राज्यातील कुठलाही सरपंच हा मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त हुशार : नारायण राणे

लोकांसमोर येऊन बोलत नाही. मंत्रालयात ते येत नाहीत, असेही राणे म्हणाले. (Narayan Rane Criticizes CM Uddhav thackeray) 

राज्यातील कुठलाही सरपंच हा मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त हुशार : नारायण राणे
भाजप नेते नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 5:05 PM

सिंधुदुर्ग : महाविकासआघाडीचे सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कृपेमुळे बसलं आहे. नाहीतरं असा मुख्यमंत्री कोणी केला असता. उद्धव ठाकरेंचं कोणीही ऐकत नाही. म्हणूनच महाराष्ट्राची ही अवस्था आहे, अशी सणसणीत टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली. (Narayan Rane Criticizes CM Uddhav thackeray)

“महाविकासआघाडीचे सरकार पवारांच्या कृपेमुळे बसलं आहे. नाहीतर असा मुख्यमंत्री कोणी केला असता? या राज्यातील कोणताही सरपंच या मुख्यमंत्र्यांपेक्षा कितीतरी हुशार आणि कायदे माहिती असलेला आहे,” अशी टीका राणेंनी केली.

“उद्धव ठाकरेंचे कोणीही ऐकत नाही. कारवाई केली तर हातात आहेत तीही लोक पळतील. ते घरातून बोलतात. लोकांसमोर येऊन बोलत नाही. मंत्रालयात ते येत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकांना सांगतात. इतरांना 50 माणसं जमवू द्यायची नाही आणि संजय राठोडवर काय कारवाई केली. टीव्हीवरुन बोलत असताना लोकांना प्रश्न विचारतात तुम्ही काही उत्तर देत नाही. लोकं समोर नव्हते. त्यांचं कोणीही ऐकत नाही. म्हणूनच महाराष्ट्राची ही अवस्था आहे,” असेही नारायण राणे म्हणाले.

“एवढं असताना चौकशी का होत नाही?”

तुम्ही मेहनत करुन क्लिप बाहेर काढली, पण एवढं असताना चौकशी होत नाही. त्या ऑडिओ क्लिपमध्ये आवाज कोणाचा आहे. संभाषण कोणाचं आहे. तिला डॉक्टरकडे ने, हे कर ते कर, हा आवाज कोणाचा आहे. संजय राठोड १५ दिवसांनी सांगतात, भाजप कुटुंब उद्धवस्त करायला निघाले, भाजपला काही कामधंदे नाहीत का?? असा सवालही राणेंनी उपस्थित केला.

“सरकार आरोपींना पाठिशी घालतंय”

कोण आला रे कोण आला बंजाऱ्यांचा वाघ आला. पूजा चव्हाण यांचा मृत्यू आत्महत्येने झाला की त्यांचा खून झाला हे समोर आलेलं नाही. पण राठोड आणि पूजा यांच्या अकरा व्हिडीओ क्लिप समोर आल्या आहेत. या प्रकरणात संजय राठोड यांचं नाव घेतलं जात होतं. ते पंधरा दिवसांपासून फरार होते. नंतर ते बाहेर पडले आणि मंदिरात गेले. ते संत आहेत का? मंदिरात जायला? ज्याच्यावर आरोप आहेत. आरोपाला सामोरे जा. पळताय कशाला? मग क्लिपचा आवाज खराय की खोटाय हे आधी सरकारने आम्हाला सांगावं. सरकार विनयभंग, बलात्कार, खून करणाऱ्या लोकांना पाठीशी घालतं. सरकार सुशांत सिंग, दिशा सालियान, पूजा केस या सर्व केसमध्ये आरोपींना पाठिशी घालतंय. या सरकारला लायसन्स दिलंय का?

बलात्कार केलेल्या माणसांना वाघ म्हणाल तुम्ही? ही कमाल आहे. मी आता त्यांना संत म्हणतो. संत संजय राठोड लगे रहो. समाजाने जो विकास कामे करतो त्याच्या पाठिमागे जावं. कुठलंही कृत्य करणाऱ्याच्या पाठीमागे जाऊ नये, असं माझं सांगणं आहे. वाघ असेल तर सांभाळा. सरकारने सांभाळावं. पिंजऱ्यात ठेवा नाहीतर मातोश्रीत एक पिंजरा लाऊन ठेवा, असेही राणे म्हणाले. (Narayan Rane Criticizes CM Uddhav thackeray)

संबंधित बातम्या : 

एक मार्चपासून 60 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस, जावडेकरांची घोषणा

संजय राठोड यांना चपलेनं झोडला पाहिजे; चित्रा वाघ यांचा घणाघात, पुणे पोलिसांवरही गंभीर आरोप

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.