बाळासाहेबांकडून राजकारणात येण्याची ऑफर, लतादीदींचं ‘असं’ उत्तर परत बाळासाहेबांनी विषयही काढला नाही!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 14, 2021 | 8:01 AM

सुरुवातीच्या काही भेटीनंतर ज्यावेळी कौटुंबिक सलोख्याचे नाते निर्माण झाले त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी लतादीदींना राजकारणात येण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर लतादीदींच्या उत्तराने बाळासाहेबांनी पत कधीही त्यांच्यासमोर राजकारणाचा विषय काढला नाही...!

बाळासाहेबांकडून राजकारणात येण्याची ऑफर, लतादीदींचं 'असं' उत्तर परत बाळासाहेबांनी विषयही काढला नाही!
बाळासाहेब ठाकरे आणि लता मंगेशकर

मुंबई : गानसम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) ह्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे होत्या. वर्षातून कधी जाणे येणे शक्य झाले नाही तर आवर्जून लतादीदी आणि बाळासाहेब एकमेकांच्या वाढदिवसानिमित्त एकमेकांच्या घरी येत-जात असत.. बाळासाहेब ज्यावेळेस कलानगर या ठिकाणी त्यांच्या जुन्या घरी राहत होते… त्यावेळेस हृदयनाथ, लतादीदी, आशाताई, उषाताई, मीनाताई असे सारे मंगेशकर बंधू-भगिनी बाळासाहेबांच्या बंगल्यावर गेले होते… त्यावेळेस त्या भेटीचा आनंद दोन्ही कुटुंबांच्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर झळकत होता…

गोष्ट छोटी-मोठी असू देत बाळासाहेब आवर्जून त्याचं कौतुक करत असत… त्या वेळेस मंगेशकर बंधू-भगिनींनी बाळासाहेबांना एकत्रित असलेल्या श्रीराम-लक्ष्मण-सीता व हनुमान यांची सुंदर रेखीव मूर्ती दिली होती… त्यावेळेस नेहमीप्रमाणे हसतमुखाने प्रेमाने बाळासाहेबांनी ती स्वीकारली आणि आवर्जून कौतुकाने म्हटलं, “भेट आवडली बरं का…” साहेबांकडे गेलेल्या प्रत्येकाला कौतुकाची थाप ही आवर्जून पडत… आणि काही चुकलं तर ओरडा देखील…. हे सांगण्याची गरज नाही…! मंगेशकर आणि ठाकरे कुटुंबातील सर्वांचे संबंध हे कौटुंबिक सलोख्याचे झाले होते…

बाळासाहेबांकडून लतादीदींना राजकारणात येण्याची ऑफर, दीदींच्या उत्तराने बाळासाहेब थांत!

बऱ्याचदा नातेसंबंधांमध्ये प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या स्वरुपात एकमेकांच्या आतून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करीत असते… सुरुवातीच्या काही भेटीनंतर ज्यावेळेस कौटुंबिक सलोख्याचे नाते निर्माण झाले… त्यावेळेस एकदा बाळासाहेबांनी लतादीदींना राजकारणामध्ये येण्याचं निमंत्रण दिलं… त्यावर लतादीदी म्हणाल्या की, “राजकारण हा आमचा प्रांत नाही… आपण राजकारणात खूप चांगलं काम करताय… आपल्याला माझ्या शुभेच्छा…” त्यानंतर कधीही बाळासाहेबांनी राजकारणाचा विषय देखील लतादीदींसमोर काढला नाही…

लतादीदींच्या गाण्याची बाळासाहेबांना भुरळ, बाळासाहेबांकडून दीदींचं तोंडभरन कौतुक

प्रत्येक भेटीमध्ये एक व्यंगचित्रकार कलाकार म्हणूनच बाळासाहेब गानसम्राज्ञी लतादीदी यांना भेटत राहिले.. शिवसेनेच्या एखाद्या कार्यक्रमाला बोलावल्यास लतादीदी आवर्जून जात असत… एकदा शिवउद्योग सेनेच्या कार्यक्रमांमध्ये लतादीदींना बोलावलं गेलं…. लतादीदींनी कार्यक्रमात जाऊन काही गाणी गायली… तो कार्यक्रम नाही नाही म्हणता आणि श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेण्यात आलेल्या वन्स मोर वन्स मोर म्हणत जवळपास तीन-साडेतीन तास चालला… बाळासाहेबांना त्यातली बरीच गाणी आवडली… कार्यक्रम संपल्यावर त्यांनी आवर्जून लतादीदींचं कौतुक केलं…

‘मासळी बिसळी खाता की नाही, या घरी जेवायला!’

बाळासाहेबांच्या तब्येतीची विचारपूस लतादीदी अधून-मधून आवर्जून करत असत… एकदा असंच लतादीदी कोल्हापूरमध्ये होत्या… तेव्हा त्यांना बाळासाहेबांची तब्येत ठीक नाही असं कळलं… तेव्हा कोल्हापूरहून लतादीदींनी मातोश्रीवर फोन केला आणि तब्येतीची विचारपूस केली… तेव्हा बोलता बोलता बाळासाहेबांनी लतादीदींना विचारलं की, “मासळी बिसळी खाता की नाही…”, त्यावर लतादीदी म्हणाल्या की, “मासळी खाते पण जास्त तिखट नाही… त्यावेळेस मुंबईला आल्यावर मासळी जेवणाचे आमंत्रण बाळासाहेबांनी आवर्जून दिलं…

प्रत्येक शिवसेनेच्या कार्यक्रमात लतादीदींना एक कलाकार म्हणून सन्मान मिळाला… जेव्हा-जेव्हा बाळासाहेबांना लतादीदींची गाणी ऐकावीशी वाटत तेव्हा तेव्हा राज ठाकरे यांना लतादीदींकडून कॅसेट्स आणण्यासाठी बाळासाहेब पाठवत असत.. अशाप्रकारे बाळासाहेबांची मानलेली भगिनी म्हणून गाणसम्राज्ञी लता मंगेशकर आणि बाळासाहेब यांचे नातेसंबंध आपुलकीचे होते…!

(Special Story on Balasaheb Thackeray gave Lata Mangeshkar offer to enter politics)

हे ही वाचा :

रावतेंनी प्लॅन केला, 15 आमदारांसह सभापतींचा रस्ता अडवायचा, हर्षवर्धन पाटलांना गडकरींची साथ, ‘असा केला प्लॅन फेल!’

RR आबांकडून डान्सबारविरोधी कायदा, मनजितसिंग म्हणाला, ‘आता आमदारांच्या बायकांनाच नाचवू’, ‘भाऊ-आबांनी’ त्याचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला!

काँग्रेस आमदारांच्या स्विमिंग पूलमध्ये डुबक्या, धोतरं छत्रीवर वाळत, TV पाहून सोनियांचा विलासरावांना फोन, वाचा काय आहे किस्सा…

Special Story : जेव्हा हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्राचं विधिमंडळ जळण्यापासून वाचविले…!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI