“आमच्या कमळाला ‘बाई’ म्हणत हिणवता, आम्ही तुम्हाला पेंग्विनसेना म्हणायचं का?”, आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहित प्रश्न विचारला आहे.

आमच्या कमळाला 'बाई' म्हणत हिणवता, आम्ही तुम्हाला पेंग्विनसेना म्हणायचं का?, आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना सवाल
आयेशा सय्यद

|

Sep 03, 2022 | 1:32 PM

मुंबई : मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पत्र लिहित प्रश्न विचारला आहे. “आमच्या कमळाला ‘बाई’ म्हणत हिणवता, आम्ही तुम्हाला पेंग्विन सेना म्हणायचं का?”, असं शेलार म्हणाले आहेत. त्यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचं राजकारण चांगलंच पेटलंय. शिवसेना आणि भाजपमधील राजकीय संघर्ष आता आणखीच वाढण्याची शक्यता आहे. कारण मुंबई भाडप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेला प्रश्न विचारणारं ट्विट केलं आहे.

आशिष शेलार यांचं ट्विट

आशिष शेलार यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी उद्धव ठाकरेंना टॅग करत “कृपया,हे लक्षात असू द्या!”, असं म्हटलं आहे. शेलारांनी उद्धव ठाकरेंसाठी एक पत्र लिहिलं आहे. त्यात आशिष शेलार म्हणतात- “मा. श्री.उध्दवजी ठाकरे, महोदय आपण आमच्या कमळाला हिणवायला “बाई” म्हणताय ? हरकत नाही, बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मीपण आहे.त्यामुळे तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला, आम्ही आता “पेग्विन सेना ” म्हणायचे का?ता.क. असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत!,आपला आ. अॅड. आशिष शेलार” असं पत्र शेलारांनी लिहिलं आहे.

मुंबई महापालिका तोंडावर आहेत.भाजप आणि शिंदेगटाची युती झालीय. अश्यात आशिष शेलार यांच्यावर मुंबईच्या अध्यक्षपदाची जबादारी देण्यात आली आहे. त्यामुळे ते आता अधिक आक्रमकपणे विरोधकांवर टीका करताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

तर दुसरीकडे भाजप आणि मनसेची सलगी वाढताना दिसत आहे. याआधी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली त्यानंतर आता अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यात लवकरच भेट होण्याचीही शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी भाजप आणि मनसेची युती झाली तर त्याचा शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें