“भाजप दाखवण्यापुरता मित्र, आम्ही त्यांना फारसं महत्व देत नाही”, युतीवर मनसेचं स्पष्टीकरण

मनसे आणि भाजपची युती होणार असल्याची चर्चा आहे. त्यावर मनसेकडून स्टष्टीकरण देण्यात आलं आहे,

भाजप दाखवण्यापुरता मित्र, आम्ही त्यांना फारसं महत्व देत नाही, युतीवर मनसेचं स्पष्टीकरण
| Updated on: Sep 18, 2022 | 11:01 AM

नागपूर : मागच्या काही दिवसांपासून मनसे (MNS) आणि भाजप यांच्या युतीची चर्चा आहे. यावर मनसेचे नेते अविनाश जाध (Avinash Jadhav) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “भाजपला (BJP) दाखवण्यापुरते मित्र आहेत. आम्ही त्यांना फारसं महत्व देत नाही”, असं अविनाथ जाधव म्हणाले आहेत. आम्ही अजून कुठेही आमची युती होतेय, असं म्हटलेलं नाही. आम्ही सगळ्या जागांवर लढणार आहोत. आमचे सगळ्या पक्षात मित्र आहेत. नागपुरातून राज ठाकरेंनी येत्या निवडणुकांचा प्रचाराचा नारळ फोडला आहे, असंही जाधव म्हणालेत.