AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई पोलीस आयुक्त गृहमंत्र्यांच्या भेटीला, बदल्यांच्या दुसऱ्या राऊंडविषयी चर्चेची शक्यता

मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि डीजीपी रजनीश शेठ यांची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर चर्चा होत आहे (Hemant Nagrale meets Anil Deshmukh)

मुंबई पोलीस आयुक्त गृहमंत्र्यांच्या भेटीला, बदल्यांच्या दुसऱ्या राऊंडविषयी चर्चेची शक्यता
| Updated on: Mar 24, 2021 | 1:46 PM
Share

मुंबई : मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale ) गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या भेटीला गेले आहेत. मुंबईत गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर दोघांची भेट झाली. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि डीजीपी रजनीश शेठ यांची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर चर्चा होत असल्याची माहिती आहे (Mumbai CP Hemant Nagrale meets Home Minister Anil Deshmukh)

86 पीआय, एपीआय आणि पीएसआय यांच्या अंतर्गत बदल्यांनंतर दुसऱ्या राऊंडच्या बदल्यांवर चर्चा होणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. दुसऱ्या राऊंडमध्ये आयपीएस, डीसीपी, एडी. सीपी, जॉईंट सीपी यांच्याही जबाबदारीत फेरबदल होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलीस दलात दुसरे मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत.

सर्व युनिट प्रमुखांच्या बदल्या

पोलिसांच्या बदल्यांसाठी राज्यात मोठे रॅकेट सुरु असल्याचा अहवाल दाबल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. संपूर्ण राज्यातून महाविकास आघाडी सरकारवर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबई गुन्हे शाखेत तब्बल 65 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजेच मुंबईतील सर्व युनिट प्रमुखांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. सीआययू युनिटचे एपीआय रियजुद्दीन काझी यांना सशस्त्र पोलीस दलात पाठवण्यात आलंय. तर सीआययू युनिटचे एपीआय प्रकाश होवाळ यांची बदली मलबार हिल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी मुकेश अंबानी धमकी प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत.

सुप्रीम कोर्टात परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी

दुसरीकडे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एसके कौल आणि आर. सुभाष रेड्डी यांच्या दोन द्विसदस्यी खंडपीठाकडे सुनावणी होणार होती. सिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे.

तर मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन करण्यात आलेली बदली रद्द करावी, अशी देखील मागणी याचिकेत करण्यात आलीय. सिंग यांच्या वतीने अ‌ॅड. मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन करण्यात आलेली बदली हा दुर्मीळ प्रकार असल्याचं रोहतगी म्हणाले. त्यावर कोर्टाने हे प्रकरण एवढं गंभीर होतं तर तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाही? याप्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांना पक्षकार का केलं नाही? असा सवाल करतानाच सर्वोच्च न्यायालयाने रोहतगी यांना हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला.

नगराळेंची राज्यपालांशीही भेट

हेमंत नगराळे यांनी कालच राज्यपालांची भेट घेतली. नगराळेंनी मुंबईत राजभवनामध्ये भगतसिंह कोश्यारी (Maharashtra Governor Bhagatsingh Koshyari) यांची सदिच्छा भेट घेतली. पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर हेमंत नगराळे यांची राज्यपालांसोबत ही पहिलीच भेट होती.

संबंधित बातम्या :

मुंबई पोलीस आयुक्त राजभवनात, हेमंत नगराळेंची राज्यपाल कोश्यारींशी चर्चा

मुंबई पोलीस दलातील विशेष पथकाची पुनर्रचना, पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंचा पहिला निर्णय

(Mumbai CP Hemant Nagrale meets Home Minister Anil Deshmukh)

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....