AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसेत महाअधिवेशनापूर्वी इनकमिंग, राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

राज ठाकरे यांचं निवासस्थान 'कृष्णकुंज'वर अनेक कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला.

मनसेत महाअधिवेशनापूर्वी इनकमिंग, राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
| Updated on: Jan 22, 2020 | 12:50 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनाच्या तोंडावर पक्षात जोरदार इनकमिंगला सुरुवात झाली आहे. जोगेश्वरीतील प्रसिद्ध ‘जय जवान दहिहंडी पथका’तील कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश (MNS Incoming in presence of Raj Thackeray) केला.

राज ठाकरे यांचं निवासस्थान ‘कृष्णकुंज’वर अनेक कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला. यावेळी ठाण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवही उपस्थित होते. मनसेच्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होण्याचा दावा मनसेकडून केला जात आहे.

दोनच दिवसांपूर्वी माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी मनसेमध्ये पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटरवरुन थेट शिवसैनिकांनाच मनसेत सहभागाचं आवताण दिलं आहे.

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती धरला होता. यामध्ये रायगडमधील पेण, मुरुड भागातील कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. याशिवाय विविध शहरं, तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांनीही मनसेची वाट धरली आहे.

स्थानिक नेत्यांची मनमानी, मान-सन्मान किंवा पद मिळत नाही, वरिष्ठ नेत्यांसमोर समस्या मांडूनही होणारं दुर्लक्ष यासारख्या कारणांमुळे सेना-राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनात खदखद होती. अखेर ती पक्षांतराच्या रुपाने बाहेर पडली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला (उद्या, 23 जानेवारी)  मनसेचं महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. गोरेगावमध्ये सकाळी नऊ वाजता मनसेचं पहिलं राज्यव्यापी अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. यावेळी मनसे पक्षाचा झेंडा आणि अजेंडा बदलण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे.

मनसेचा नवा झेंडा भगव्या रंगाचा असणार आहे. यावर सोनेरी रंगाच्या षटकोनात राजमुद्रेप्रमाणे महाराष्ट्र धर्म लिहिलं असल्याची शक्यता आहे. सुलेखनकार अच्युत पालव यांनी हे डिझाईन केले आहे.

MNS Incoming in presence of Raj Thackeray

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.