AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसेकडून मुस्लिमांसाठी अजमेर यात्रेच्या आयोजनावर काय म्हणाले संजय राऊत?

"घाटकोपर, बोरिवलीच्या जागेबद्दल तुमच्याकडे चुकीची माहिती आली आहे. जेव्हा जागा वाटप जाहीर होईल, तेव्हा तुमची माहिती चुकीची आहे हे सिद्ध होईल. कुठलीही जागा महायुतीसाठी अजिंक्य नाही. प्रत्येक जागेवर आव्हान आहे.

मनसेकडून मुस्लिमांसाठी अजमेर यात्रेच्या आयोजनावर काय म्हणाले संजय राऊत?
Sanjay Raut
| Updated on: Sep 13, 2024 | 11:19 AM
Share

“काल नांदेडवरुन निघालो, सोलापुरात पोहोचलो. नांदेडपासून सोलापुरपर्यंत अनेक कार्यक्रम, मेळावे झाले. सोलापुरच म्हणालं, तर दक्षिण सोलापुरची तयारी पक्की आहे. दक्षिण सोलापुरची जागा अनेकदा शिवसेनेने जिंकलेली आहे. मविआत आम्ही एकत्र बसून चर्चा करतोय. त्या चर्चेत दक्षिण सोलापुरचा विषय जेव्हा येईल तेव्हा नक्कीच चर्चा होईल. अनेक मतदारसंघात प्रत्येक पक्ष तयारी करतो. आमचे कार्यकर्ते, संभाव्य उमेदवारांना कामाला लागा असं सांगायला हरकत नाही. ही जागा मविआ जिंकेल. इथे शिवसेनेचा आमदार असावा अशी आमची इच्छा आहे” असं खासदार संजय राऊत म्हणाले. “राज्यातलं चित्र म्हणाल, तर काय चित्र आहे हे आपण जाणता. मविआ आणि आम्ही घटक पक्ष मिळून किमान 170 ते 175 जागा जिंकू. या बाबत कोणाच्या मनात शंका असण्याच काही कारण नाही. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार खासगीत हाच आकडा देतील. राज्यात वातवरण मविआसाठी अनुकूल आहे” असं संजय राऊत म्हणाले.

मुंबईतल्या पाच जागांवर महाविकास आघाडीतून एकाही पक्षाने दावा केलेला नाही या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, “घाटकोपर, बोरिवलीच्या जागेबद्दल तुमच्याकडे चुकीची माहिती आली आहे. जेव्हा जागा वाटप जाहीर होईल, तेव्हा तुमची माहिती चुकीची आहे हे सिद्ध होईल. कुठलीही जागा महायुतीसाठी अजिंक्य नाही. प्रत्येक जागेवर आव्हान आहे. मुंबईच वातावरण मविआसाठी अनुकूल आहे. लोकसभेच चित्र विधानसभेतही दिसेल. मविआ जास्त जागा जिंकेल”

विदर्भ मविआसाठी केकवॉक

भाजपाच्या विदर्भाबाबतच्या अंतर्गत सर्वेबद्दलही संजय राऊत बोलले. “महायुतीला विदर्भात 25 जागाही मिळणार नाहीत. भाजपाला फक्त 12 ते 13 जागा मिळतायत. आकाडा फुगवनू सांगितला आहे त्यांनी. सर्वात मोठा फटका नागपूर जिल्ह्यात बसणार आहे. फडणवीसांना आत्ताच दम लागलाय त्यांच्या मतदारसंघात फडणवीसांना निवडणूक सोपी नाही. विदर्भ मविआसाठी केकवॉक आहे” असं संजय राऊत म्हणाले.

मनसेकडून अजमेर यात्रेच आयोजन

मनसेने मुस्लिम बांधवांसाठी अजमेर यात्रेच आयोजन केलय मध्यंतरी कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून मनसेने ओळख निर्माण केलेली, आता मवाळ भूमिका घेतलीय असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. “मनसे सारख्या पक्षाला कोणत्या भूमिका असण्याचा कारण नाही. एखाद्या समाजासाठी मुस्लिमांसाठी अजमेर यात्रेची तयारी केली असेल, त्यात वाईट वाटण्याच कारण नाही. यात हिंदुत्व, इतर धर्माचा प्रश्न येतो कुठे? अजमेरला कोणाला जायचं असेल. त्याची व्यवस्था कोणी करत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. मनसेला सुबृद्धी सुचली त्यांचं स्वागत आहे” असं संजय राऊत बोलले.

पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....