AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : ‘मुंगी साखर खाते, तसं मनसेच मुख्य अन्न सुपारी’, संजय राऊत यांचा घणाघात

Sanjay Raut : अजित पवार यांनी काल एक खळबळजनक विधान केलं. आर.आर.पाटील यांनी आपला केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला असं अजित पवार म्हणाले. "आबांचे केस लहान होते. ते कसाने गळा कापू शकत नाही. ते प्रामाणिक, कर्तबगार गृहमंत्री होते. त्यांनी गृहमंत्री म्हणून कधी चुकीच काम केलं नाही" असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : 'मुंगी साखर खाते, तसं मनसेच मुख्य अन्न सुपारी', संजय राऊत यांचा घणाघात
sanjay raut raj thackeray
| Updated on: Oct 30, 2024 | 11:22 AM
Share

“शेकाप मविआमध्ये आहे. शेकापला ज्या जागा हव्या, त्या शिवसेनेकडे आहेत. शेकापची ताकद कोकणात विशेषकरुन रायगडमध्ये आहे. त्या जागा आम्ही त्यांना द्यायला तयार आहोत. अलिबाग, सांगोला या शिवसेनेच्या जिंकलेल्या जागा आहेत” असं खासदार संजय राऊत म्हणाले. लोकसभेला ठाणे, कल्याणमधील पराभवावर संजय राऊत म्हणाले की, “पराभव लादला गेला. यंत्रणांचा वापर करुन दुबार मतदान अशा अनेक गोष्टींचा वापर करुन ठाण्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. यावेळी अधिक जागरुक आहोत”

टाटा एअर बस प्रकल्प गुजरातला नेला, त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, “हा प्रकल्प विदर्भात नागपूरला होणार होता. त्यासाठी जमीन निश्चित झाली होती. स्पेनच्या सहकार्याने हा टाटा एअरबसचा प्रकल्प होणार होता” “सुरुवातीला 40 हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्राला मिळणार होती, त्यातून 10 हजार लोकांना रोजगार मिळणार होता. पण नरेद्र मोदींनी हा प्रकल्प गुजरातला पळवून नेला. हा महाराष्ट्रावरचा अन्याय आहे, असं आमच्या राज्यकर्त्यांना वाटत नसेल तर त्यांनी गुजरातला निघून जावं” असं संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे-अजित पवारांनी गुजरातला निघून जावं

“शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार यांच्या पक्षाच हेडक्वार्टर गुजरातला आहे. त्यांनी तिथे जाऊन राजकारण करावं. महाराष्ट्रात मराठी माणसाच राजकारण करु नये” असं संजय राऊत म्हणाले. वांद्रे पूर्वमधून मनसेने तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली आहे, त्यावर सुद्धा संजय राऊत यांनी भाष्य केलं. “महाराष्ट्रात काही पक्ष आहेत, त्यांचं मुख्य खाद्य सुपारी आहे. ते सुपारीवर जगणारे पक्ष आहेत. मुंगी साखर खाते, झुरळ वेगळं काहीतरी खातं, वाघ अजून कायतरी खातो. राजकारणात असे काही पक्ष आहेत, त्यांचं मुख्य अन्न सुपारी आहे. आता सुपारीवर जगणाऱ्या लोकांनी महाराष्ट्रात शिवसेनेचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्राच्या शत्रुंशी हातमिळवणी केली असेल, तर ते या राज्याच दुर्देव आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.