हा आक्रोश मोर्चा! महाराष्ट्र दाऊदच्या कराचीसमोर झुकणार नाही; मलिकांना राजीनामा द्यावाच लागेल – शेलार

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजपा नेते आक्रमक झाले असून, आज भाजपाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानात मलिकांच्या राजीनाम्यासाठी मोर्चा काढण्यात आला.

हा आक्रोश मोर्चा! महाराष्ट्र दाऊदच्या कराचीसमोर झुकणार नाही; मलिकांना राजीनामा द्यावाच लागेल - शेलार
आशिष शेलार यांची महाविकास आघाडीवर टीकाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 2:22 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. इक्बाल कासकर यानं मलिक यांचे नाव घेतल्याने त्यांना ईडीकडून (ED) अटक करण्यात आली होती. दरम्यान नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्यातील भाजप नेते अधिक आक्रमक झाले असून, त्यांनी नवाब मलिक यांना अटक झालेल्या दिवसापासून मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान आज मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपाच्या वतीने भव्य अशा मोर्चाचे मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला देवेंद्र फडणवीसांसह भाजपाचे बडे नेते तसेच हजारो कार्यकर्ते उपस्थित आहेत. या मोर्चावेळी बोलताना भाजपा नेते आशिष शेलार यांनी मलिकांसह राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्र कधी दाऊदच्या कराची समोर झुकणार नसल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. हा मोर्चा आक्रोश आणि व्यथा मांडणारा मोर्चा आहे. महाविकास आघाडीचं सरकार एका राष्ट्रीय गुन्हेगाराला मदत करत आहे. मलिक यांचा राजीनामा तातडीने घेण्यात यावा अशी मागणी यावेळी अशिष शेलार यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले शेलार?

भाजपाचा हा मोर्चा मलिकांच्या राजीनाम्यासाठी आहे. हा आक्रेश आणि व्याथा मांडणारा मोर्चा आहे. दाऊदने या देशावर आक्रमण केलं, बॉम्बस्फोट घडवून आणले. या बॉम्बस्फोटामध्ये अनेक निष्पाप माणसे मारली गेली. त्या दाऊद इब्राहीमशी आणि त्याच्या माणसांशी संबंध ठेवणाऱ्या लोकांना हे सरकार पाठीशी घालत आहे. महाराष्ट्र कधी दाऊदच्या कराची समोर झुकणार नाही. आजचा मोर्चा हा मलिकांच्या राजीनाम्यासाठीच आहे. सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी शेलार यांनी केली आहे.

‘जनता कधीही माफ करणार नाही’

दरम्यान यावेळी बोलताना विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. हा भाजपाचा आक्रोश मोर्चा आहे. हा जनतेचा मोर्चा आहे. मोर्चासाठी लाखोच्या संख्येने लोक आझाद मैदानात येत आहेत. दहशतवाद्यांशी साटलोट असलेल्या लोकांना हा देश कदापीही माफ करणार नसल्याचे प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

कुभांड रचण्याची ट्रेनिंग महाराष्ट्र पोलिसांना सीबीआयकडून घ्यावी लागेल, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

VIDEO: एकाच व्यक्तिच्या घरी 90 छापे मारण्याचा प्रकार पहिल्यांदाच पाहिला; देशमुखांच्या घरी मारलेल्या धाडींची यादी पवारांनी वाचून दाखवली

VIDEO: नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही, भाजपच्या मोर्चाआधीच शरद पवारांचं मोठं विधान

Non Stop LIVE Update
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.