Modi Cabinet Reshuffle : मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 8 जुलैला होण्याची शक्यता, राणेंना स्थान देण्यामागे भाजपची रणनिती काय?

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या कार्यालयातून फोन आल्यानंतर नारायण राणे आज दिल्लीत दाखल झाले आहेत. अशावेळी नारायण राणे यांना केंद्रात स्थान देण्यामागे भाजपची नेमकी रणनिती काय? याबाबत लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांनी काही गणितं मांडली आहे.

Modi Cabinet Reshuffle : मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 8 जुलैला होण्याची शक्यता, राणेंना स्थान देण्यामागे भाजपची रणनिती काय?
केंद्रीय मंत्री नारायण राणे


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 8 जुलैरोजी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातील काहींना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तर 20 नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यात महाराष्ट्रातून भाजपचे खासदार नारायण राणे यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या कार्यालयातून फोन आल्यानंतर नारायण राणे आज दिल्लीत दाखल झाले आहेत. अशावेळी नारायण राणे यांना केंद्रात स्थान देण्यामागे भाजपची नेमकी रणनिती काय? याबाबत लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांनी काही गणितं मांडली आहे. (Narayan Rane likely to get a place in Union Cabinet)

नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यामागील मुख्य कारण आगामी मुंबई महापालिका निवडणूक असल्याचं संदीप प्रधान यांनी म्हटलंय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना ताकद देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. नारायण राणे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला जेरीस आणण्याचं काम करत आहेत. त्यामुळे राणे यांची वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागत असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे अनेक राज्यात आता विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. काही राज्यात नाराजीचा सूर उमटत आहे. तर काही ठिकाणी भाजपची कामगिरी खराब होण्याची शक्यता व्यक्त होतेय. या पार्श्वभूमीवर आपली प्रतिमा सुधारण्यासाठी, तसंच काही जाती समुहांना मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांची नाराज दूर करण्याचा प्रयत्न मोदी-शहा यांच्याकडून करण्यात येत असल्याचं मत संदीप प्रधान यांनी व्यक्त केलंय.

राणे-नड्डा यांची भेट होणार

8 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपसह अन्य सहयोगी पक्षातील 17 ते 20 राज्यसभा आणि लोकसभा खासदार संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांचं नाव केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सुरुवातीपासूनच चर्चेत होतं. दिल्लीत राणेंची जे पी नड्डा यांच्याशी भेट झाल्यानंतर यावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

कोणाकोणाची वर्णी लागणार

2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आले. मात्र, दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी एकदाही मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. परंतु, आता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे, नारायण राणे आणि हिना गावित यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विस्तारात भाजपमधील नेत्यांसह एनडीएच्या मित्र पक्षांनाही स्थान मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

अनेक मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल

शिवसेना, शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडले आहेत. तर लोजपा नेते रामविलास पासवान यांचं निधन झाल्याने मंत्रिमंडळातील त्यांचं पद रिक्त आहे. त्याशिवाय अनेक मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल केला जाण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

येत्या 7 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार?, राणे, हिना गावित यांचा समावेश होणार?

केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागणार का? नारायण राणेंचं अधिकृत वक्तव्य पहिल्यांदाच जगासमोर

Narayan Rane likely to get a place in Union Cabinet

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI