‘फर्जीवाडा केलाय म्हणून समीर वानखेडे मुंबई पोलिसांना घाबरत आहेत’, नवाब मलिकांची खोचक टीका

| Updated on: Oct 28, 2021 | 6:58 PM

'काही दिवसापूर्वी मुंबई पोलिसांचे संरक्षण मागणारा समीर दाऊद वानखेडे आज अचानक मुंबई पोलिसांविषयी अविश्वास दाखवत आहे. याचा अर्थ याने फर्जीवाडा केलाय म्हणून मुंबई पोलिसांना घाबरत आहे', असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

फर्जीवाडा केलाय म्हणून समीर वानखेडे मुंबई पोलिसांना घाबरत आहेत, नवाब मलिकांची खोचक टीका
नवाब मलिक, अल्पसंख्याक मंत्री
Follow us on

मुंबई : ‘काही दिवसापूर्वी मुंबई पोलिसांचे संरक्षण मागणारा समीर दाऊद वानखेडे आज अचानक मुंबई पोलिसांविषयी अविश्वास दाखवत आहे. याचा अर्थ याने फर्जीवाडा केलाय म्हणून मुंबई पोलिसांना घाबरत आहे’, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. आज आर्यन खानला जामीन मिळाल्यावर नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. इतकंच नाही तर मलिक यांनी वानखेडेंचा एक सूचक इशाराही दिला आहे. (Nawab Malik’s criticism and suggestive warning on NCB officer Sameer Wankhede)

‘क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणात आर्यन खान व इतर दोघांना हायकोर्टाने जामीन दिला आहे. कालच दोघांना एनडीपीएस कोर्टाने जामीन दिला होता. एकंदरीत आज ज्यापध्दतीने एनसीबीने युक्तीवाद केला. त्याअगोदरच ही केस किल्ला कोर्टात जामीन देण्यासारखी होती परंतु एनसीबीचे वकील नवनवीन युक्तीवाद करुन लोकांना जास्त दिवस तुरुंगात कसे ठेवता येईल असा प्रयत्न करत होते. शेवटी हायकोर्टाने जामीन दिला आहे’, असेही नवाब मलिक म्हणाले.

‘समीर वानखेडेने जाणूनबुजुन मुलांना अडकवले’

‘ही केस फर्जीवाडा आहे. या मुलांना जाणुनबुजुन समीर वानखेडे याने अडकवले आहे. पुरावे घेऊन हे लोक हायकोर्टात गेले तर ही केस बाद ठरु शकते. लोकांना तुरुंगात टाकणारा समीर दाऊद वानखेडे आज तोच कोर्टात जाऊन मुंबई पोलिसांकडे केस न देता माझी सीबीआय किंवा एनआयएमार्फत चौकशी करा म्हणतोय. मात्र, मुंबई पोलिसांनी समीर वानखेडे यांना अटक करायची असेल तर 72 तासाची नोटीस दिली जाईल, असं स्पष्ट केलं केलंय. कालपर्यंत मला अटक करु नका मला संरक्षण द्या, असं सांगणारा समीर वानखेडे हायकोर्टात धाव घेतो आणि मुंबई पोलिसांविषयी अविश्वास दाखवतो! याचा अर्थ यामध्ये काळंबेरं आहे, असंही नवाब मलिक म्हणाले. दरम्यान, आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर मलिक यांनी ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’, असं ट्वीट करुन सूचक इशाराही दिलाय.

आर्यन खानला अखेर जामीन मंजूर

मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात अखेर आर्यन खानला जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात जवळपास तीन दिवस दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा निर्णय देण्यात आलाय. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, आज जामीन मंजूर करण्यात आला असला तरी हे तिघेही आज कारागृहाबाहेर पडण्याची शक्यता कमी आहे. त्याबाबत आर्यन खानचे वकील मुकूल रोहतगी यांनी माहिती दिलीय.

आर्यन खान कारागृहाबाहेर कझी येणार?

मुंबई उच्च न्यायालयाने तिनही आरोपींना जामीन दिला आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. माननीय उच्च न्यायालयाने जवळपास तीन दिवस दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत उद्या मिळेल आणि मला आशा आहे की हे तिघेही उद्या संध्याकाळपर्यंत किंवा शनिवारी बाहेर येतील, अशी माहिती आर्यन खानचे वकील मुकूल रोहतगी यांनी दिली आहे.

इतर बातम्या :

‘समीर वानखेडेंना एकाकी पडू देऊ नका, मविआतील नेत्यांच्या घोटाळ्यावरुनही लक्ष हटायला नको’, भाजप नेत्यांना दिल्लीतून आदेश?

उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या इशाराऱ्यावर नवाब मलिकांकडून समीर वानखेडेंची बदनामी, सोमय्यांचा थेट आरोप

Nawab Malik’s criticism and suggestive warning on NCB officer Sameer Wankhede