अकोल्यातल्या माणसाचं सोलापुरात काय काम? : प्रणिती शिंदे

सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. यात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेही मागे राहिल्या नाहीत. यावेळी प्रणिती शिंदेंनी थेट वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि सोलापुरातील उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यावरच घणाघात केला आहे. काय म्हणाल्या प्रणिती शिंदे? “दुसरे तिसरे कोण ते, अकोल्यावरून आलेत. अकोल्यावरुन आलेल्या माणसाचं आपल्या येथे काय …

अकोल्यातल्या माणसाचं सोलापुरात काय काम? : प्रणिती शिंदे

सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. यात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेही मागे राहिल्या नाहीत. यावेळी प्रणिती शिंदेंनी थेट वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि सोलापुरातील उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यावरच घणाघात केला आहे.

काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?

“दुसरे तिसरे कोण ते, अकोल्यावरून आलेत. अकोल्यावरुन आलेल्या माणसाचं आपल्या येथे काय काम? तो येऊन आपल्याला शिकवेल, असं कर तसं कर?” असे म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे. तसेच, “भाजपची बी टीम असलेल्या वंचित बहुजन आघाडीला फक्त सांगितलं गेलंय की, सोलापूरला जा आणि लावा, पेटवा.. बस्स. आणि आपण त्यांच्या मागे जाणार.” असा आरोपही प्रणिती शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर केली.

यावेळी प्रणिती शिंदे यांनी भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यावरही निशाणा साधला. त्या म्हणाल्या, “ज्या महाराजांना एफआरपी, हमीभाव काय माहीत नाही, कसलाच अनुभव नसलेल्याना प्रश्न कसे कळणार? आपल्यासमोर कोण आणलंय, तर महाराज. यांना काय माहिती? अनुभवच नाही यांना. कुठे 40 वर्षांचा दांडगा अनुभव आणि कुठे शुन्य अनुभव. फक्त मठातला अनुभव.”

सोलापुरात काँटे की टक्कर

2014 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर, पुन्हा एकदा काँग्रेसने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. 2014 साली मोदीलाटेमुळे शिंदेंना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, सोलापूरची जागा काँग्रेसची हक्काची जागा मानली जाते. मात्र, यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे आव्हान असल्याने सोलापूरची लढत रंगतदार होणार, हे निश्चित.

VIDEO : पाहा काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *