मराठा मोर्चाचं राजकारण केलं तर धडा शिकवू, निवडणूक लढण्यावरुन मराठा मोर्चात फूट

आगामी विधानसभा निवडणुका (Maharashra Assembly election 2019) लढण्यावरुन मराठा मोर्चामध्ये मतमतांतरे असल्याचं उघड झालं आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चा (Maratha Kranti Morcha) निवडणूक लढणार असल्याची घोषणा आबासाहेब पाटील यांनी केली होती.

मराठा मोर्चाचं राजकारण केलं तर धडा शिकवू, निवडणूक लढण्यावरुन मराठा मोर्चात फूट
Follow us
| Updated on: Jul 24, 2019 | 2:50 PM

औरंगाबाद : आगामी विधानसभा निवडणुका (Maharashra Assembly election 2019) लढण्यावरुन मराठा मोर्चामध्ये मतमतांतरे असल्याचं उघड झालं आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चा (Maratha Kranti Morcha) निवडणूक लढणार असल्याची घोषणा आबासाहेब पाटील यांनी केली होती. मात्र आज मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Morcha Aurangabad PC) औरंगाबादेत पत्रकार परिषद घेत, त्या भूमिकेला विरोध दर्शवला.

मराठा क्रांती मोर्चाच्या नावाखाली कुणीही निवडणुका लढवू नये. राजकारणासाठी मराठा क्रांती मोर्चा या नावाचा उपयोग करू नये अशी भूमिका या आजच्या पत्रकार परिषदेत समन्वयकांनी मांडली. जर कुणी मराठा क्रांती मोर्चाचा राजकारणासाठी उपयोग केला तर समाज त्याला धडा शिकवेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

ठोक मोर्चाने काय काल काय म्हटलं होतं?

मराठा आरक्षणानंतरही मराठा क्रांती ठोक मोर्चा सरकारच्या भूमिकेवर समाधानी नाही. त्यामुळेच येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा क्रांती ठोक मोर्चा आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती आबासाहेब पाटील यांनी काल दिली होती.

“गेल्या 35 वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून फक्त राजकीय फायद्यासाठी सर्वच पक्षाने वापर केला जातोय.  केंद्रात आणि राज्यात मराठा लोकप्रतिनिधी समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करत नाहीत. त्यामुळे ठोक मोर्चा येणाऱ्या निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहे”, अशी माहिती मराठा मोर्चातर्फे देण्यात आली होती.

दरम्यान, ठोक मोर्चाच्या या भूमिकेला मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी विरोध दर्शवला आहे.

संबंधित बातम्या  

मराठा समाजाचा मुख्यमंत्री व्हावा, मराठा क्रांती ठोक मोर्चा निवडणूक लढवणार  

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.