“ज्यांनी घराघरात भांडणं लावली त्यांच्या घरात आता टोकाची भांडणं, मेंढ्यांचं नेतृत्व कधीच लांडग्याकडे नसतं”

ज्यांनी राज्याच्या राजकीय घराण्यात भांडणं लावून घरं फोडली त्याच शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरात आता टोकाची भांडणं सुरु आहेत, अशी टीका गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांनी केली. | Pandharpur Mangalwedha Bypoll

ज्यांनी घराघरात भांडणं लावली त्यांच्या घरात आता टोकाची भांडणं, मेंढ्यांचं नेतृत्व कधीच लांडग्याकडे नसतं
गोपीचंद पडळकर आणि शरद पवार
Akshay Adhav

|

Apr 16, 2021 | 10:29 AM

पंढरपूर (सोलापूर) :  “ज्यांनी राज्याच्या राजकीय घराण्यात भांडणं लावून घरं फोडली त्याच शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरात आता टोकाची भांडणं सुरु आहेत. मला त्यांना सांगायचंय की नियतीचा न्याय इथेच असतो. मेंढ्यांचं नेतृत्व कधीच लांडग्याकडे नसतं”, अशा शब्दात भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पवारांवर टीका केली.  (MLC Gopichand Padalkar Attacked Sharad Pawar And NCP Over Pandharpur Mangalwedha Bypoll)

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा जागेवर पोट निवडणूक (Pandharpur Mangalwedha Bypoll) होत आहे. राष्ट्रवादी आणि भाजपने ही जागा अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. दोन्ही पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी प्रचाराची राळ उडवलीय. काल (गुरुवार) प्रचाराच्या तोफा थंडावल्या. शेवटच्या दिवशी पडळकरांनी आवताडे यांच्या प्रचारार्थ सभा घेत राष्ट्रवादीवर आणि पवारांवर तुटून पडले.

राष्ट्रवादी हुशार, गरीब घरचा गृहमंत्री, चिल्लर त्याला, नोटा बारामतीला

गोपीचंद पडळकर म्हणाले, “ज्यांनी राज्यातल्या घराघरात भांडणं लावली, त्यांच्याच घरात आता टोकाची भांडणं आहेत. मात्र मला त्यांना सांगायचंय की नियतीचा न्याय इथेच असतो. राष्ट्रवादीने गोरगरिबांच्या घरावरुन गाढवाचा नांगर फिरवला. मेंढ्याचं नेतृत्व कधीच लांगडा करत नाही”

“राष्ट्रवादी खूप हुशार आहे. बघतानाच गरीब घरचा गृहमंत्री बघतात. साहजिक चिल्लर त्याला आणि नोटा बारामतीला”, अशा शब्दात पडळकर पवारांवर आणि राष्ट्रवादीवर तुटून पडले.

देशमुखांच्या राजीनाम्यानंतर जयंत पाटील खुलले, मात्र वळसे पाटील या गरिबाला गृहमंत्रिपद  दिलं

“एपीआय सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यायला लागला. या काळात जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे खूपच खुलले होते, मात्र दिलीप वळसे पाटील या गरिबाला गृहमंत्रिपद दिलं”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

दुसरीकडे पडळकर यांनी अनिल देशमुख यांनाही टोला लगावला. “राज्यात सीबीआयला परवानगीशिवाय एन्ट्री देणार नाही, अशी भाषा काही दिवसांपूर्वी काहीजण बोलत होते. आता त्यांचीच चौकशी सीबीआय करत आहे”, असं पडळकर म्हणाले.

(MLC Gopichand Padalkar Attacked Sharad Pawar And NCP Over Pandharpur Mangalwedha Bypoll)

हे ही वाचा :

‘चंद्रकांत पाटील आणि फडणवीसांना वाईट वाटू नये म्हणून आम्ही गप्प, नाहीतर…’, जयंत पाटलांचा भाजपला मोठा इशारा

चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का? अजित पवारांनी पाटलांना पुन्हा डिवचलं

मला पुन्हा ‘चंपा’ बोललात तर याद राखा, तुमच्या मुलापासून सर्वांचे शॉर्टफॉर्म करेन; चंद्रकांतदादांचा अजित पवारांना इशारा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें