नवाब मलिक गृहमंत्र्यांपाठोपाठ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, समीर वानखेडेंवर महाराष्ट्र पोलिसांकडून कारवाई होणार?

नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यात खंडणी वसुली, लाचखोरी आणि बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवल्याच्या आरोपाचा समावेश आहे. या प्रकरणात आज मलिक यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर आता मलिक उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत.

नवाब मलिक गृहमंत्र्यांपाठोपाठ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, समीर वानखेडेंवर महाराष्ट्र पोलिसांकडून कारवाई होणार?
नवाब मलिक, अल्पसंख्याक मंत्री
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 6:30 PM

मुंबई : मुंबई क्रुझ ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यात खंडणी वसुली, लाचखोरी आणि बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवल्याच्या आरोपाचा समावेश आहे. या प्रकरणात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेणार असल्याचं मलिक म्हणाले होते. त्यानंतर आज मलिक यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर आता मलिक उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. (Nawab Malik meets CM Uddhav Thackeray and Dilip Walse Patil after serious allegations against Sameer Wankhede)

तत्पूर्वी सोमवारी दिलीप वळसे-पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या या प्रकरणावर चर्चा झाली होती. त्याबाबत वळसे-पाटील यांनीच माध्यमांना माहिती दिली. समीर वानखेडे प्रकरणावर आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत जुजबी चर्चा झाली, असं वळसे-पाटील यांनी सांगितलं होतं. याबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका ते स्वत:च स्पष्ट करतील असंही ते म्हणाले होते. तर प्रभाकर साईलचं प्रतिज्ञापत्र मी पाहिलं आहे. त्यांना जी स्वत:च्या जीवाची भीती वाटते त्यासाठी त्यांनी संरक्षण मागितलं होतं. त्यांना पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली आहे, अशी माहिती वळसे-पाटलांनी दिली होती.

केपी गोसावीचा मनसुख हिरेन होऊ नये- मलिक

दरम्यान, क्रुझ ड्रग्ज पार्टीवरील पंच केपी गोसावी याचा अजूनही शोध लागलेला नाही. पुणे पोलीस त्यांचा शोध घेत असतानाच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मोठं विधान केलं आहे. केपी गोसावी यांचा मनसुख हिरेन होऊ नये, अशी भीतीच नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

नवाब मलिक यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना केपी गोसावी संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. काल मी एक गोष्ट सांगितली होती. मला भीती वाटते की उद्या के. पी गोसावीचा मनसुख हिरेन होऊ नये. जो आरोपी लपलेला होता, नंतर तो टीव्हीला फोन देऊ लागला. त्यामुळे त्याला कुठे तरी लपून ठेवलं होतं असं मला वाटतं. मनसुख हिरेनवाला आरोप लागल्याने तो बाहेर आला. तो बाहेर आल्याने पुणे पोलीस त्याच्या फोनला ट्रॅक करत असून त्याला अटक करेल, असं मला वाटतं, असं मलिक म्हणाले.

सीडीआर मागवायला माझी मुलगी गुन्हेगार आहे काय?

आम्ही कुणाच्याही खाजगी आयुष्याच्या अधिकाराचा भंग केला नाही. एखादा व्यक्ती धर्मांतर करून दुहेरी लाभ घेत असेल तर त्याचा उल्लेख केला पाहिजे. सत्य समोर आणण्यासाठी काही गोष्टी बाहेर येत आहेत. कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर आम्ही घाला घालत नाही. माझ्या जावयाला बंद केलं गेलं. कोर्टात प्रकरण आहे. माझी मुलगी अनेक कागदपत्रं काढण्याचा प्रयत्न करत आहे. समीर वानखेडेंनी मुंबई पोलिसांना पत्रं लिहून माझ्या मुलीचा सीडीआर मागितला. माझी मुलगी निलोफर मलिक काय गुन्हेगार आहे का? कोणत्या आधारावर माझ्या मुलीच्या खाजगी आयुष्याची माहिती मागितली आहे.? असा सवाल करतानाच वानखेडे आपल्या मर्यादेचा भंग करत आहेत, असं मलिक म्हणाले.

इतर बातम्या :

तपास अधिकाऱ्याची जात, धर्म काढणं दुर्दैवी; NCB चा वापर राजकीय दबावासाठी का होईल? फडणवीसांचा सवाल

महाराष्ट्रातील खंडणीखोर, वसुली सरकार तुम्हाला इथं हवं आहे का? दादरा नगर-हवेलीतून फडणवीसांचा घणाघात

Nawab Malik meets CM Uddhav Thackeray and Dilip Walse Patil after serious allegations against Sameer Wankhede

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.