Maratha Reservation : गृहमंत्र्यांनी घेतली संभाजीराजेंची भेट, उपोषण मागे घेण्याची विनंती; संभाजीराजेंचा निर्णय काय?

सकाळी शिवसेना खासदार अनिल देसाई, खासदार राहुल शेवाळे यांनी भेट घेतली. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही आज संभाजीराजे यांच्या भेटीसाठी आझाद मैदानावर पोहोचले. त्यावेळी प्रकृतीची विचारपूस करत उपसमितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहितीही वळसे पाटलांनी दिली. तसंच संभाजीराजे यांना उपोषण मागे घेण्याची विनंतीही त्यांनी केली.

Maratha Reservation : गृहमंत्र्यांनी घेतली संभाजीराजेंची भेट, उपोषण मागे घेण्याची विनंती; संभाजीराजेंचा निर्णय काय?
दिपील वळसे पाटील यांनी संभाजीराजे छत्रपतींची उपोषणस्थळी भेट घेतलीImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 11:19 PM

मुंबई : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chatrapati) यांनी अखेर उपोषणास्त्र हाती घेतलं आहे. संभाजीराजे छत्रपती मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी सत्ताधारी किंवा सरकारकडून कुणीही संभाजीराजे यांच्या भेटीसाठी पोहोचलं नाही. मात्र, आज सकाळी शिवसेना खासदार अनिल देसाई, खासदार राहुल शेवाळे यांनी भेट घेतली. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनीही आज संभाजीराजे यांच्या भेटीसाठी आझाद मैदानावर पोहोचले. त्यावेळी प्रकृतीची विचारपूस करत उपसमितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहितीही वळसे पाटलांनी दिली. तसंच संभाजीराजे यांना उपोषण मागे घेण्याची विनंतीही त्यांनी केली.

संभाजीराजेंना उपोषण मागे घेण्यासंदर्भात विनंती

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मुंबईत आझाद मैदानावर कालपासून उपोषण सुरू केले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज त्यांची आझाद मैदान येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व संभाजीराजेंना उपोषण मागे घेण्यासंदर्भात विनंती केली. मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीतील निर्णयांची माहिती गृहमंत्र्यांनी खा.संभाजीराजे यांना दिली. मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांना अवगत केले, अशी माहिती गृहमंत्रालयाकडून देण्यात आलीय.

प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करणार

त्याचबरोबर मराठा आरक्षणासंबंधी राज्य सरकार सकारात्मक असून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. मराठा समाजातील युवक व विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, यासाठी विविध शासकीय योजनांमधून राज्य सरकार मदत देऊ करत आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी मांडलेले प्रश्न लवकर सुटलेच पाहिजेत. मात्र छत्रपती संभाजीराजे यांची प्रकृती देखील आमच्यादृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावेत यासाठी राज्य सरकारशी चर्चा करून प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया गृहमंत्र्यांनी याप्रसंगी दिली.

उपोषण सुरुच ठेवणार – संभाजीराजे

‘मराठा समाजाच्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी छत्रपती संभाजीराजे आमरण उपोषणास बसले आहेत. आज दि. 27 फेब्रुवारी रोजी सायं. 6 वा. राज्य सरकारच्या वतीने गृहमंत्री दिलीप पाटील हे आझाद मैदान येथे उपोषणस्थळी आले. नामदार वळसे पाटील यांनी छत्रपती संभाजीराजे यांचेसह मराठा समन्वयकांशी चर्चा केली व छत्रपती संभाजीराजेंना उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र छत्रपती संभाजीराजेंनी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून लेखी निर्णय व भरीव अंमबजावणी सुरू होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याची घोषणा केली’, असं ट्वीट संभाजीराजे यांनी केलंय.

इतर बातम्या :

Video:चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?-राज्यपाल कोश्यारी

मुख्यमंत्री महोदय मराठी द्वेष्ट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, किती दिवस सहन करायचं : अजित पवार

Non Stop LIVE Update
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?.
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?.
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.