राष्ट्रवादीचं नवं कार्यालय, पक्षाचं काम कसं चालतं?, पुण्याच्या भाजप पुढाऱ्यांची राष्ट्रवादीच्या कार्यालयाला भेट!

| Updated on: Jul 03, 2021 | 7:15 AM

पुणे शहरासाठी नव्याने साकारलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस भवनला शुक्रवारी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, यांच्यासह अन्य भाजप पुढाऱ्यांनी भेट दिली. (Mayor Murlidhar Mohol And Bjp Leader Visit NCP office Pune)

राष्ट्रवादीचं नवं कार्यालय, पक्षाचं काम कसं चालतं?, पुण्याच्या भाजप पुढाऱ्यांची राष्ट्रवादीच्या कार्यालयाला भेट!
राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष आमदार प्रशांत जगताप यांनी भाजप नेत्यांचं स्वागत केलं...
Follow us on

पुणे : शहरासाठी नव्याने साकारलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस भवनला (Pune NCP Office) शुक्रवारी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), खासदार गिरीश बापट, यांच्यासह अन्य भाजप पुढाऱ्यांनी भेट दिली. नव्या कार्यालयातून पक्षाचं काम कसं चालतं, याची माहिती भाजप नेत्यांनी घेतली. ‘भाजप नेत्यांची राष्ट्रवादीच्या कार्यालयाला भेट…’, ही चर्चा शुक्रवारी संध्याकाळी पुण्याच्या चौकाचौकात ऐकायला मिळत होती पण पुणेकरांना याचं काहीही नवल वाटत नव्हतं कारण पुण्याची हीच तर संस्कृती आहे… (Mayor Murlidhar Mohol And Bjp Leader Visit NCP office Pune)

भाजप नेते पाहुणे, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला पाहुणचार

महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, भाजप पुणे शहराध्यक्ष आमदार जगदीश मुळीक, भाजप ओबीसी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, भाजप शहर सरचिटणीस गणेश घोष, दत्ताभाऊ खाडे, दीपक नागपुरे, सुशिल मेंगडे, अजय खेडेकर यांच्यासह पक्ष पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाला भेट दिली. या सगळ्यांचं स्वागत राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे तसंच पुणे शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमदार प्रशांत जगताप यांनी केलं.

राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून भाजप पुढाऱ्यांसाठी चहापानाचं आयोजन

राजकीय भेदाभेद विसरून प्रेम सलोखा जपणे हीच पुण्याची संस्कृती आहे. याच भावनेने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन कार्यालयाला भेट दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवीन कार्यालय छत्रपती शाहु सेतुजवळ (डेंगळे पूल) येथे सुरु करण्यात आले आहे. यानिमित्ताने चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या, असं भाजप शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांनी सांगितलं. तसंच राष्ट्रवादीने पुणे शहराच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी पुणे शहर भाजपला सहकार्य करावे, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

(Mayor Murlidhar Mohol And Bjp Leader Visit NCP office Pune)

हे ही वाचा :

अजित पवारांचं नाव आम्ही कधीपासून घेतोय, ईडीने लक्ष घातल्याने सर्व बाहेर पडेल; जरंडेश्वरवरील कारवाईनंतर अण्णा हजारेंचा दावा

मामाच्या साखर कारखान्यावर ED ची कारवाई; अजितदादांची पहिली प्रतिक्रिया