कर्जमाफी, हमीभाव केवळ मलमपट्ट्या : राजू शेट्टी

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By:

Updated on: Jul 05, 2019 | 4:50 PM

मुंबई : कर्जमाफी, हमीभाव हे सगळं मलमपट्ट्या करण्याचं काम आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर केली. शिवाय, शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना केल्या जात नाहीत, असा आरोपही राजू शेट्टींनी केला. तसेच, सरकारचा हमीभाव आणि बाजारपेठेतील भाव यांच्यात 1000 ते 1200 रुपयांचा फरक असल्याचेही राजू शेट्टी […]

कर्जमाफी, हमीभाव केवळ मलमपट्ट्या : राजू शेट्टी

मुंबई : कर्जमाफी, हमीभाव हे सगळं मलमपट्ट्या करण्याचं काम आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर केली. शिवाय, शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना केल्या जात नाहीत, असा आरोपही राजू शेट्टींनी केला. तसेच, सरकारचा हमीभाव आणि बाजारपेठेतील भाव यांच्यात 1000 ते 1200 रुपयांचा फरक असल्याचेही राजू शेट्टी यांनी सांगितले.

“2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने ही दिशाभूल करणारी आहेत. शेतकऱ्यांना आश्वासने दिली आणि शेतकऱ्यांची दिशाभूल केली गेली. जी आश्वासने दिली ती पूर्ण न होणारी होती. सरकारला बाजारपेठ स्थिर ठेवता आलं नाही, आयात-निर्यातीचं धोरणं ठरवता आली नाहीत. सरासरी उत्पन्नात जास्त फरक पडत नाही. बाहेरच्या देशातून जी डाळ येतेय, ती थांबवण्याचा प्रयत्न का केला नाही?” असे आरोप राजू शेट्टी यांनी केला. तसेच, पीक विम्यातील घोटाळा आम्हीच बाहेर काढला, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 11 अधिकाऱ्यांना निलंबित केलं, असेही राजू शेट्टींनी नमूद केले.

“कांदा संकटांबाबत पंतप्रधान आणि कृषिमंत्री यांना आधीच पत्र लिहून कळवलं होतं. निर्यातीवर अनुदान दिलं असतं, तर कांदा उत्पादकांवर ही वेळ आली नसती”, असेही यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितले. मात्र, यावर महादेव जानकर म्हणाले, कांदा उत्पादकांना थोड्या दिवसात चांगला निर्णय येणार आहे.

भेकड गाईंच्या प्रश्नावर शेट्टी आणि जानकर काय म्हणाले?

भाकड जनावरांना बाजारात विकल्यावर चांगला पैसा मिळत होता, मात्र गोवंश कायदा आणल्यानंतर शेतकरी हवालदिल झाल्याचे राजू शेट्टींनी सांगितले. “बेवारसी जनावरं शेतामध्ये जाऊन नुकसान करतात. अनेक अपघात घडतात. सरकारने गोवंश कायद्याबाबत पुन्हा विचार करावा.”, असे भेकड गाईंबाबत बोलताना राजू शेट्टी यांनी मागणी केली. त्यावर बोलताना महादेव जानकर म्हणाले, “गोशाळांना पैसे देणारे फडणवीस सरकार एकमेव आहे. गोशाळांना 34 कोटी रुपये दिले गेले.”

दुधाच्या प्रश्नावर शेट्टी-जानकर काय म्हणाले?

खासगी दूध संघाना अनुदानाचे पैसे मिळत नाहीत. दूध संस्था आणि सरकारच्या वादात शेतकऱ्यांचा बळी जातोय, असे राजू शेट्टींनी सांगितल्यावर महादेव जानकर म्हणाले, “शेतकऱ्याला दुधाला 5 रुपये अनुदान आपण देतोय. आपल्या राज्यातील दूध संघ मजबूत व्हावं यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावं, यासाठी सरकार प्रयत्न करतेय. अनुदानाचे दोन हफ्ते थकलेत हे खरंय, ते लवकरात लवकर देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांकडून 25 रुपये प्रमाणे दूध खरेदी करावी.”

शेतकरीच सरकार उलथवतील : राजू शेट्टी

पाच राज्यातील निकालांवर शेतकऱ्यांचा परिणाम अधिक जाणावला असून, संघटीत झालेल्या शेतकऱ्यांनी सरकार उलथवलं आहे, असे सांगताना राजू शेट्टी पुढे म्हणाले, महाराष्ट्रातही शेतकरी रोषाचा परिणाम सरकारला सहन करावा लागणार असून, शेतकरी फॅक्टर महाराष्ट्रात सुद्धा महत्वाचा ठरणार आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI