अजित पवारांचं नाव आम्ही कधीपासून घेतोय, ईडीने लक्ष घातल्याने सर्व बाहेर पडेल; जरंडेश्वरवरील कारवाईनंतर अण्णा हजारेंचा दावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मामाच्या जरंडेश्वर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. यात अजित पवार यांचं नाव आलं आहे. त्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (ED action against Jarandeshwar sugar factory)

अजित पवारांचं नाव आम्ही कधीपासून घेतोय, ईडीने लक्ष घातल्याने सर्व बाहेर पडेल; जरंडेश्वरवरील कारवाईनंतर अण्णा हजारेंचा दावा
Anna hazare
कुणाल जायकर

| Edited By: भीमराव गवळी

Jul 02, 2021 | 3:55 PM

नगर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मामाच्या जरंडेश्वर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. यात अजित पवार यांचं नाव आलं आहे. त्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजित पवारांचं नाव आता आलं. आम्ही कधीपासून त्याबाबत बोलतोय. आता ईडीने लक्ष घातल्याने सर्व बाहेर पडेल, असा दावा अण्णा हजारे यांनी केला आहे. (anna hazare reaction on ED action against Jarandeshwar sugar factory)

अण्णा हजारे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला. जरंडेश्वर प्रकरणात अजित पवार यांचं नाव आलं आहे. ते आम्ही कधीपासून बोलत आहे. पण मी फकीर माणूस. माझं कोण ऐकतोय. आता ईडीने लक्ष घातलं आहे. त्यातून सर्व बाहेर पडेल असा आम्हाला विश्वास आहे, असं हजारे म्हणाले.

सहकार चळवळ मोडीत काढण्याचा डाव

राज्यात सहकार चळवळ वाढली. त्याचं अनुकरण देशानं केलं. मात्र, आज ही सहकार चळवळ मोडीत काढण्याचा डाव सुरू आहे. सहकार क्षेत्राचं खासगीकरण करण्याचा डाव हा सर्वात मोठा धोका आहे. त्यामुळे हजारो शेतकरी देशोधडीला लागले आहेत, असं त्यांनी सांगितलं.

49 साखर कारखान्यांची चौकशी करा

आता जरांडेश्वर काखान्यापासून चौकशीला सुरुवात झाली आहे. आता ईडीने 49 साखर कारखान्यांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. आम्ही 4 हजार पानांचं कारखान्यांचं रेकॉर्ड हायकोर्टात दाखल केलं आहे. आता ते सत्र न्यायालयात आहे. केस सुरू आहे. योगायोगाने आता हे प्रकरण ईडीने हातात घेतलं आहे. त्यामुळे यातील सर्व गोष्टी बाहेर येतील अशी आशा आहे, असं त्यांनी सांगितलं.

सहकार चळवळ टिकली पाहिजे

साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची चौकशी होणं महत्त्वाचं आहे. राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. राजकीय पक्ष आणि पार्ट्यांचं काही घेणं नाही. सहकार चळवळ टिकली पाहिजे. तिचं खासगीकरण होणं हा धोका आहे, असंही ते म्हणाले.

राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी टीका

दरम्यान, माजी खासदार राजू शेट्टी यांनीही ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी अनेक दिवसांपासून सांगत आहे की, सीबीआय, ईडी या केंद्राच्या हातात आहेत. त्याचा वापर राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी केला जातो आहे. केवळ जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई करून भागणार नाही. 43 कारखान्यांच्या विक्रीची चौकशी झालीच पाहिजे. राजकीय फायद्यासाठी एखाद्या कारखान्याची चौकशी लावायची आणि त्यांना भाजपात घ्यायचे, ही पद्धत चूक आहे. कारण, हे कारखाने शेतकऱ्यांचे आहेत, अशा शब्दात शेट्टी यांनी भाजपवरही टीका केलीय. (anna hazare reaction on ED action against Jarandeshwar sugar factory)

 

संबंधित बातम्या:

ईडी, सीबीआयचा वापर राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी, राजू शेट्टींचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

ईडी म्हटलं की लोक घाबरतात, तुमचा भुजबळ करु असं सांगतात, छगन भुजबळ यांचं वक्तव्य

काय आहे जरंडेश्वर कारखाना प्रकरण, अजित पवारांचा नेमका संबंध काय?

(anna hazare reaction on ED action against Jarandeshwar sugar factory)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें