AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागणार का? नारायण राणेंचं अधिकृत वक्तव्य पहिल्यांदाच जगासमोर

Modi cabinet expansion 2021 मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार का असा प्रश्न आज नारायण राणे यांना विचारण्यात आला. त्यावर नारायण राणे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं.

केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागणार का? नारायण राणेंचं अधिकृत वक्तव्य पहिल्यांदाच जगासमोर
नारायण राणे, भाजप नेते
| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 5:08 PM
Share

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Modi cabinet expansion 2021) होणार असल्याच्या चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु आहेत. अनेक दिवसांपासून रखडलेला विस्तार, मित्रपक्षांनी सोडलेली साथ, नव्याने भाजपमध्ये (BJP) दाखल झालेले नेते या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळणार आणि कोणाला डच्चू मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून भाजपमध्ये दाखल झालेले फायरब्रँड नेते नारायण राणे (Narayan Rane) यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. (Modi cabinet expansion 2021 BJP MP Narayan Rane from Maharashtra name in race his first reaction in Mumbai)

नुकतंच नारायण राणे यांनी दिल्लीवारी केली होती. या दिल्ली दौऱ्यानंतर नारायण राणे यांचा मोदींच्या मंत्रिमंडलात समावेश होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला. अद्याप भाजपकडून अधिकृत नावं जाहीर केलेली नाहीत. मात्र महाराष्ट्रातून दोन-तीन नावं चर्चेत आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे नारायण राणे.

नारायण राणे यांची पहिली प्रतिक्रिया

मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार का असा प्रश्न आज नारायण राणे यांना विचारण्यात आला. त्यावर नारायण राणे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. “केंद्रातील मंत्रिपदाबाबत भाजपाचे नेते निर्णय घेतील, त्याबाबत बोलणं योग्य ठरणार नाही. ज्यांना केद्रांत पाठवतील ते जातील” असं नारायण राणे म्हणाले.

राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार? 

पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणे यांना स्थान दिलं जाऊ शकतं असं सांगण्यात येत आहे. निरोप आल्यावर केंद्रात जाऊ, अशी प्रतिक्रियाही राणे यांनी दिली आहे. त्यामागे नारायण राणे हे राज्यातला मराठा समाजातील मोठा चेहरा आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात भाजपने रान पेटवलं असताना नारायण राणे यांना केंद्रात स्थान देत महाविकास आघाडी सरकार आणि खास करुन शिवसेनेला जेरीस आणण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी व्यक्त केलाय. त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. राणे हे बराच काळ शिवसेनेत होते. तसंच त्यांना मुंबई महापालिकेतील खाच-खळगे माहिती आहेत. त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचाही अनुभव आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंचा उपयोग होऊ शकतो, असा भाजपचा कयास असेल असंही त्यांनी म्हटलंय.

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा आहे. गेल्या आठवड्याभरापासून दिल्लीत भाजपच्या जोरबैठका सुरु आहेत. त्यातच नारायण राणे यांना केंद्रात मंत्री केलं जाण्याची जोरदार चर्चा आहे. त्यासाठी राणे दिल्लीतही गेल्याचं समजतं. पण खरंच राणेंना मंत्री केलं तर त्याचा सगळ्यात मोठा इफेक्ट राज्याच्या राजकारणात होऊ शकतो आणि तोही शिवसेनेसोबत.

 प्रीतम मुंडेंचं नावही चर्चेत 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आता जोर धरु लागलीय. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची शुक्रवारी महत्वाची बैठक पार पडली. अशावेळी आता महाराष्ट्रातून दोन मोठी आणि महत्वाची नावं समोर येत आहेत. त्यात खासदार नारायण राणे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे.

संबंधित बातम्या 

Modi Cabinet Expansion : नारायण राणेंना केंद्रात मंत्री बनवण्यामागे भाजपाची कोणती खेळी असू शकते? हे 5 कारणे लक्षात ठेवा!   

Modi Cabinet Expansion : राणेंना मंत्रिपद म्हणजे शिवसेनेच्या जखमेवर मीठ? सेना-भाजप एकत्र येण्यात कायमचा अडथळा? वाचा सविस्तर  

Modi cabinet expansion 2021 : नारायण राणे, प्रीतम मुंडेंना केंद्रात स्थान मिळण्याची शक्यता किती?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.