AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐतिहासिक! राज ठाकरे राहुल गांधींना भेटणार, वेळ-ठिकाण ठरलं!

मुंबई: लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहे, तसतसं राजकीय घडामोडींना वेग येत आहे. आता या राजकीय घडामोडींमध्ये नवा ट्विस्ट आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. येत्या 8 तारखेला राज आणि राहुल यांची भेट होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या मध्यस्थीने ही […]

ऐतिहासिक! राज ठाकरे राहुल गांधींना भेटणार, वेळ-ठिकाण ठरलं!
| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM
Share

मुंबई: लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहे, तसतसं राजकीय घडामोडींना वेग येत आहे. आता या राजकीय घडामोडींमध्ये नवा ट्विस्ट आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. येत्या 8 तारखेला राज आणि राहुल यांची भेट होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या मध्यस्थीने ही राहुल-राज भेट होणार आहे. नवी दिल्लीत काँग्रेस कार्यालयात किंवा राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही भेट प्रस्तावित आहे.

पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांची जाहीर भाषणात स्तुती केली होती. भाजपने राहुल गांधींवर केलेल्या टीकेला राज ठाकरे यांनी उत्तरं दिली होती. राज ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल करताना एकप्रकारे प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावली होती. .

यापूर्वी टीव्ही 9 मराठीच्या महाराष्ट्र महामंथन या कार्यक्रमात राज ठाकरे यांना आगामी पंतप्रधान कोण, नरेंद्र मोदी की राहुल गांधी असं विचारण्यात आलं होतं. त्यावेळी राज म्हणाले होते, राहुल यांचं माहित नाही, पण मोदी नक्कीच नाही.

राज ठाकरे यांनी त्यावेळी राहुल गांधींचं नाव टाळलं असलं तरी मोदींना थेट विरोध केला होता.

दुसरीकडे राज ठाकरे हे सातत्याने व्यंगचित्रांच्या माध्यमातून मोदी-शहा जोडी आणि भाजपवर तुफान हल्ले चढवत आहेत.मात्र त्यांनी आजपर्यंत राहुल गांधींवर टीका करणारं व्यंगचित्र काढलेलं नाही.

राज ठाकरे यांनी 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना जाहीर पाठिंबा दिला होता. मात्र मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदी, जीएसटी यासारख्या निर्णयांवर त्यांनी कडाडून हल्ला चढवला होता.

नरेंद्र मोदींना पर्याय नाही असं म्हणणं योग्य नाही, जनता हाच मोदींना पर्याय आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते.

यासर्व पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे राहुल गांधी यांना भेटणार आहेत

मुलांच्या लग्नाचं निमंत्रण

राज ठाकरे हे राहुल गांधींना मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देण्याच्या निमित्ताने भेटण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंचा मुलगा अमितचं लग्न 27 जानेवारी 2019 रोजी मुंबईत होणार आहे. लोअर परळ इथल्या सेंट रेजिस इथं हा लग्नसोहळा पार पडेल. अमित आपली मैत्रीण मिताली बोरुडेसोबत लगीनगाठ बांधणार आहे. राज ठाकरे यांनी काल अमितची लग्नपत्रिका नाशिकमधील सप्तश्रृंगी देवीच्या चरणी ठेवली. अमित ठाकरेंच्या लग्नपत्रिकेत 5 नावं आहेत.अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा साखरपुडा गेल्या वर्षी डिसेंबर 2017 मध्ये पार पडला.

संबंधित बातम्या 

अमितच्या लग्नपत्रिकेत 5 नावं, लग्नासाठी किती जणांना निमंत्रण? 

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.