सोलापुरात आधीच लढत रंगतदार, त्यात राज ठाकरेंची सभा!

सोलापुरात आधीच लढत रंगतदार, त्यात राज ठाकरेंची सभा!

सोलापूर : लोकसभा निवडणुकीतील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या सोलापुरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सभा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार उतरला नसला, तरी राज ठाकरे हे राज्यभर फिरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह या दोघांविरोधात प्रचार करत आहेत. या सभांमधील पहिली सभा नांदेडमध्ये झाल्यानंतर, दुसरी सभा आज म्हणजे 15 एप्रिल रोजी सोलापुरात होणार आहे. सोलापुरात आधीच चुरशीची लढत आहे, त्यात राज ठाकरेंची सभा होणार असल्याने चुरस आणखी वाढेल, यात शंका नाही.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य रिंगणात आहेत. तिन्ही तगडे उमेदवार असल्याने सोलापुरातील लढत चुरशीची ठरली आहे. त्यात भाजपविरोधात प्रचारासाठी स्वत: राज ठाकरे सोलापूरच्या मैदानात उतरल्याने या लढतीला आणखी रंग चढणार आहे.

राज ठाकरे यांनी नांदेडच्या सभेत नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपवर जोरदार टीका केली. राज ठाकरेंच्या नांदेडमधील भाषणांचे पडसाद राज्यासह राष्ट्रीय स्तरावर उमटले. महाराष्ट्रासह देशभरातील माध्यमांनी राज ठाकरेंच्या भाषणाची दखल घेतली होती. फोटो, बातम्या, व्हिडीओ अशा संदर्भांसह राज ठाकरे भाषण करत असल्याने, त्यांच्या भाषणाला वेगळीच धार येत आहे. त्यामुळे भाजपच्या गोटातही खळबळ आहे. त्यात आघाडीच्या महत्त्वाच्या मतदारंसघात राज ठाकरे सभा घेत असल्याने, थेट फायदा आघाडील होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

राज ठाकरेंच्या सभा कुठे कुठे होणार आहेत?

संबंधित बातम्या :

अकोल्यातल्या माणसाचं सोलापुरात काय काम? : प्रणिती शिंदे

सुशीलकुमार शिंदेंसोबतच्या भेटीवर अखेर प्रकाश आंबेडकरांनी मौन सोडलं!

आंबेडकरांच्या एन्ट्रीने लढत चुरशीची, सोलापुरात सद्यस्थिती काय?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *