AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडकी बहीण योजना म्हणजे सावकारी खेळ; मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल सुरूच

"तुम्ही कितीही पैसे वाटत फिरलात तरीही तुम्हाला आरक्षण हे द्यायलाच लागणार आहे. तुम्ही कितीही पैसे वाटप केलात तरी तुम्ही पडणारच आहात", अशी टीकाही जरांगे पाटील यांनी केली.

लाडकी बहीण योजना म्हणजे सावकारी खेळ; मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल सुरूच
| Updated on: Aug 14, 2024 | 2:15 PM
Share

Manoj Jarange Patil On Ravi Rana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी असंख्य महिला धावपळ करत आहेत. या योजनेबद्दल बडनेराचे आमदार रवी राणा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. “यंदाच्या निवडणुकीत जर तुम्ही आम्हाला भरभरुन आशीर्वाद दिलात तर या 1500 रुपयांचे 3000 रुपये होतील. पण जर हे आशीर्वाद दिले नाही तर मी पण तुमचा भाऊ आहे, हे 1500 रुपये परत घेईन”, असे रवी राणा म्हणाले. आता यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत आहेत. आता नुकतंच त्यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी रवी राणा यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच शिंदे सरकारवरही टीका केली. मी त्या योजनेला नाव ठेवत नाही. ती योजना चांगली असेल. त्या योजनेचा लाभ नक्की घ्यावा. पण आता यावर शंका उपस्थित व्हायला लागली आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

निवडणुकीत पैसे वाटपासाठीच ही योजना सुरु

“आता समाज इतका भोळा राहिलेला नाही. पूर्वी समाज भोळा होता, अडाणी होता. सरकारने एखादी योजना दिली की त्याचा उदो उदो करायचे. मी त्या योजनेला नाव ठेवत नाही. ती योजना चांगली असेल. त्या योजनेचा लाभ नक्की घ्यावा. पण आता यावर शंका उपस्थित व्हायला लागली आहे. काल तुमच्याच एका आमदाराने या योजनेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. तुम्ही जर मतदार केलं नाही तर आम्ही पैसे परत घेऊ, असे ते म्हणाले. याचाच अर्थ तुम्ही जनतेसमोर उघडे पडले आहात. सरकारने ही योजना निवडणुकीत पैसे वाटपासाठीच सुरु केली आहे, हे यातूनच समोर येतंय. पोटातलं ओठावर येतंय, तसंच त्यांच्या तोंडातून हे वक्तव्य निघाले. त्यांना हे बोलायचे नव्हते”, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

“ही योजना म्हणजे सावकारी खेळ”

“ही योजना कशासाठी आहे, याबद्दल सागर बंगल्यावर बसून त्यांचं हे आधीच ठरलेलं असेल. पण काही लोकांना दम निघत नाही. ते पटकन बोलून गेले आणि महाराष्ट्रातील जनतेला याबद्दल समजले. ही योजना म्हणजे मतदान विकत घेतल्यासारखा खेळ आहे. त्यानंतर ही योजना बंद पडणार. योजना चांगली देखील असेल. पण आता तुमचेच लोक म्हणतात की मतदान नाही केलं तर योजना मागे घेऊ. याचाच अर्थ ही योजना म्हणजे सावकारी खेळ आहे”, असा जोरदार हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला.

“या योजनेचा लाभ घ्यायचा की नाही, हे आता तुम्ही ठरवायचे आहे. तुम्ही कितीही पैसे वाटत फिरलात तरीही तुम्हाला आरक्षण हे द्यायलाच लागणार आहे. तुम्ही कितीही पैसे वाटप केलात तरी तुम्ही पडणारच आहात”, अशी टीकाही जरांगे पाटील यांनी केली.

रवी राणा काय म्हणाले होते?

दरम्यान रवी राणा यांनी दिवाळीनंतर राज्यातील महिलांना १५०० रूपयांच्या जागी ३ हजार रूपये देण्यात यावे, असे मी मागणी करेन. तुमचा भाऊ म्हणून मी सरकारला विनंती करेन की १५०० रूपयांच्या जागी ३ हजार रूपये बहिणांना देण्यात यावे. पण हे कधी म्हणता येईल, जेव्हा तुम्ही त्यांना आशीर्वाद द्याल. ज्यांनी आशीर्वाद दिले नाही. मी तुमचा भाऊ आहे, ते १५०० रूपये तुमच्या खात्यातून परत घेईन, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर अनेक नेते संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?.
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं.
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका.
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.