Chhatrapti Sambhajiraje | आमची मागणी SEBC आरक्षणाची, ओबीसीतून आरक्षण काढून घेण्याचा विषयच नाही : संभाजीराजे

आजच्या सुनावणीत सरकारचे वकील मराठा समाजाकडून जोमाने भूमिका मांडतील आणि गेल्यावेळी जे झालं ते होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

Chhatrapti Sambhajiraje | आमची मागणी SEBC आरक्षणाची, ओबीसीतून आरक्षण काढून घेण्याचा विषयच नाही : संभाजीराजे
खासदार संभाजी छत्रपती
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 12:38 PM

मुंबई : “आमची मागणी SEBC आरक्षणाची, ओबीसीतून आरक्षण काढून घेण्याचा विषयच नाही” (Chhatrapti Sambhajiraje On Maratha Reservation Hearing), असं खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं. आज सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे प्रथमच सुनावणी होणार आहे. त्याबाबत संभाजीराजे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं. सर्वोच्च नायालयात सर्वोच्च न्यायालयात जो विषय सुरु आहे तो SEBC आरक्षणाचा आहे, असं ते म्हणाले. तसेच, आजच्या सुनावणीत सरकारचे वकील मराठा समाजाकडून जोमाने भूमिका मांडतील आणि गेल्यावेळी जे झालं ते होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला (Chhatrapti Sambhajiraje On Maratha Reservation Hearing).

मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचा दिवस

मराठा आरक्षणासाठी आज महत्त्वाचा दिवस असणार आहे. कारण, आज सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे प्रथमच सुनावणी होणार आहे. यातून मराठा समाजातील नागरिकांना दिलासा मिळणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली. त्यानंतर मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली होती. घटनापीठाच्या सुनावणीदरम्यान महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करता येणार नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केले होते. यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदाच सुनावणी होणार आहे.

संभाजीराजे काय म्हणाले?

“मराठा समाजाला आरक्षणासाठी एक वर्षाची स्थगिती मिळाली होती. आज जी सरकारची मागणी होती की पाच न्यायाधिशांच्या घटनापीठापुढे ही सुनावणाी व्हावी आणि ती मागणी पूर्ण झाली आहे. आज दुपारी 2 वाजता याबाबत सुनावणी होणार आहे. आमचा पूर्ण विश्वास आहे की वकील मुकूल रोहितगी आणि त्यांचे सर्व सहकारी न्यायालयात मराठा समाजाची भूमिका चांगल्या पद्धतीने मांडतील”, असा विश्वास संभाजीराजेंनी व्यक्त केला.

“मराठा समाजातील मुलांवर अन्याय व्हायला लागला आहे, त्याला कारणंही अनेक आहेत. गेल्यावेळी सरकारकडून ज्या चुका झाल्या होत्या सरकारने त्या दुरुस्त केल्या आहेत. माझाही पाठपुरावा आहे. कालच मुख्यमंत्र्याला फोन आला होता. मराठा समाजाचे जे वकील आहेत त्यांची एक व्हीसी मुकुल रोहितगी यांनी काल घेतली. त्या बैठकीला स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण उपस्थित होते, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे गेल्यावेळी जो समन्वयाचा अभाव होता तो यावेळी भरुन काढल्याचं दिसून येत आहे. वकील आपली बाजू जोमाने मांडतील असा मला विश्वास आहे”, असंही ते म्हणाले (Chhatrapti Sambhajiraje On Maratha Reservation Hearing)

“सरकारचा बऱ्यापैकी होमवर्क यावेळी झालेला आहे. मुख्यमंत्र्यांनीही ते सांगितलं. गेल्यावेळी जे कमी पडलं होतं ते आज होणार नाही असं मला वाटतं. गरिब मराठा समाजदावर अन्याय होतो आहे. मी त्या 15 टक्के मराठ्यांबाबत नाही बोलत मी त्या 85 टक्के मराठा समाजाबाबत बोलत आहे जे आजही गरिब आहेत. कायद्याला बोट देऊन सर्व गोष्टी चालतात. पण जी शाहू महाराजांची भूमिका होती, त्याला लक्षात घेवून या पाच न्यायाधिशांनी निर्णय घ्यावा एवढीच माझी अपेक्षा आहे”, असं त्यांनी सांगितलं.

“आमची भूमिका स्पष्ट आहे, आमची मागणी ही SEBC आरक्षणाची आहे. ओबीसीतून आरक्षण काढून घेण्याचा हा विषयच यावेळी नाही. मग ही चर्चा का करावी. मंत्रिमंडळातील जे मोठे नेते आहेत त्यांनी माझं नाव घेवून एक विधान केलं होतं. पण, मला जर माझी भूमिका मांडायची असेल तर आमची मागणी ही SEBC आरक्षणाची आहे. सर्वोच्च न्यायालयात जो विषय सुरु आहे तो SEBC आरक्षणाचा आहे”, असं म्हणत संभाजीराजेंनी ओबीसी नेत्यांच्या टीकेला उत्तर दिलं.

सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय?

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

12% शैक्षणिक, तर नोकरभरतीतील 13% आरक्षणाला स्थगिती

SEBC अंतर्गत मिळालेल्या आरक्षण स्थगित

मेडिकल प्रवेशात मात्र SEBC आरक्षण कायम

SEBC नुसार भरती व प्रवेश नको : सुप्रीम कोर्ट

मराठा आरक्षणाचा खटलाही घटनापीठापुढे

पाच किंवा त्यापेक्षा जास्त न्यायमूर्ती घटनापीठावर राहणार

खंडपीठावर कोण कोण?

न्या. अशोक भूषण न्या. नागेश्वर राव न्या. अब्दुल नजीर न्या. हेमंत गुप्ता न्या. रवींद्र भट

Chhatrapti Sambhajiraje On Maratha Reservation Hearing

स्थगिती देताना SC काय म्हणाले?

1. मराठ्यांना आरक्षणाची गरज सरकार पटवून देऊ शकले नाही 2. 50% पलीकडे जाण्यासाठी अपवादात्मक, अतिविशेष स्थिती पटवून देता आले नाही 3. मराठा आरक्षण वैध ठरवण्यात HC चुकले 4. अपवादात्मक, अतिविशेष स्थिती HC ने कशी मान्य केली? 5. 2020-2021 साठी मराठा आरक्षण लागू होणार नाही

Chhatrapti Sambhajiraje On Maratha Reservation Hearing

संबंधित बातम्या :

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी; जाणून घ्या, संपूर्ण घटनाक्र

कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता एक चांगला निर्णय येईल; अमोल मिटकरी आशावादी

Non Stop LIVE Update
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.