AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विरोधी पक्षनेतेपदी वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा होताच मुख्यमंत्री म्हणाले, आशा आहे, तुम्ही वर्कफ्रॉम होम करणार नाही!

Vijay Wadettiwar Legislative Assembly Leader of Opposition : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा; शुभेच्छा देताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून चिमटे

विरोधी पक्षनेतेपदी वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा होताच मुख्यमंत्री म्हणाले, आशा आहे, तुम्ही वर्कफ्रॉम होम करणार नाही!
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Aug 03, 2023 | 1:47 PM
Share

मुंबई | 03 ऑगस्ट 2023 : काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विधिमंडळात आज त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर वडेट्टीवार यांचं अभिनंदन करण्यात आलं. वडेट्टीवार यांच्यासाठी अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजय वडेट्टीवार यांचं अभिनंदन केलं. पण हे अभिनंदन करताना चिमटेही त्यांनी काढले.

विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. त्यांचं मी अभिनंदन करतो. तुम्ही वर्क फ्रॉम होम करणारे नेते नाहीत. त्यामुळे  मला आशा आहे की, तुम्ही वर्क फ्रॉम होम करणार नाहीत. विजय वडेट्टीवार हे माजी शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांच्या विचारांनुसार त्यांचं काम आजही सुरु आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

काही लोकांना बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास लाभला. पण त्यांचे संस्कार लाभले नाहीत. वर्ष झालं तरी काहींना खुर्ची गेल्याचं दु:ख अजूनही आहे, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

निवडणुकांत्या आधी वडेट्टीवार विरोधी पक्षनेते झाले आहेत. मात्र लक्षात ठेवा सरकार आमचंच येणार आहे, असंही त्यांनी म्हटलं.

कालचे विरोधी पक्षनेते आज आमच्यासोबत आहेत, असं म्हणत राधा कृष्ण विखे पाटील, अजित पवार यांचं नाव घेत एकनाथ शिंदे यांनी जोरदार बॅटिंग केली आहे.

विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. त्याबद्दल मी विजू भाऊंचं अभिनंदन करतो. यापदाचा मान-सन्मान वाढवण्या करिता ते चांगलं कार्य करतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राला सक्षम विरोधी पक्षनेत्यांची परंपरा आहे. तुम्हीही या सक्षम विरोधी पक्षनेत्यांच्या यादीत जाऊन बसाल, अशी आशा व्यक्त करतो, असंही ते म्हणाले.

वडेट्टीवार म्हणजे विदर्भाचा बुलंद आवाज, त्यांनी दोनवेळा विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. त्यांचं अभिनंदन. त्यांचा आवाज माईकपेक्षाही मोठा आहे. त्यामुळे त्यांना माईकची गरज नाही, अशी मिश्किल टिपण्णीही फडणवीसांनी केली.

अजित पवार यांनी याआधीच्या विरोधी पक्षनेत्यांच्या नावांची यादी वाचून दाखवली. तसंच विजय वडेट्टीवार यांचं अभिनंदन केलं. विरोधी पक्षनेतेपद मिळणं एक संधी आहे. वडेट्ट्वारी चांगलं काम करतील, असंही अजित पवार म्हणाले.

Follow Us
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....