AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi : आजचा भाजप म्हणजे मोदी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी!; सामना अग्रलेखातून निशाणा

Saamana Editorial on PM Narendta Modi BJP : आजचा भारतीय जनता पक्ष म्हणजे लोकांचा सहभाग नसलेली'पब्लिक कंपनी' आहे, असं म्हणत आजच्या सामनाच्या अग्रलेखातून टीकास्त्र डागण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही तोफ डागण्यात आली आहे. वाचा सविस्तर...

PM Narendra Modi : आजचा भाजप म्हणजे मोदी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी!; सामना अग्रलेखातून निशाणा
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 03, 2023 | 8:17 AM
Share

मुंबई | 03 ऑक्टोबर 2023 : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीकास्त्र डागण्यात आलं आहे. भारतीय जनता पक्ष ही आज ‘पब्लिक कंपनी’ म्हणजे लोकांचा सहभाग असलेला पक्ष नाही, असं सामनात म्हणण्यात आलं आहे. तसंच वैचारिक वारसा अन् हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सामनातून टीका करण्यात आली आहे. घराणेशाहीवर बोलताना नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली आहे. मोदी यांची घराणेशाहीबाबतची भूमिका ही ढोंगी असल्याचं सामना अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे. यावेळी लालकृष्ण अडवाणी यांचा दाखलाही देण्यात आला आहे.

सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा

भारतीय जनता पक्ष ही आज ‘पब्लिक कंपनी’ म्हणजे लोकांचा सहभाग असलेला पक्ष नाही. तो भागधारक, भांडवलदार, व्यापारी, गुंतवणूकदार लोकांचा प्रायव्हेट पक्ष बनला आहे. काँग्रेसने सार्वजनिक उपक्रमांचा पाया रचला. हा पाया श्री. मोदी प्रा. लिमिटेड कंपनीने मोडून विकून खाल्ला. तेलंगणातील शेतकऱ्यांची स्थिती देशात उत्तम आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने, ‘ठाकरे’ घराण्याने सामाजिक, राजकीय वारसा निर्माण केला. मोदी-शहा यांना कोणताही वैचारिक, सांस्कृतिक वारसा नाही. ते आले तसे जातील. त्यांचे नामोनिशाणही इतिहासात राहणार नाही. अंध भक्तांच्या कुजबुजीवर वारसा टिकत नाही. त्यासाठी जमिनीत व लोकांच्या मनात रोपटे पेरावे लागते. दुसऱ्यांनी लावलेली रोपटी उपटून स्वतःचा विचार कसा पेरणार?

घराणेशाही, परिवारवाद यावर पंतप्रधान मोदी अलीकडे बोलू लागले आहेत व त्यांचे बोलणे गमतीचे आहे. पंतप्रधान मोदी रविवारी तेलंगणात होते. तेथे त्यांनी परिवारवादावर भाष्य करून आपल्या विरोधकांवर हल्ला केला आहे. काही राजकीय पक्ष प्रायव्हेट कंपन्यांप्रमाणे चालवले जातात.

मोदी यांनी राजकीय घराण्यांना ‘प्रायव्हेट कंपनी’ म्हटले. या प्रायव्हेट कंपन्यांना जनतेशी घेणेदेणे नाही असा श्री. मोदींचा रोख आहे, पण सत्य असे की, यातील बऱ्याचशा प्रायव्हेट कंपन्या भाजपने चालवायला घेतल्या आहेत. तेलंगणात मोदी यांनी भारत राष्ट्र समिती व काँग्रेसवर प्रहार केला. ज्याला कुटुंब आहे त्याला भावना आहेत, भावना आहेत म्हणजे परिवार आहे. परिवार नसलेले लोक भावनाशून्य असतात.

हिंदू संस्कृती व मोदींच्या नव्या सनातन धर्मात कुटुंब, परिवार, एकत्र कुटुंब पद्धती यास महत्त्व आहे, पण मोदींचा धर्म वेगळा आहे. मोदी तेलंगणात जाऊन परिवारवाद, खासगी कंपन्यांचा पक्ष यावर टीका करतात, पण विसंगती अशी की, ओडिशात नवीन पटनायक, आंध्रात जगनमोहन रेड्डी यांच्या राजकीय परिवारवादावर बोलत नाहीत. आंध्रात व ओडिशातील परिवारवादी पक्ष एखाद्या प्रायव्हेट कंपनीप्रमाणे चालवले जात आहेत व या कंपन्यांनी केंद्रातील मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मोदी हे परिवारवादासंदर्भात किती ‘ढोंगी’ भूमिका घेत आहेत ते स्पष्ट होते.

भाजपने देशातील अनेक घटनात्मक संस्था या स्वतःच्या प्रायव्हेट कंपन्या असल्याप्रमाणेच चालवल्या आहेत व देशाला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. मुळात भारतीय जनता पक्षाचीच आज एक प्रकारे प्रायव्हेट कंपनी झाली आहे. या कंपनीचे खरे संस्थापक लालकृष्ण आडवाणी यांना अडगळीत फेकून या कंपनीचा ताबा घेण्यात आला व पक्षावर एक प्रकारे मालकी हक्क प्रस्थापित केला गेला.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.