AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरं बोलतो म्हणून मला आधी टार्गेट केलंय, भाजपाच्या प्रचारसभेपूर्वी खा. इम्तियाज जलील यांचं टीकास्त्र!

औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या भव्य ग्राउंडवर जे पी नड्डा यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.

खरं बोलतो म्हणून मला आधी टार्गेट केलंय, भाजपाच्या प्रचारसभेपूर्वी खा. इम्तियाज जलील यांचं टीकास्त्र!
खासदार इम्तियाज जलील Image Credit source: social media
| Updated on: Jan 02, 2023 | 2:12 PM
Share

दत्ता कनवटे, औरंगाबादः भाजपाला या देशात हुकुमशाही हवी आहे. लोकसभा खासदारांपैकी (Loksabha MP) कुणीही त्यांच्या निर्णयांविरोधात आवाज उठवू नये, अशीच त्यांची इच्छा आहे. मी नेहमी खरं बोलतो, त्यामुळे मला आधी टार्गेट (Target) करण्यात येतंय, असं वक्तव्य औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केली आहे. भाजपाच्या मिशन 144 अंतर्गत आज औरंगाबादेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर खा. जलील यांनी ही प्रतिक्रिया दिली.

जे पी नड्डा यांनी आपल्या भाषणात औरंगाबादच्या समस्या आणि विकासावरही बोलावं, असा सल्ला त्यांनी दिलाय. ते म्हणाले, ‘ लोकांसाठी काम करणं हे माझं काम आहे. या देशात कोणताही विरोधी आवाज नसावा, अशी भाजपची इच्छा असते. त्यांना हुकुमशाही पाहिजे. लोकसभा मतदारसंघांमधून भाजपाला विरोध करणारे कुणीही खासदार तयार होऊ नयेत, अशी त्यांची भूमिका आहे. मी खरं बोलतो, त्यामुळे कदाचित सर्वात आधी मला टार्गेट करण्यात येतं, त्यामुळेच आज ते औरंगाबादेत येत आहेत.

मिशन 144 मध्ये औरंगाबाद!

येत्या 2024 मधील लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने प्रचार मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी भाजपचा खासदार नाही, अशा देशभरातील 144 ठिकाणी आधी प्रचाराचा धडाका सुरु आहे. याच मालिकेत आज चंद्रपूर आणि औरंगाबादेत भाजपच्या सभा होत आहेत. चंद्रपुरातही काँग्रेसचे खासदार आहेत तर औरंगाबादेत एमआयएमचे खा. इम्तियाज जलील आहेत. हाच मतदारसंघ भाजपने टार्गेट केल्याचं आजच्या आयोजनावरून दिसून येतंय.

औरंगाबादेत जोरदार तयारी

औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या भव्य ग्राउंडवर जे पी नड्डा यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. मराठवाड्यातील दिग्गज भाजप नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे.  केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

त्याआधी जे पी नड्डा चंद्रपुरात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी नेते दौऱ्यात आहेत.

मराठवाड्यात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची सभा असूनही पंकजा आणि प्रीतम मुंडे या भगिनींना कार्यक्रमाचं निमंत्रण न मिळाल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.