राज ठाकरेंचा झंझावात आजपासून सुरु, सभांची तारीख, वेळ, ठिकाण 'इथे' पाहा!

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांचे पोलखोल करण्यासाठी राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. कालच (11 एप्रिल) राज ठाकरे मुंबईतून देवगिरी एक्स्प्रेसने रात्री 9 वाजता नांदेडच्या दिशेने रवाना झाले. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात म्हणजे नांदेडमध्ये राज ठाकरे यांची पहिली सभा होणार आहे. मुंबईतून नांदेडच्या दिशेने जाताना राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते अविनाश अभ्यंकर, अनिल …

राज ठाकरेंचा झंझावात आजपासून सुरु, सभांची तारीख, वेळ, ठिकाण 'इथे' पाहा!

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांचे पोलखोल करण्यासाठी राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. कालच (11 एप्रिल) राज ठाकरे मुंबईतून देवगिरी एक्स्प्रेसने रात्री 9 वाजता नांदेडच्या दिशेने रवाना झाले. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात म्हणजे नांदेडमध्ये राज ठाकरे यांची पहिली सभा होणार आहे.

मुंबईतून नांदेडच्या दिशेने जाताना राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे, नितीन सरदेसाई यांच्यासह मनसेचे आणखी काही महत्त्वाचे नेते होते. राज ठाकरे पहिल्या टप्प्यात सहा सभा घेणार आहेत. राज ठाकरेंच्या दौऱ्याचं पूर्ण वेळापत्रक ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागलं आहे.

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील औरंगाबाद वगळता इतर सर्व जागांसाठी मतदान होणार आहे. नांदेडचाही यामध्ये समावेश आहे. त्यापूर्वी राज ठाकरे सभा घेऊन राजकीय वातावरण ढवळून काढणार आहेत. या निवडणुकीत मनसेने एकही उमेदवार न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात प्रचार करण्याचं जाहीर केलंय. माझ्या सभांचा फायदा आघाडीला होत असेल तर तो होऊ द्या, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं.

सभांचा झंझावात सुरु, नांदेडमधील पहिल्या सभेसाठी राज ठाकरे रवाना

नांदेड शहरातील नवीन मुंडा मैदानावर उद्या म्हणजे शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजता राज ठाकरेंची सभा होईल. यानंतर 15 तारखेला सोलापूर, 16 तारखेला कोल्हापूर, 17 तारखेला सातारा, 18 तारखेला पुणे आणि 19 तारखेला रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये राज ठाकरे यांची सभा होईल. या सर्व सभांची वेळ सायंकाळी साडे पाच वाजता ठेवण्यात आली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *