उद्धव ठाकरेंचा स्वभाव लय भारी, अशोक चव्हाणांकडून जाहीर कौतुक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव खूप सकारात्मक आहे, अशा शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची तोंडभरुन कौतुक केलं आहे.

उद्धव ठाकरेंचा स्वभाव लय भारी, अशोक चव्हाणांकडून जाहीर कौतुक
Akshay Adhav

|

Nov 13, 2020 | 8:51 AM

नांदेड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव खूप सकारात्मक आहे, अशा शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची तोंडभरुन स्तुती केलं आहे. शिवसेना खासदार हेमंत पाटील यांच्यासमोर अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली. (Minister Ashok Chavan Appriciate Cm Uddhav Thackeray)

राज्यात तीन पक्षाचे सरकार अस्तित्वात आल्याने राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. विशेषतः कालचे कट्टर प्रतिस्पर्धी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. त्यातून अनेकदा जाहीर कार्यक्रमांतून जुन्या कटू आठवणींना आता उजाळा मिळतोय. दिवाळीच्या पूर्वसंध्येला नांदेडमध्ये दैनिक सत्यप्रभा या दैनिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन रात्री पार पडले. यावेळी अशोक चव्हाण तसंच खासदार हेमंत पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली.

“स्वप्नात देखील काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येईल, असं कुणाला वाटलं नव्हतं. आम्ही तर कधी असा विचार देखील केला नव्हता. मात्र वर्षाभरापूर्वी पवारसाहेब, सोनियाजी आणि उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. राज्याला विकासकामांच्या बाबतीत सकारात्मक मुख्यमंत्री लाभला आहे. उद्धव ठाकरेंचा स्वभाव खूप सकारात्मक आहे”, असं चव्हाण म्हणाले.

सत्यप्रभा या दैनिकाच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनावेळी हेमंत पाटील यांनीही टोलेबाजी केली. “आठ दिवस ज्या वर्तमानपत्रामुळे मी तुरुंगात राहिलो त्याच वर्तमानपत्राच्या दिवाळी अंकाचं माझ्या हस्ते उद्घाटन होतंय, यापेक्षा अधिक भाग्याची कोणती गोष्ट असते”, असं खा. हेमंत पाटील म्हणाले.

अशोक चव्हाण यांनी गुरुवारच्या नांदेडच्या कार्यक्रमात जरी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली असली तरी गेल्या महिन्यात (ऑक्टोबर) परभणीत बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांविषयी तक्रार केली होती. काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले होते. नंतर मात्र माझ्या बोलण्याचा माध्यमांनी विपर्यास केला, असं म्हणत त्या वादावर चव्हाण यांनी पडदा टाकला होता. (Minister Ashok Chavan Appriciate Cm Uddhav Thackeray)

संबंधित बातम्या

काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही, अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप; आघाडीत खळबळ

विधानसभेपूर्वी काँग्रेसला रामराम, अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत बड्या नेत्याची पक्षात घरवापसी

चंद्रकांत पाटलांनी निर्माण केलेले खड्डेच बुजवतोय; अशोक चव्हाणांचा टोला

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें