MNS : एक ठाकरे घराणं शिवसेना वाचवण्यासाठी मैदानात, दुसरे ठाकरे खुली स्पेस घेण्यासाठी, अमित ठाकरेंची फेसबुक पोस्ट वाचा

एकीकडे ठाकरे घराणं शिवसेना वाचवण्यासाठी मैदानात तर दुसरं ठाकरे घराणं खुली स्पेस घेण्यासाठी मैदानात उतरलंय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी अमित ठाकरे 2 आठवडे मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात फिरलेत.

MNS : एक ठाकरे घराणं शिवसेना वाचवण्यासाठी मैदानात, दुसरे ठाकरे खुली स्पेस घेण्यासाठी, अमित ठाकरेंची फेसबुक पोस्ट वाचा
अमित ठाकरेंची फेसबुक पोस्ट वाचा
Image Credit source: Facebook
रचना भोंडवे

|

Jun 26, 2022 | 2:04 PM

मुंबई: एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडखोरीने उभ्या शिवसेनेत फूट पडली. सरकार ढासळलं, राज्यात एकामागोमाग एक राजकीय भूकंप आले. एकनाथ शिंदेनी आपल्यासोबत आकडा वाढवत वाढवत थेट 50 आमदार असल्याचा दावा केला. फुटलेले आमदार हे शिवसेनेचे (Shivsena MLA)फार जुने निष्ठावंत आमदार आहेत असं म्हटलं जातं त्यामुळे शिवसेनेसाठी (Shivsena) हा सगळ्यात कठीण काळ आहे. एकीकडे ठाकरे घराणं शिवसेना वाचवण्यासाठी मैदानात तर दुसरं ठाकरे घराणं खुली स्पेस घेण्यासाठी मैदानात उतरलंय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी अमित ठाकरे 2 आठवडे मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात फिरलेत. नुकतीच अमित ठाकरेंनी या संदर्भातली एक फेसबुक पोस्ट केलीये. ज्यात त्यांनी विद्यार्थी विद्यार्थ्यांचे आभार मानले आहेत.

काय आहे अमित ठाकरेंची फेसबुक पोस्ट

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी गेल्या दोन आठवड्यांत मी मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात गेलो. प्रत्येक ठिकाणी शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी भेटायला येत होते. “मनविसेत जबाबदारी स्वीकारून काम करायचं आहे” असं आग्रहाने सांगत होते. माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या या तरुणाईचा मी खरंच आभारी आहे. मुंबईत हे संपर्क अभियान यशस्वी होण्यामागे फक्त आणि फक्त मनसेचे तसंच मनविसेचे सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिकांची अपार मेहनत आहे. तुम्हा सर्वांच्या सहकार्यानेच मनविसे ही सर्वात प्रबळ आणि प्रभावी विद्यार्थी संघटना बनणार आहे. मनविसेच्या संघटनात्मक बांधणीसाठी आपला अमूल्य वेळ देऊन सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

हे सुद्धा वाचा

एक ठाकरे घराणं शिवसेना वाचवण्यासाठी, दुसरे खुली स्पेस घेण्यासाठी मैदानात

उद्धव ठाकरे यांनी गेल्या तीन दिवसांपासून बैठकांचा सपाटा सुरू केला. आमदार गेले तर गेले. पण पक्ष टिकला पाहिजे या हेतुने त्यांनी बैठका घेण्यास सुरुवात केलीये. आदित्य ठाकरे यांनीही वडिलांप्रमाणेच गेल्या दोन दिवसांपासून मेळाव्यांचा सपाटा लावला आहे. मुंबईतील ठिकठिकाणी होणाऱ्या मेळाव्याला स्वत: आदित्य ठाकरे उपस्थित राहत आहेत. ते स्वत: या मेळाव्याला उपस्थित राहून शिवसेनेत उभारी भरण्याचं काम करत आहेत. शिवसेना कशी एकसंघ आहे हे दाखवण्याचा प्रयत्नही ते करत आहेत. इतकंच काय तर श्मी ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींना फोन करण्यास सुरुवात केली आहे. त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे सगळं ठाकरे कुटुंबीय एक मनसे साठी तर एक शिवसेनेसाठी मैदानात उतरलेलं पाहायला मिळतंय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें