AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राऊत साहेबांना सिजोफ्रेनिया, पत्रकार परिषदेपूर्वी मेडिटेशन करा… कोणी दिला खोचक सल्ला

संजय राऊत यांना रोज पत्रकार परिषद घेण्यापूर्वी मेडिटेशन करण्याचा सल्ला दिला आहे. आपली काळजीपोटी म्हणून हा पत्रप्रपंच ! पटलं तर घ्या...असे या पत्रात म्हटले आहे.

राऊत साहेबांना सिजोफ्रेनिया, पत्रकार परिषदेपूर्वी मेडिटेशन करा... कोणी दिला खोचक सल्ला
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 22, 2023 | 2:54 PM
Share

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत जोरदारपणे ठाकरे गटाची बाजू लढत आहे. नियमित माध्यमांशी संवाद साधून शिंदे गट व भाजपवर टीका करत आहेत. शाब्दीक फटकारे लागवताना पातळीही घसरत चालली आहे. नेमका हाच मुद्दा पकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना पत्र लिहिले आहे. हे पत्र मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटही केलेय. त्यात संजय राऊत यांना रोज पत्रकार परिषद घेण्यापूर्वी मेडिटेशन करण्याचा सल्ला दिला आहे. आपली काळजीपोटी म्हणून हा पत्रप्रपंच ! पटलं तर घ्या…असे या पत्रात म्हटले आहे.

आपण लिहिलेल्या पत्रासंदर्भात बोलताना संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, मला वाटणाऱ्या काळजीपोटी पत्र लिहिले. मला ते नॉटी म्हणतील, पण हरकत नाही. त्यांना समजवण्याच्या भाषेतच पत्र लिहिले आहे.

सिजोफ्रेनियाची पहिली स्टेप

संजय राऊत यांना मारण्याच्या धमकीसंदर्भातील प्रश्नावर बोलताना ते म्हणाले,  मनासारख्या गोष्टी होत नाही, तेव्हा माणसाला काही तरी भास होतो. ती सिजोफ्रेनियाची पहिली स्टेप आहे. यामध्ये मला कोणतरी मारतंय, कोणीतरी ढकलंतय, मला कोणीतरी पाण्यात बुडवतंय त्याला मानसिक भाषेत सिजोफ्रेनिया म्हणतात. आता उद्धव साहेब यांनी सुद्धा राऊत साहेबांची काळजी घेतली पाहिजे, असे संदीप देशपांडे यांनी म्हटलंय.

काय आहे नेमके पत्र, ते जसेच्या तसे

आदरणीय संजय राऊत साहेब, सस्नेह जय महाराष्ट्र !

sxxx मला का पत्र लिहतंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण विश्वास ठेवा वा ठेवू नका पण तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजी पोटीच हे पत्र लिहीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे. आपली चिडचिड होताना दिसत आहे. आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात. आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढाळू लागतो. त्याची चिडचिड व्हायला लागते. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. माणूस attention seeking होतो. तुम्ही कितीही नाकारलंत तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी.

माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण रोजच्या रोज ज्या पत्रकार परिषद घेता त्या ऐवजी दोन दिवसातून एकदा घ्या, मग हळू हळू आठवड्यातून एकदा घ्या, असं करता येईल का ते जरूर पाहा आणि ते जर शक्य नसेल तर पत्रकार परिषेदच्या अगोदर किमान दहा ते पंधरा मिनिटे मेडिटेशन करा. त्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपणच सगळ्यांना आदरणीय पवार साहेबांच्या नादी लावलं आहे आणि त्यामुळेच शिवसेना हातून गेली ही सल (guilty feeling ) मनाला लावून घेतली आहे, ती पहिले आपल्या मनातून काढून टाका. तुम्ही काही एकटेच ह्या -हासाला जबाबदार नाहीत. उद्धव साहेब आणि आदित्य साहेब सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत हे लक्षात घ्या. नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर पवार…पवार….असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल. कधी काळी तुमचा आणि माझा पक्ष भिन्न असला तरी आपल्यात व्यक्तिगत संवाद होता. ममत्व होते. त्याच काळजीपोटी हा पत्रप्रपंच ! पटलं तर घ्या…नाही पटलं तर चू xx आहे असं म्हणून विसरून जा !

आपला नम्र, संदीप देशपांडे

वाद पेटणार

मनसेने संजय राऊत यांना लिहिलेल्या या पत्रानंतर मनसे व संजय राऊत यांच्यातील वाद पेटण्याची चिन्ह आहेत. आता संजय राऊत या पत्राला कशा शब्दात उत्तर देतात, ते पाहावे लागणार आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच