राज्य मंत्रिमंडळ विस्तार : खातेवाटपही जाहीर, पाहा कुणाला कोणतं मंत्रालय?

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे. भाजपच्या 8, शिवसेनेच्या 2 आणि रिपाइं-आठवले गटाच्या एका मंत्र्यांने मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या 13 नव्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झाला आहे.

राज्य मंत्रिमंडळ विस्तार : खातेवाटपही जाहीर, पाहा कुणाला कोणतं मंत्रालय?

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे. भाजपच्या 8, शिवसेनेच्या 2 आणि रिपाइं-आठवले गटाच्या एका मंत्र्यांने मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या 13 नव्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झाला आहे. या मंत्रिमंडळात काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे विखे पाटलांना कोणतं मंत्रिपद देण्यात येतंय, याची उत्सुकता राजकीय वर्तुळासह अवघ्या महाराष्ट्राला होती. अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांना राज्याचं गृहनिर्माण विभागाचे मंत्रिपद देण्यात आले आहे.

कॅबिनेट मंत्री – कुणाला कोणतं खातं?

1. राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) – गृहनिर्माण

2. जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) – रोजगार हमी आणि फलोत्पादन

3. आशिष शेलार (भाजप) – शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

4. संजय कुटे (भाजप) – कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास वर्ग कल्याण

5. सुरेश खाडे (भाजप) – सामजिक न्याय

6. अनिल बोंडे (भाजप) – कृषी

7. तानाजी सावंत (शिवसेना) – जलसंधारण

8. अशोक उईके (भाजप) – आदिवासी विकास

राज्यमंत्री – कुणाला कोणतं खातं?

1. योगेश सागर – नगरविकास

2. अविनाश महातेकर – सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य

3. संजय (बाळा) भेगडे – कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन

4. डॉ. परिणय फुके – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), वने, आदिवासी विकास

5. अतुल सावे – उद्योग आणि खाणकाम, अल्पसंख्याक विकास व वक्फ


Published On - 9:17 pm, Sun, 16 June 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI