“इतर राज्यांसाठी मदत, महाराष्ट्रात पूर आला तर साधं ट्विटही नाही, बॉलिवूडकरांनो संवेदनशील व्हा, मदतकार्याला हातभार लावा”

माझ्याच राज्यात राहून मोठं झालेल्या बॉलिवूडकरांनी जरा संवेदनशील व्हावं आणि मदतकार्याला हातभार लावावा, असं आवाहन अमेय खोपकर (Amey khopkar) यांनी बॉलिवूड कलाकारांना केलं आहे.

इतर राज्यांसाठी मदत, महाराष्ट्रात पूर आला तर साधं ट्विटही नाही, बॉलिवूडकरांनो संवेदनशील व्हा, मदतकार्याला हातभार लावा
राज ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 9:09 AM

मुंबई : संपूर्ण राज्यात धुवाँधार पाऊस पडतोय. राज्यांतल्या अनेक शहरांत पूर आलाय. पावसामुळे अघटित घटना घडल्या आहेत. या घटनेत आतापर्यंत जवळपास 110 नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. शासन पातळीवर, स्वयंसेवी संस्थांकडून मदतकार्य तर सुरु आहे, पण इतरवेळी लोकं ज्यांना आयडॉल मानतात ते कलाकार मंडळी या मदतकार्यात कुठेही दिसत नाहीत. किंबहुना त्यांनी राज्यातल्या भीषण परिस्थितीवर साधं ट्विट करण्याची तसदीही घेतली नाही. याच कलाकार मंडळींचे कान पकडत मनसेने मदतीचं आवाहन केलं आहे.

बॉलिवूडकरांनी जरा संवेदनशील व्हावं

इतर राज्यात काही आपत्ती आली की बॉलिवूड कलाकार मदत करतात. मात्र महाराष्ट्रात पूर आला तर साधं ट्विटही नाही. माझ्याच राज्यात राहून मोठं झालेल्या बॉलिवूडकरांनी जरा संवेदनशील व्हावं आणि मदतकार्याला हातभार लावावा, असं आवाहन मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey khopkar) यांनी बॉलिवूडच्या कलाकारांना केलं आहे.

काय म्हणालेत अमेय खोपकर?

इतर राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर बॉलिवूडमधून मदतीसाठी अनेक जण पुढे येतात. माझ्या राज्यात पूर आल्यानंतर एकाही कलाकाराला साधं ट्विटही करावसं वाटलं नाही, याचं आश्चर्य वाटतं… अनेक स्वयंसेवी संस्थांनी मदत कार्य सुरु केलेलं आहे. आमचे महाराष्ट्र सैनिकही झटत आहेत… अशा वेळी माझ्याच राज्यात राहून मोठं झालेल्या बड्या बॉलीवूड तार्‍यांनी थोडं संवेदनशील व्हावं आणि मदत कार्याला हातभार लावावा, असं जाहीर आवाहन अमेय खोपकर यांनी केलं आहे.

महाराष्ट्र सैनिकांनो मदतीसाठी पुढे व्हा, राज ठाकरेंचंही आवाहन

महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. त्यातल्या त्यात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात भीषण पूर-परिस्थिती निर्माण झाली आहे.

ह्या अवघड परिस्थितीत मी सर्व महाराष्ट्र सैनिकांना त्यांना जितकं जमेल तितकी मदत त्यांनी पूरग्रस्तांना करावी असे आवाहन करतो. आत्ता लोकांचा जीव महत्वाचा आहे आणि नंतर जसजसा पूर ओसरेल तसा रोगराईचा धोकाही वाढू शकेल. तुम्ही त्यात लक्ष घालून अत्यंत तातडीनं योग्य ती मदत तिथे पोचेल असं पहावं. काम करताना अर्थातच स्वत:ची काळजीही घ्यावी.

महाराष्ट्रावरचं हे मोठं संकट आहे. त्याला तोंड देताना आपल्याकडून कुठलीही कुचराई होता कामा नये.

जय महाराष्ट्र !- राज ठाकरे 

(MNS Amey Khopkar Slam Bollywood celebrities Over Floods in Maharashtra, no single tweets, no part in relief work)

हे ही वाचा :

महाराष्ट्रात पावसाचं थैमान, राज्य संकटात, तातडीने योग्य ती मदत पोहोचवा, राज ठाकरेंचं मनसैनिकांना पत्र 

Maharashtra Landslide : महाराष्ट्रावर दरडींचा घाला, रत्नागिरी रायगड आणि साताऱ्यात कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त, आतापर्यंत 50 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू

Video : साताऱ्याच्या आंबेघरवर आभाळ कोसळलं, दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.