AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशीलकुमार शिंदेंसोबतच्या भेटीवर अखेर प्रकाश आंबेडकरांनी मौन सोडलं!

सोलापूर : महाराष्ट्रासह देशाचं लक्ष सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडे लागलं आहे. इथून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे काँग्रेसकडून, तर प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीकडून रिंगणात आहेत. भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य लढत आहेत. अशी तिरंगी चुरशीची लढत होत असताना, काल अचानक एक फोटो ससमोर आला. सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याचा फोटो असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात […]

सुशीलकुमार शिंदेंसोबतच्या भेटीवर अखेर प्रकाश आंबेडकरांनी मौन सोडलं!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM
Share

सोलापूर : महाराष्ट्रासह देशाचं लक्ष सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडे लागलं आहे. इथून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे काँग्रेसकडून, तर प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीकडून रिंगणात आहेत. भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य लढत आहेत. अशी तिरंगी चुरशीची लढत होत असताना, काल अचानक एक फोटो ससमोर आला. सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याचा फोटो असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. अखेर या भेटीवर प्रकाश आंबेडकर यांनी मौन सोडलं आहे.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

“काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे. भेटीचे राजकारण करणं हे काँग्रेसवाल्यांना जमतं. निवडणूक म्हणजे दुश्मनी असं मी कधीच मानलं नाही. कुणाला तरी  भेटायचे आणि फोटो व्हायरल करायचे, हे काँग्रेसचे डावपेच आहेत.”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

वाचा : सुशीलकुमार शिंदे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला

दुसरीकडे, सुशीलकुमार शिंदे हे शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर, प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. मात्र आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीने सोलापूर शहरात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दोन दिवसापूर्वी झालेल्या सभेत प्रकाश आंबेडकरकरांनी सुशीलकुमार शिंदेंवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर लगेचच ही भेट झाली.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर, काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे आणि भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोलापूर लोकसभेसाठी येत्या 18 एप्रिलला मतदान होत आहे.

माझी शेवटची निवडणूक

माझी शेवटची निवडणूक आहे. शेवटच्या निवडणुकीत मला शरद पवारांची साथ हवीय, असे भावनिक आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. सोलापुरात आयोजित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या निर्धार मेळाव्यात सुशीलकुमार शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हेही उपस्थित होते.

2014 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर, पुन्हा एकदा काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. 2014 साली मोदीलाटेमुळे शिंदेंना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, सोलापूरची जागा काँग्रेसची हक्काची जागा मानली जाते. मात्र, यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांचेही आव्हान असल्याने सोलापूरची लढत रंगतदार होणार, हे निश्चित.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...