यांचा गेम करावा लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाही. 450 जाती आहेत OBC मध्ये त्यामुळे हे त्यांचे नेते नाहीत. आमचे 16 % आरक्षण आहे मंडल आयोगाने तुम्हाला 14 % दिले होते, त्याला धक्का लागता कामा नये, मात्र वरचे 16 टक्के आमचे आहे. 50 टक्कांच्या वरचे आरक्षण 2 टक्के ते कसे गेले. 10 तारखेला तुम्ही मोर्चा काढत आहेत, बघू आम्ही पण बोगस आरक्षण खाणाऱ्या विरोधात रस्त्यावर उतरू. 1994 मध्ये ज्या बोगस जाती OBC मध्ये घातल्या त्या रद्द करा.
मुख्यमंत्री कोंडीत नाही ते आता योग्य दिशेने आहेत, भुजबळ त्यांच्या अंगावर सोडत आहेत. त्यांनी ओळखलं आपल्या पक्षातील OBC नेते एकत्र करुन ते फडणवीस यांच्यावर सोडत आहेत. आता पिशव्या भराभरी सुरु झाली. फडणवीस साहेब आता हुशार आहेत त्यांना कळलं मराठे देखील गरजेचे त्यांना माहितीये हा भुजबळ कसा त्यांना ब्लॅकमेल करतो. फडणवीस साहेब यांना कळलं, हे आपल्यावर तुटून पडतात, ते बरोबर काटा यांचा काढतील.
त्यांना एक महिती आहे मराठवाड्याचा मराठ्यांच्या नोंदी आहे त्यांना द्यावाच लागेल. तसच सातारा देखील आहे. परत एकदा जरांगे यांनी म्हटले की, मी हाकेला मोजत नाही. माझं एकच म्हणणे आहे मराठ्यांचे आणि धनगर बांधवांच काही नाही. भुजबळच ऐकून ते वाद घडून आणत आहेत. एखादी लाभार्थी टोळी नास्की निघाली तर लांब जा हे दुसऱ्यांना सुधारू देत नाही. 58 लाख नोंदी आहेत उद्या अजून 2 लाख येणार आहे. मराठ्यांच्या रोष तुझ्यावर पडळकर नाही, तु बोलू नको, असे जरांगे यांनी म्हटले.
