Video : ‘या वयातही आशाताई काय दिसतात ना!’, राज ठाकरेंकडून सौंदर्याचं कौतुक

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले (Asha Bhosale) यांच्या सौंदर्याचं वर्णन राज ठाकरे यांनी केलं. 'या वयातही आशाताई काय दिसतात ना...' असं राज म्हणाले. राज ठाकरे यांच्या विधानानंतर ते स्वत:ही हसले आणि उपस्थितांमध्येही खसखस पिकली.

Video : 'या वयातही आशाताई काय दिसतात ना!', राज ठाकरेंकडून सौंदर्याचं कौतुक
राज ठाकरे, आशा भोसले आणि बाबासाहेब पुरंदरे
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Akshay Adhav

Aug 14, 2021 | 1:56 PM

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ओळख दिलखुलास आणि रोखठोक व्यक्तिमत्वासाठी आहे. आज बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंचावर उपस्थित ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले (Asha Bhosale) यांच्या सौंदर्याचं वर्णन राज ठाकरे यांनी केलं. ‘या वयातही आशाताई काय दिसतात ना…’ असं राज म्हणाले. राज ठाकरे यांच्या विधानानंतर ते स्वत:ही हसले आणि उपस्थितांमध्येही खसखस पिकली.

या वयातही आशाताई काय दिसतात ना….!

शिवशाहिर बाबासाहेब पुरंदेर हे 100 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्याच निमित्ताने पुण्यात खास कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला खुद्द बाबासाहेब पुरंदरे, राज ठाकरे, आशा भोसले, आशिष शेलार, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थिती लावली. यावेळी राज ठाकरे यांनी दिलखुलास भाषण करताना आशा भोसले यांच्या सौंदर्याचं कौतुक केलं तर बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे उत्तुंग पैलू सांगितले.

राज ठाकरे म्हणाले, कोण म्हणेल आशाताई 88 वर्षांच्या आहेत…. या वयातही काय दिसतात ना… अशी चर्चा आता लोकांमध्ये सुरु होती… मी म्हटलं आपण जाहीरपणे सांगावं, असं मिश्किलपणे राज ठाकरे म्हणाले. बाबासाहेब पुरंदरे, आशाताई इथे मंचावर बसलेत… आपण फक्त यांच्या वयाचे आकडे मोजायचे…याच्यापलीकडे आपल्या हातात काही नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंच्या भाषणाची नवी सुरुवात

जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अशी राज ठाकरे यांच्या भाषणाची सुरुवात आता लोकांच्या अंगवळणी पडलीय. मात्र आज राज ठाकरेंनी आपल्या भाषणाची नवी सुरुवात केली. अर्ध्या झाकलेल्या अन् अर्ध्या उघड्या असलेल्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो, असं म्हणत राज ठाकरे यांनी आजच्या कोव्हिडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर भाष्य केलं.

बाबासाहेबांच्या लिखाणात दंतकथांना वाव नाही, राज ठाकरेंची बाबासाहेबांवर स्तुतीसुमने

“सहा वर्षांचा असताना मी पहिल्यांदा बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तीला पाहिलं. त्याच्यानंतर कित्येक वर्षे मी त्यांना फक्त पाहत होतो, वाचत होतो… आता मला त्यांच्या सहवास लाभला… बाबासाहेब इतिहास जरी सांगत असले तरी ते वर्तमानात भानावर यायला शिकवतात… इतिहासात ज्या चुका केल्या, त्या वर्तमानात करु नये हे सांगतात…”

“इतिहासाबरोबर वर्तमानची जाग आणणारा इतिहास बाबासाहेब सांगतात… बाबासाहेबांची इतिहास सांगायची एक पद्धत आहे… ते तुम्हाला समजेल, रुचेल अश्या पद्धतीने बाबासाहेब इतिहास सांगतात… दंतकथांना त्यांच्या लिखाणात वाव नाही… शिवचरित्र अनेकांनी लिहिली… पण बाबासाहेबांनी ते घराघरात, मनामनात पोहोचवलं… बाबासाहेब तुम्ही असाच इतिहास सांगत रहा… आमची नातवंड, पतवंडं तुमच्याकडून असाच इतिहास ऐकत राहतील”, अशी इच्छा व्यक्त करुन राज ठाकरे बाबासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

MNS Chief Raj Thackeray Praise Asha Bhosale beauty in Pune babasaheb Purandare Birthday Event pune

हे ही वाचा :

बाळासाहेबांकडून राजकारणात येण्याची ऑफर, लतादीदींचं ‘असं’ उत्तर परत बाळासाहेबांनी विषयही काढला नाही!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें