AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कामगिरीच्या आधारावर खरं तर पंतप्रधानांनी पायउतार व्हावं’, मंत्रिमंडळ विस्तारावरुन काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना टोला

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधलाय. कामगिरीच्या आधारावर जर फेरबदल होत असतील तर पंतप्रधान मोदींनीही पदावरुन बाजूला झालं पाहिजे, असा टोला सुरजेवाला यांनी लगावलाय.

'कामगिरीच्या आधारावर खरं तर पंतप्रधानांनी पायउतार व्हावं', मंत्रिमंडळ विस्तारावरुन काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना टोला
रणदीप सुरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते
| Edited By: | Updated on: Jul 07, 2021 | 3:50 PM
Share

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला मंत्रीमंडळ विस्तार अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. अशावेळी कामगिरी चांगली नसल्याचं सांगत काही विद्यमान मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आलाय. तर 20 नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधलाय. कामगिरीच्या आधारावर जर फेरबदल होत असतील तर पंतप्रधान मोदींनीही पदावरुन बाजूला झालं पाहिजे, असा टोला सुरजेवाला यांनी लगावलाय. (Randeep Surjewala criticizes PM Narendra Modi over Union Cabinet expansion)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा मंत्रिमंडळ विस्तार फक्त ‘डिफेक्टर एडजस्टमेंट एक्सरसाईज’ असल्याची टीका सुरजेवाला यांनी केलीय. जर कामगिरीच्या आधारावर मंत्रिमंडळात फेरबदल केले जात असतील तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पदाचा राजीनामा द्यावा. कारण त्यांच्या कार्यकाळातच चीनने आपल्या जमिनीवर कब्जा केलाय. अमित शाह यांनीही गृहमंत्रीपदावरुन दूर व्हावं. कारण, त्यांच्या कार्यकाळातच मॉब लिंचिंग आणि कस्टोडियल डेथसारखे गंभीर प्रकार घडले आहेत. नक्षलवाद्यांनीही डोकं वर काढलं आहे, अशा शब्दात सुरजेवाला यांनी सिंह आणि शाह यांच्यावरही जोरदार टीका केलीय.

धर्मेंद्र प्रधान यांनीही पेट्रोलियम मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे कारण त्यांच्या कार्यकाळात तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. कोरोना संकटातील खराब कामिगीरीमुळे डॉ. हर्षवर्धन यांनी राजीनामा द्यावा. तर अर्थव्यवस्थेतील मिसमॅनेजमेंटमुळे केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही राजीनामा द्यायला हवा, असा टोला सुरजेवाला यांनी लगावलाय. सरतेशेवटी नरेंद्र मोदींनीही पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यायला हवा. कारण त्यांनी देशातील शांतता कचऱ्यात ढकलली आहे, अशी घणाघाती टीकाही सुरजेवाला यांनी केलीय.

8 विद्यमान मंत्र्यांचा राजीनामा

मोदी सरकारमधील एकूण 8 विद्यमान मंत्र्यांनी आपल्या खात्याचा राजीनामा दिला आहे. त्यात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, संतोष गंगवार, देबोश्री चौधरी, रावसाहेब दानवे पाटील, संजय धोत्रे, बाबुल सुप्रियो, सदानंद गौडा या मंत्र्यांचा समावेश आहे. दरम्यान, या नेत्यांना डच्चू मिळतो की दुसरं कुठलं खातं दिलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. डॉ. हर्षवर्धन यांना मात्र दुसरं खातं दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

संबंधित बातम्या :

Modi Cabinet Expansion: प्रीतम मुंडेंचं मंत्रीपद हुकलं, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी पंकजांचं ट्विट, म्हणाल्या…

Modi Cabinet Reshuffle : मोदी कॅबिनेट विस्ताराआधीच धक्क्यावर धक्के, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांपाठोपाठ आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धनचाही राजीनामा

Randeep Surjewala criticizes PM Narendra Modi over Union Cabinet expansion

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...